एक ठार, दोन जखमी, वाहनांचे नुकसान माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धरणाचीवाडी गांवाच्या हद्दीत बस थांब्याजवळ बुधवारी (दि. 29) पहाटेच्या सुमारास स्विफ्ट कारने ट्रेलरला जोरदार धडक दिली. या अपघातात स्विफट कारच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण जखमी झाले. शिवाय दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. चालक सतिश बाळकृष्ण वाघमारे (वय …
Read More »Monthly Archives: May 2019
पुरुष हॉकी संघाची घोषणा
भुवनेश्वर : वृत्तसंस्था येथे 6 जूनपासून सुरू होणार्या एफआयएच पुरुष हॉकी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून अनुभवी आक्रमक रमनदीप सिंग याला संघात स्थान देण्यात आले आहे. मधल्या फळीतील मनप्रितसिंगला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. हॉकी इंडियाने मंगळवारी संघाची घोषणा केली. या स्पर्धेत अ गटात भारतासह रशिया, पोलंड व …
Read More »सराव सामन्यात बांगलादेशचा दारुण पराभव ; धोनी आणि लोकेश राहुलची शतकी खेळी
लंडन : वृत्तसंस्था विश्वचषकापूर्वीच्या दुसर्या आणि अखेरच्या सराव सामन्यात टीम इंडियाने फलंदाजी आणि गोलंदाजीचा चांगलाच सराव केला आहे. सराव सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धचा सामना 95 धावांनी जिंकला. लोकेश राहुल आणि महेंद्रसिंह धोनीच्या शतकी खेळीने धावांचा डोंगर रचण्यात यश आलं. टीम इंडियाने या सामन्यात बांगलादेशसमोर 360 धावांचं आव्हान उभं केलं होतं, …
Read More »रिलायन्स करंडक क्रिकेट स्पर्धा आजपासून
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे तिसरी रिलायन्स करंडक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. गुरुवारपासून (दि. 30) ही स्पर्धा सुरू होणार आहे. स्पर्धा मर्यादित 40 षटकांच्या सामन्यांची असेल. ही स्पर्धा रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनची निवड चाचणी स्पर्धा असून यातील कामगिरीच्या आधारे रायगडचा संघ निवडला जाईल. सुरुवातीचे सामने जेएनपीटी …
Read More »रोटरी व्हॉलीबॉल स्पर्धेत गार्डन टीमचे सुयश
पनवेल : रामप्रहर वृत्त येथे रविवारी (दि. 26) सिडको गार्डन पनवेल पिल्ले कॉलेजसमोर रोटरी क्लब इंडस्ट्रीयल टाऊन पनवेल यांच्या विद्यमाने रोटरी व्हॉलीबॉल स्पर्धा 2019 आयोजित करण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महाराष्ट्र राज्याचे डेप्युटी (स्पोर्ट्स) डायरेक्टर श्री. मोटे, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचे …
Read More »चेन्नई येथे साकारणार संतोष गुरव स्पोर्ट्स अॅण्ड एज्युकेशन कॉलेज
नागोठणे : प्रतिनिधी लगोरी खेळाचे जनक, क्रीडारत्न स्व. संतोष गुरव यांच्या अतुलनीय कार्याची तमिळनाडूच्या लगोरी संघटनेने दखल घेतली आहे. स्व. संतोष गुरव यांच्या जयंतीनिमित्त तमिळनाडू राज्य संघटनेचे अध्यक्ष अय्यनार रामचंद्रन यांनी पेरूम्बक्कम, चेन्नई येथे गुरव यांच्या नावाने आपल्या स्वतःच्या बारा एकर जागेत भव्य दिव्य असे संतोष गुरव स्पोर्ट्स अॅण्ड एज्युकेशन …
Read More »माथेरानमध्ये अश्वशर्यतीची थरारक रंगत ; पर्यटकांचा उत्स्फूर्त सहभाग
कर्जत : बातमीदार अगदी ऐतिहासिक काळापासून माथेरानची शान असणारे ऐटबाज घोडे येथे येणार्या पर्यटकांच्या खास आकर्षणाबरोबर येथील दळणवळणाचे प्रमुख साधन ठरत आहे. सध्या माथेरानमध्ये उन्हाळी पर्यटनाला जोर धरू लागला आहे. पर्यटकांच्या वाढीसाठी येथील नगर परिषदेसह सामाजिक संस्थादेखील पुढे सरसावत आहेत. या वेळच्या पर्यटनाला वेगळीच रंगत आली असून दरवर्षी माथेरानमध्ये पर्यटनला …
Read More »माणगावात कलशारोहण समारंभ
माणगाव : जुने माणगाव येथील श्री स्वयंभू संगमेश्वर देवस्थान मंदिराचा कलशारोहण समारंभ 30 व 31 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त गुरुवार (दि. 30) दुपारी कलश पूजन व मिरवणूक काढण्यात येणार आहे. भद्रकाली नृत्यमंडळ कला पथक (बंगलोर) हे या मिरवणुकीचे विशेष आकर्षण आहे. शुक्रवार (दि. 31) पहाटे रुद्राभीषेक, वास्तुशांती, …
Read More »विहिरी आटल्या अन् कूपनलिका कोरड्या
कळंबमध्ये गेल्या 10 वर्षांतील सर्वात मोठी पाणीटंचाई; ट्रँकरने पाणीपुरवठा करण्यात अडथळे कर्जत : बातमीदार तालुक्यातील कळंब या मोठ्या लोकसंख्येच्या गावात मागील 10 वर्षातील सर्वात मोठी पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. गावाला पाणीपुरवठा करणार्या पाचही विहिरी आटल्या असून, बोअरवेल कोरड्या पडल्याने भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, हे गाव पाणी …
Read More »परजिल्ह्यातील पतसंस्था पतहिनांना प्रतिष्ठादायक
पोलादपूर तालुक्यात गेल्या 20 व्या शतकाच्या अखेरीस स्थानिक पतसंस्थांनी तालुक्यातील गोरगरीब जनतेला ’सहकाराचं कोंबडं आरवण्यापूर्वीच कापून खाल्लं’ असा नैराश्यजनक अनुभव दिल्यानंतर नव्या 21 व्या शतकाचे पहिले दशक संपल्यानंतर परजिल्ह्यातील न्यू सातारा पतसंस्था, मोरेमाऊली पतसंस्था-मुंबई आणि चिपळूण नागरी पतसंस्था या तीन पतसंस्थांनी आगमन केले आहे. सहकाराची विश्वासार्हता संपुष्टात आणणार्या स्थानिक बुडीत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper