महाड : प्रतिनिधी येथील रोटरी क्लब आणि हिरवांकुर या संस्थेच्या वतीने महाड ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, तसेच या झाडांना प्रोटेक्शन गार्ड म्हणून ड्रम लावण्यात आले. रोटरी क्लब ऑफ महाड आणि हिरवांकुर संस्था यांच्या सौजन्याने महाड ग्रामीण रुग्णालय अर्थात ट्रामा केअर सेंटर येथे डॉ. भास्कर जगताप यांच्या सहकार्याने इकोफ्रेंडली …
Read More »Monthly Archives: July 2019
‘केअरऑफ नेचर’तर्फे सामाजिक उपक्रम
उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील केअरऑफ नेचर संस्था वेश्वीचे संस्थापक, राजू मुंबईकर यांच्या वाढदिवसानिमित्त केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेच्या वतीने उरणमध्ये विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उरण तालुक्यातील विविध ठिकाणी हे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये पाले येथे कपडे धुण्यासाठी तळ्याला बांधलेल्या शेडचे उद्घाटन, तसेच शाळेतील व …
Read More »मालेगाव आणि दहिवलीमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँक
कर्जत : बातमीदार भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेंमेंट बँकेचा उपक्रम कर्जत तालुक्यातील दहिवली तर्फे वारेदी आणि मालेगावमध्ये सुरू करण्यात आला आहे. दहिवली ग्रामपंचायत कार्यालयातील पोस्ट पेमेंट बँकेमध्ये बचत आणि चालू खाती यांच्या माध्यमातून व्यवहार करता येणार असून, तेथील सर्व व्यवहार पेपरलेस असणार आहेत. भारतीय डाक विभागाच्या नवी मुंबई विभागामार्फत …
Read More »नैनाची सहावी नगर योजना शासनाकडे ; 243 हेक्टर जमिनीच्या विकासाचा आराखडा सादर
नवी मुंबई ः सिडको वृत्त सेवा सिडकोच्या नैना प्रकल्पासाठी सहावी नगर रचना परियोजना तयार करण्यासाठीचा इरादा जाहीर करण्यास सिडको संचालक मंडळाच्या 19 जुलै 2019 रोजी पार पडलेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या पूर्वी नैना प्रकल्पाकरिता सिडकोतर्फे पाच नगर रचना योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा भोवतालच्या प्रदेशाचा …
Read More »विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘उरी’चा थरार
सर्जिकल स्ट्राईकचा चित्रपट पाहून नागोठण्यात विद्यार्थी भारावले नागोठणे : प्रतिनिधी कारगिलमधील विजयाच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी सकाळी 10 वाजता येथील विद्यार्थ्यांना उरी द सर्जिकल स्ट्राईक हा उरी हल्ल्यावर तयार करण्यात आलेला चित्रपट मोफत दाखविण्यात आला. रोहे तहसील कार्यालयाकडून येथील सुरेश जैन आणि डॉ. मिलिंद धात्रक यांच्या साई चित्रमंदिर या आलिशान …
Read More »रायगडातील बेरोजगारांना रोजगाराची संधी
माणगाव : प्रतिनिधी रायगडमध्ये मोठमोठ्या कंपन्या येत आहेत. दिघी पोर्टमध्ये आपल्याला रोजगार मिळू शकतो. त्याकरिता स्थानिकांच्या पाठीशी टाटा कंपनी उभी आहे. कमीत कमी कागदपत्रांमध्ये विविध बँकांच्या सहकार्याने स्थानिकांना लगेचच ट्रक, डंपर, टँकर उपलब्ध करून देणार आहोत. यासाठी स्थानिक बेरोजगारांनी कंपनीच्या मेळाव्यात संपर्क साधावा, असे आवाहन टाटा कंपनीचे मुख्य संचालक विजय …
Read More »म्हसळा पोलीस ठाणे दीड महिना वार्यावर
म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा शहराचे ग्रामपंचायतीतून नगर पंचायतीत रूपांतर होत असताना शहरीकरणाच्या बरोबरीने अन्य विकास होत आहे. लोकसंख्याही झपाट्याने वाढली असताना गुन्ह्यांचा आलेखही कमी होत नाही, मात्र त्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्था ठेवणार्या पोलिसांचा फौजफाटा वाढत नसल्याने म्हसळा शहरातील किरकोळ व अन्य गुन्हेगारीत वाढ होत आहे. यामध्ये राष्ट्रद्रोहापासून घरफोड्या असे …
Read More »चुलत बहिणीवर बलात्कार करणार्यास कारावास
अलिबाग : प्रतिनिधी अल्पवयीन चुलत बहिणीवरच बलात्कार करणार्या आरोपीस अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयाने 10 वर्षे सश्रम कारावास, तसेच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. निमेश मोहन म्हात्रे (वय 21, रा. कोप्रोली, ता. उरण) असे या आरोपीचे नाव आहे. नात्याने चुलत बहीण असलेल्या पीडित मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिला ठार …
Read More »भाजप केंद्रीय सहसंघटक मंत्री व्ही. सतीश यांचे मार्गदर्शन
पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघामधील चार विधानसभा क्षेत्रातील भाजपच्या शक्ती केंद्र प्रमुखांसाठी रविवारी (दि. 28) दुपारी 1.30 वाजता पेण येथील आगरी समाज हॉलमध्ये मार्गदर्शन शिबिर होणार आहे. या शिबिरात भाजपचे केंद्रीय सहसंघटक मंत्री व्ही सतीश हे शक्ती केंद्र प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत. भाजपचे कोकण संघटन मंत्री सतीश धोंड, रायगड …
Read More »आपद्ग्रस्त शेतकर्यांना आवाहन
अलिबाग : नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या अलिबाग तालुक्यातील शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याकरिता शासनाकडून अनुदान प्राप्त झालेले आहे, मात्र बर्याच आपद्ग्रस्त शेतकर्यांनी त्यांचे बँकेचे अकाऊंट नंबर संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्याकडे दिलेले नसल्याने नुकसान भरपाईची रक्कम बँकेमध्ये जमा करता येत नाही. यासाठी अलिबाग तालुक्यातील सन 2017-18 मध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान …
Read More »