पनवेल ः वार्ताहर बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे सायंकाळी 5 वाजता खांदा वसाहतीतील सेक्टर 8 येथील ए टाइप बिल्डिंगलगत असलेले झाड पडले. सुदैवाने कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाली नाही. सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी पडलेले झाड रस्त्यावरून बाजूला केले. सेक्टर 8 येथे सिडकोने बांधलेली ए टाइपची घरे आहेत. इमारतींच्या संरक्षण भिंतीच्या आतमध्ये …
Read More »Monthly Archives: July 2019
पांडवकड्यावर पर्यटकांवर कारवाई
पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर शहरातील पांडवकड्यावर बंदीचे आदेश असूनदेखील बंदी झुगारणार्या पर्यटकांवर खारघर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचालून 12 पर्यटकांना अटक करून त्याची जामिनावर मुक्तता केली आहे. या पूर्वी 29 पर्यटकांवर खारघर पोलिसांनी कारवाई केली होती. विशेष म्हणजे कारवाई करण्यापूर्वी या 12 पर्यटकांपैकी काही पर्यटक वाहून जात असताना खारघर पोलिसांनी …
Read More »रिक्षा थांब्यांना पयार्र्यी जागा उपलब्ध करून द्यावी
भाजप युवा मोर्चाची महानगरपालिकेकडे मागणी; वाहतूक पोलिसांना सहाय्यक देण्याचीही सूचना पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील मोक्याच्या ठिकाणी रिक्षा थांब्याकरिता पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने गुरुवारी (दि. 25) महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना देण्यात आली, तसेच वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांना पालिकेने सहाय्यक कर्मचारी पुरवावेत, …
Read More »आंब्रे कुटुंबीयांना शासकीय मदतीचा धनादेश
पनवेल : प्रतिनिधी उमरोली येथील पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या आदित्य आणि सारिका आंब्रे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदतीचा धनादेश देण्यात आला आहे. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 25) पनवेल तहसील कार्यालयात हा चार लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. पनवेल तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 9 जुलै रोजी …
Read More »टेंभरे प्राथमिक शाळेत गणवेश वितरण
कर्जत : प्रतिनिधी नवी मुंबईतील जनसेवा मित्र मंडळाच्या वतीने कर्जत तालुक्यातील टेंभरे येथील प्राथमिक शाळेत शिक्षण घेणार्या आदिवासी आणि गरजू मुलांना क्रीडा गणवेश व स्पोर्ट शूजचे वितरण करण्यात आले. आपली संपूर्ण शाळा डिजिटल करण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते विनय म्हात्रे यांनी या वेळी सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक कोळी यांनी …
Read More »युवकांचा भाजपमध्ये प्रवेश
अलिबाग : प्रतिनिधी भाजपची विकासकामे पाहता अनेक जण पक्षात प्रवेश करीत आहेत. त्याअनुषंगाने अनेक युवकांनी भाजपमध्ये गुरुवारी पक्षप्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी स्वागत केले. भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेऊन आणि होत असलेली विकास कामे पाहता अनेक जण पक्षात प्रवेश करीत आहेत. त्यामध्ये भोकरपाड्याचे वसंतशेठ आगिवले, संतोष आगिवले, हेमंत …
Read More »निराधार विधवेचे घर कोसळले
महाड : प्रतिनिधी तालुक्यात सोमवारपासून कोसळणार्या पावसाने लाडवली बौध्दवाडी येथील एका निराधार विधवा महिलेच्या घरकुल योजनेतील घराचे छप्पर कोसळून घराचे मोठे नुकसान झाले. ग्रामपंचायतीकडून वारंवार मागणी होऊनही घरकुल योजनेतील घरांची दुरुस्ती होत नसल्याने ही घरे आता कोसळू लागली आहेत. मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सुदर्शना धोत्रे (45, रा. लाडवली बौध्दवाडी) …
Read More »‘कोळी समाजात तेढ निर्माण करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये’
पेण : प्रतिनिधी शहरातील चारही तलावांमध्ये मच्छीमारी करण्याचा अधिकार पेण नगर परिषदेने कोळी समाज बांधवांना दिला आहे. त्यामुळे येथील कोळी समाजामध्ये गैरसमज पसरवून तेढ निर्माण करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असे आवाहन न. प.चे गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले. पेण शहरातील कुंभार तळे, कासार तळे, मोतिराम तळे …
Read More »नेरळमध्ये रिक्षा स्टॅण्डचे उद्घाटन
कर्जत : बातमीदार नेरळ रेल्वेस्थानक आणि एसटी स्टॅण्ड येथून वंजारपाडा, देवपाडा भागात जाण्यासाठी नवीन तीन चाकी रिक्षांचा स्टॅण्ड सुरू करण्यात आला आहे. शिवशंकर रिक्षा चालक-मालक संघटनेच्या या रिक्षा स्टॅण्डचे उद्घाटन गुरुवारी (दि. 25) पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शेडगे यांच्या हस्ते नामफलकाला हार अर्पण करून करण्यात आले. कर्जत पं. स. चे माजी …
Read More »वीज खंडित झाल्याने रोह्यातील 20 गावे अंधारात
रोहे ः प्रतिनिधी लोखंडी कच्चा माल घेऊन जाणारा ट्रक निडी (ता. रोहा) येथील वीज वितरण कंपनीच्या डिपीवर धडकल्याने मंगळवारी (दि. 24) दुपारपासून मेढा, यशवंतखार व निडी तर्फे अष्टमी या विभागातील 20 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. नागोठणे येथून लोखंडी कच्चा माल घेऊन जाणारा ट्रक मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास निडी …
Read More »