मानवतेवरील हे मोठे संकट परतवून लावायचे असेल तर आपण तितकेच परिणामकारक असे बदल केले पाहिजेत असा हा मतप्रवाह आहे. आणि हा बदल घडवून आणून जागतिक तापमानवाढ 1.5 अंशावरच रोखायची असेल तर आपल्या हातात अवघी 12 वर्षे आहेत असे शास्त्रज्ञ सांगतात. अन्यथा अवघे जग एका मोठ्या कडेलोटाच्या दिशेने पुढे सरकते आहे …
Read More »Monthly Archives: May 2019
प. बंगालमधील तीन आमदार, 50 नगरसेवक भाजपात
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत 18 जागा जिंकून मोठे यश मिळवणार्या भाजपने तृणमूल काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असणार्या तृणमूलचे दोन आमदार आणि 50 नगरसेवक भाजपच्या गळाला लागले आहेत. दिल्लीत या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. 2017मध्ये भाजपमध्ये सामील झालेले तृणमूलचे माजी नेता मुकुल रॉय …
Read More »उल्हास नदीत बुडून दोघांचा मृत्यू
कर्जत ः प्रतिनिधी शेलू गावातील केबिकेनगरमध्ये राहणारे रहिवासी उल्हास नदीत पोहण्यासाठी गेले असता त्यातील दोघांचा बुडून मृत्यू झाला. उल्हास नदीत पोहण्यासाठी गेल्यानंतर बुडण्याच्या घटनांत सातत्याने वाढ होत आहे. शेलू गावात सातत्याने पाण्यात बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी उल्हास नदीतपात्रात पोहायला गेलेला तांबे कुटुंबातील आयुष हा 14 वर्षांचा मुलगा …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ठाम भूमिकेमुळे अतिक्रमण कारवाई टळली; रोडपालीं येथील प्रकल्पग्रस्तांना मिळाला न्याय
पनवेल ः प्रतिनिधी रोडपाली येथील 2015पूर्वीच्या घरांना पाडू नये यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच सरकारी आदेश काढल्याने याबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत सिडकोला या घरांवर कारवाई करता येणार नाही, अशी भूमिका सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतल्यामुळे सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाला काढता पाय घ्यावा लागला, असे भाजपचे नगरसेवक अमर अरुण पाटील यांनी …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विजयाची मुहूर्तमेढ रोवली -बारणे
पनवेल ः प्रतिनिधी मावळचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयानंतर खारघर येथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. खासदार बारणे यांच्या स्वागतासाठी विजयी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी पनवेल विधानसभा क्षेत्रातील मतदारांचे विशेष आभार मानले. पवार कुटुंबाने आजवर जरी …
Read More »रायगड जिल्ह्यात बारावीचा 84.97 टक्के निकाल ; यंदाही मुलींनीच मारली बाजी
अलिबाग ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2019मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा रायगड जिल्ह्याचा निकाल 84.97 टक्के लागला आहे. मागील वर्षीपेक्षा यंदाचा निकाल घटला आहे. गेल्या वर्षी 86.87 टक्के निकाल लागला होता. उत्तीर्ण होण्यात सालाबादप्रमाणे यंदाही मुलींनी मुलांना मागे टाकले आहे. 80.05 टक्के मुले, तर …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल आणि परिसरात स्वच्छतेचा अनोखा उपक्रम
पनवेल ः प्रतिनिधी राजकारणाबरोबरच समाजकारणी म्हणून ज्यांची ओळख आहे, असे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यानिमित्ताने श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 1 ते 10 जूनदरम्यान पनवेल महापालिका हद्दीत महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून पनवेल …
Read More »पनवेल महानगरपालिका हद्दीतील 40 हजार जुन्या करदात्यांना मिळणार दिलासा
पनवेल ः प्रतिनिधी पनवेलमधील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचे काम ‘स्थापत्य कन्सलटन्सी’ कंपनीला दिले असून पुढील चार महिन्यांनंतर पनवेलकरांना मालमत्ता कर भरावा लागण्याची शक्यता आहे. यासाठी इतर महापालिकांच्या कररचनेचा आढावा घेतला जात असून याप्रमाणेच कर आकारणीची शक्यता आहे. यामुळे सध्या कर भरत असलेल्या 40 हजार मालमत्ताधारकांना दिलासा मिळणार आहे, तर सिडको वसाहतींमधील …
Read More »जम्मू-काश्मीरमध्ये ‘हिज्बुल’च्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू ः जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अनंतनागमधील कोकेरनाग येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. मंगळवारी सकाळपासून या भागात शोधमोहीम सुरू होती. यादरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलांत चकमक झाली. या चकमकीत हिज्बुल …
Read More »विमानतळ बाधितांचे योग्य पुनर्वसन करावे -पुंडलिक म्हात्रे
उरण : प्रतिनिधी नवी मुंबई विमानतळासाठी बाधित होणार्या गावांचे पुनर्वसन करतांना गावातील सर्व वास्तू, सुविधा पुनर्वसन होणार्या ठिकाणी उभारल्या जातील, असे आश्वासन सिडकोच्या वतीने ग्रामस्थांना देण्यात आले. त्यानुसार गावात स्मशानभूमी पासून मंदिरे, समाजमंदिरे आणि सार्वजनिक तलावही बांधून देण्यात येणार आहेत. यासाठी काही भूखंड राखीव ठेवण्यात आले आहेत, मात्र प्रत्यक्षात गावात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper