Breaking News

Monthly Archives: May 2019

पनवेल महापालिकेला मिळणार जीएसटीचे 466 कोटींचे अनुदान

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेचे वस्तू व सेवाकराचे (जीएसटी) शासनाकडे थकलेले 466 कोटींचे अनुदान त्वरित मिळावे यासाठी महापौर डॉ. कविता चौतमोल आणि उपमहापौर विक्रांत पाटील यांनी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. या वेळी अनुदानाची मागणी केल्यावर त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिल्याने आता लवकरच हे अनुदान महापालिकेला मिळेल, असा …

Read More »

पायल आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना पोलीस कोठडी

मुंबई ः नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवीचे रॅगिंग करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिन्ही महिला डॉक्टरांना मुंबईतील विशेष न्यायालयाने 31 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी डॉ. भक्ती मेहर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींना अटक करण्यात आली आहे. तिघींनाही आज विशेष …

Read More »

पाच तरुणांची फसवणूक

पनवेल ः वार्ताहर परदेशात मर्चन्ट नेव्हीमध्ये सेलर पदावर नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने पाच बेरोजगार तरुणांकडून आठ लाख 50 हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अंशुलकुमार विजयपाल सिंग असे या भामट्याने नाव असून सीबीडी पोलिसांनी त्याला फसवणूक आणि अपहाराच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. या प्रकरणातील तक्रारदाराचे नाव विंकल …

Read More »

मोरा ते भाऊचा धक्का जलप्रवासाचे भाडे वाढले

उरण : वार्ताहर मोरा (उरण) ते भाऊचा धक्का (मुंबई) या जलप्रवासाच्या (लाँच सेवा) भाड्यात सोमवार (दि. 26) मेपासून 18 रुपयांची भाववाढ करण्यात आल्यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. अगोदरच असुविधा आणि प्रवाशांची असुरक्षितता यामुळे या मार्गावरील प्रवाशांना त्रास होत असताना मेरीटाईमच्या या प्रवासभाडे वाढीमुळे या मार्गावरील प्रवाशांची संख्या आणखी …

Read More »

रिलायन्सच्या व्यवस्थापकाचे अपहरण व सुटका

पोलिसांकडून त्रिकुटाचा शोध सुरू पनवेल : बातमीदार शेतातून जाणार्‍या गॅस पाइपलाइनचा मोबदला मिळविण्यासाठी तिघा व्यक्तींनी रिलायन्स गॅस पाइपलाइन कंपनीचे व्यवस्थापक हितेन राय याला गाडीमधून डांबून नेल्याचा प्रकार सोमवारी सकाळी खारघरमध्ये घडला, मात्र या तिघांनी हितेन रायसोबत नुकसान भरपाईबाबत बोलणी केल्यानंतर त्याला ऐरोलीत सोडून पलायन केले. या घटनेनंतर खारघर पोलिसांनी तिघांवर …

Read More »

आदगाव समुद्रकिनार्यावरील सूर्यास्त

श्रीवर्धन : तालुक्यातील आदगाव समुद्र किनार्‍यावरील सूर्यास्ताचे अप्रतिम दृश्य. (छाया : अमेय नाझरे)

Read More »

युको रिक्षाचालकांची दादागिरी; योग्य भाडे आकारण्याची मागणी

रसायनी : प्रतिनिधी राष्ट्र राज्य मार्ग परिवहन खात्याच्या बेजबाबदारपणामुळे प्रवासी ग्राहकांना युको रिक्षावाले यांच्याकडून भुर्दंड पडत असल्याचे चित्र दिसत आहे. युको रिक्षा सुरू झाल्यापासून प्रवासी ग्राहक यांना प्रवास करणे सोयीचे झाले आहे. त्याचबरोबर युको रिक्षामुळे त्यांना रोजगारही उपलब्ध झाला आहे, मात्र युको रिक्षा यांची दादागिरी सुरू झाली आहे, असे चित्र …

Read More »

20 जूनपर्यंत अर्ज करावेत

सागरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे आवाहन मुंबई : प्रतिनिधी ‘सागरी मत्स्य व्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन’ या 6 महिन्याच्या प्रशिक्षण वर्गासाठी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राकडे दि. 20 जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. मत्स्यव्यवसायाचा विकास व विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून मत्स्य व्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थीना ‘सागरी मत्स्य व्यवसाय, …

Read More »

ब्राझीलच्या फुटबॉल कर्णधारपदी एल्वेस

रिओ जानेरिओ : वृत्तसंस्था ब्राझीलने कोपा अमेरिका कप स्पर्धेसाठी स्टार फुटबॉलपटू नेमारच्या स्थानी दानी एल्वेसची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. ब्राझील फुटबॉल महासंघाने (सीबीएफ) सोमवारी ही घोषणा केली. सीबीएफने म्हटले की, ‘प्रशिक्षक टीटे यांनी या निर्णयाबाबत नेमारला सूचना दिलेली आहे.’ आठ वेळा जेतेपदाचा मान मिळवणार्‍या ब्राझील संघाला 14 जूनपासून प्रारंभ होत …

Read More »

पेण येथे ट्रक-ट्रेलर अपघातात दोन जखमी

पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील जिते गावाजवळ मंगळवारी (दि.28) पहाटेच्या सुमारास ट्रेलर व ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दोनजण जखमी झाले.  पेण तालुक्यातील जिते गावाजवळील हॉटेल पार्किंग सहारासमोर मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ट्रेलर व ट्रक यांच्यात समोरासमोर ठोकर झाली. या अपघातात अशोक बितीलाल कुमार आणिअमीनऊद्दीन खान सुलतानपूर (दोघे रा. …

Read More »