Breaking News

Monthly Archives: April 2019

पंतप्रधान मोदींना यूएईकडून सर्वोच्च नागरी पुरस्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था संयुक्त अरब अमिरात (यूएर्ई)कडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा झायेद पदकाने सन्मान करण्यात येणार आहे. दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी मोदींनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांचा सर्वोच्च नागरी गौरव केला जाणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि यूएई या दोन्ही देशांतील संबंध एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचले. यामध्ये पंतप्रधान …

Read More »

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये सीबीएससी बोर्डाचा प्रारंभ

कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये सीबीएसई बोर्ड सुरू करण्यात आले आहे. या शाळेचे उद्घाटन रयत शिक्षण संस्था सातार्‍याच्या उपाध्यक्षा जयश्री चौघुले यांच्या हस्ते व मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी करण्यात आले.   या वेळी सातारा येथील …

Read More »

दक्षिण रायगडमध्ये पाण्यासाठी वणवण

माणगावातील 30 गावे 30 वाड्या तहानेने व्याकुळ माणगाव : प्रतिनिधी : माणगाव तालुक्यातील 30 गावे व 30 वाड्यांना पाणीटंचाई जाणवत असून, तेथील ग्रामस्थांची मार्च महिन्यापासूनच पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत जात असल्याने यंदा पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. गेल्या वर्षी माणगाव तालुक्यातील 14 गावांना टँकरद्वारे …

Read More »

अवैध गावठी हातभट्टीवर कर्जत पोलिसांची कारवाई

कर्जत : प्रतिनिधी : तालुक्यातील गौरकामत गावाच्या हद्दीतील जंगल भागात गावठी हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळताच कर्जतच्या पोलीस निरीक्षक तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद देठे, नाईक सचिन नरुटे, महिला पोलीस नाईक दीपाली खडे, पोलीस शिपाई गजानन केंद्रे, वाकोजी कोलमकर, सागर नायकुडे, गणेश पवार यांच्या पथकाने पोलीस पाटलांच्या सहकार्याने बुधवारी (दि. …

Read More »

गीते यांच्या संपर्क कार्यालयाचे पेणला उद्घाटन

पेण : प्रतिनिधी : शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या पेण येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री रवीशेठ पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन यांच्या हस्ते चिंचपाडा येथील ग्रामीण रुग्णालयशेजारील इमारतीच्या तळमजल्यावर करण्यात आले. पेण नगर परिषद क्षेत्रात महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हटकर वाड्यातील श्री गणरायाच्या …

Read More »

इंदापूरच्या सभेत शिवसेनेकडून तटकरेंचे वाभाडे

माणगाव : प्रतिनिधी : तटकरेंच्या घरात चार आमदार व एक जिल्हा परिषद अध्यक्ष असतानाही ज्यांना रायगड जिल्ह्याचे नंदनवन करता आले नाही, त्यांनी गीतेंवर टीका करू नये. आपल्याला तटकरेंना मुळासकट उपटून टाकायचे आहे. अनंत गीते त्यांची वाट लावणारच आहेत, पण येणार्‍या काळात तटकरे कुटुंबाला रायगड जिल्ह्यातून हद्दपार करू, असे जिल्हाप्रमुख रवी …

Read More »

मावळमध्ये रिपाइं(डे)चे कार्यकर्ते महायुतीत सहभागी -साळुंखे

पनवेल : वार्ताहर  आरपीआय डेमोक्रेटिक पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी नुकतीच महाड येथे स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक लावून त्यांनी महायुतीला पाठिंबा देऊन महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराला तेथील पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मावळमध्येही लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार लवकरच सुरू करणार …

Read More »

मालाचे पैसे न देता केली फसवणूक

पनवेल : बातमीदार विकत घेतलेल्या मालाचे पैसे न देता नवीन पनवेल येथील एका व्यापार्‍याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कळंबोली पोलिसांनी गौरी सोनी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अनिला मालपानी (49) यांचा नागझरी, तळोजा येथे अनिला एंटरप्रायजेस नावाने लोखंडी वायर बनविण्याचा कारखाना आहे. स्टील मार्केट …

Read More »

शिवसेना जनसेवेसाठी तत्पर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे प्रतिपादन

पनवेल ः वार्ताहर शिवसेनेने कायमच समाजसेवेचा वसा घेतलेला असून शिवसेना शाखा या लोकांच्या मदतीला असतात. त्यामुळेच माताभगिनी अडचणीत सापडल्यावर प्रथम शिवसेना शाखेत धाव घेतात व या वेळी त्यांच्या मदतीला शिवसैनिक भावासारखा धावून जातो, असे प्रशंसोद्गार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी खारघर येथे गुरुवारी (दि. 4) काढले. खारघर येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात …

Read More »

नेरळमध्ये नववर्ष स्वागत यात्रेची तयारी

कर्जत : बातमीदार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हिंदू नववर्षाचे स्वागत नेरळ गावात दरवर्षी मोठ्या जल्लोषात केले जाते. यंदाही नेरळ नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे शनिवारी (दि. 6) नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे गेल्या 15 वर्षापासून नेरळ गावात स्वागतयात्रा काढून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते.  या …

Read More »