Breaking News

Monthly Archives: April 2019

राहुलजी, अमेठीच्या विकासाचे काय?

भाजप नेत्या स्मृती इराणींचा खडा सवाल अमेठी ः वृत्तसंस्था : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर दुसरीकडे भाजपाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी वायनाडच्या लोकांना सावध करत राहुल यांनी अमेठीत विकासकामे केली नसल्याचा आरोप …

Read More »

गुढीपाडव्यानिमित्त कुस्तीचे सामने

मुरूड : प्रतिनिधी पंचक्रोशी आगरी समाज नांदगाव-मजगाव विभागीय तप्पा सामाजिक संस्था उसरोली मुरूड यांच्यातर्फे गुढीपाडव्यानिमित्त कुस्तीचे भव्य जंगी सामने शनिवारी (दि. 6) श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतनगरच्या भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आलेले आहेत. या कुस्ती सामन्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पोलीस पाटील दामोदर राऊत हे असणार आहेत, तर या कुस्ती …

Read More »

परिस्थिती ओळखा

पावसाला अद्याप अवकाश असल्याने येणारे तीन महिने हे वर उल्लेखलेल्या राज्यांमध्ये शासकीय यंत्रणेची कसोटी पाहणारे असणार आहेत. मागच्या वर्षी परतीचा पाऊस हा अपेक्षेपेक्षा कमी झाल्याने आजची ही दुष्काळसदृश परिस्थिती ओढवलेली आहे. 2017चा अपवाद वगळता, 2015 पासून देशाने सातत्याने दुष्काळसदृश परिस्थिती अनुभवली आहे. अर्थात, या नैसर्गिक आपत्तीची झळ लोकांना कमीत कमी …

Read More »

मुंबईने चेन्नईला रोखले

मुंबई : प्रतिनिधी जेसन बेहरनडॉर्फ, लसिथ मलिंगा आणि हार्दिक पांड्याने केलेल्या मार्‍याच्या जोरावर मुंबईने बुधवारी (दि. 3) घरच्या मैदानावर विजयाची नोंद केली. चेन्नई सुपरकिंग्जवर 37 धावांनी मात करीत मुंबईने बाराव्या हंगामातील चेन्नईची विजयाची मालिका खंडीत केली आहे. मुंबईने दिलेल्या 171 धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ 8 गड्यांच्या मोबदल्यात 133 धावांपर्यंत …

Read More »

जुन्या गीतांनी ज्येष्ठ हरविले ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइटच्या जमान्यात

पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील पनवेल शहर ज्येष्ठ नागरिक संघात दि. 3 एप्रिल रोजी जुन्या जमान्यातील ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट सिनेमातील प्रसिध्द गाणी इव्हीडी, डिव्हिडी माध्यमाद्वारे सादर करण्यात आली. गीते गाणारे होते कर्जत येथील संजय नीलवर्ण़. ते स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहेत. जी सिस्टीम त्यांनी तयार केली आहे, त्यामध्ये 800 गीतांचा संग्रह …

Read More »

खारघरमध्ये कर्करोग जागरूकता चर्चासत्रास नागरिकांचा प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त कर्करोगाविषयी लोकांत जागरूकता निर्माण करण्यासाठी धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्थेच्या वतीने खारघरमध्ये बुधवारी (दि. 3) चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये एशियन कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉ. निशा अय्यर यांनी मार्गदर्शन केले. 1 ते 7 एप्रिल हा आठवडा तरुण आणि मध्यमवयीन व्यक्तींसाठी कर्करोग जागरूकता सप्ताह म्हणून पाळण्यात येतो. या …

Read More »

वाढदिवसानिमित्त पर्यावरणपूरक बॅगांचे वितरण

खारघर : रामप्रहर वृत्त  भाजपा खारघर वॉर्ड क्र. 4च्या सरचिटणीस, संकल्प प्रतिष्ठान, खारघरच्या महिला अध्यक्षा अंकिता वारंग यांचा वाढदिवस वॉर्ड क्र. 4चे नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने प्रदूषणमुक्त  फॅन्सी कापडी बॅग देऊन पर्यावरणपूरक बॅगेचा वापर करण्याचा संदेश देण्यात आला. संकल्प प्रतिष्ठान, खारघरतर्फे अशा बॅगांचे …

Read More »

हापूसची आता ऑनलाइन खरेदी-विक्री व्यापार्यांच्या नवीन पिढीचे पुढचे पाऊल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोकणातील हापूस आंब्याचे यंदा उत्पादन घटले असून घाऊक बाजारात हापूस आंब्याला उठाव राहिलेला नाही. त्यामुळे विक्रीचे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणार्‍या व्यापार्‍यांच्या नवीन पिढीने देवगडच्या हापूस आंब्याची विक्री सुरू केली आहे. त्याला हळूहळू प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी हापूस आंबा बागायतदार व व्यापार्‍यांनी हा प्रयत्न केला नव्हता. …

Read More »

खारघर येथे उद्या गुढीपाडवा उत्सव

पनवेल ः बातमीदार  खारघर येथील मराठी फाऊंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही शनिवारी (दि. 6)  गुढीपाडवा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. गुढीपाडवा  जल्लोष 2019 या पारंपरिक कार्यक्रमास अनेक नामांकित संस्थांनी आर्थिक पाठिंबा दिला आहे. अपोलो हॉस्पिटल, निसर्ग निर्माण डेव्हलपर्स, अ‍ॅरोहेड सर्व्हिसेस आणि कॉप्स सिक्युरिटी सर्व्हिसेस यांसारख्या संस्थांनी प्रायोजक म्हणून हातभार लावला आहे. खारघर …

Read More »

तिघा भामट्यांकडून फसवणूक; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पनवेल : बातमीदार    शहरातील एका 56 वर्षीय इसमाकडून इन्शुरन्ससाठी घेतलेले पैसे इन्शुरन्स कंपनीत न भरता तब्बल 21 लाखांची फसवणूक केली आहे. शहर पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. रमेश नारायण गायकवाड हे महात्मा फुले रोड, पनवेल येथे राहत असून त्यांचा रिपेअरिंगचा व्यवसाय आहे. 2007 मध्ये दीपक शेळके …

Read More »