Breaking News

Monthly Archives: July 2019

इस्राईलमधील निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींच्या फोटोचा वापर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – इस्राईलममध्ये पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भारतातील निवडणुकांप्रमाणे इस्राईलमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा पाहायला मिळत आहे. या निवडणुकीतील खास आकर्षण म्हणजे नेतन्याहू प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या फोटोंचा वापर करत आहेत. नरेंद्र …

Read More »

महाराष्ट्रातील वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ

मुंबई : प्रतिनिधी  – राज्यात 2014 साली 190 वाघ होते, ते वाढून आता 2019 मध्ये 312 इतके झाले असून, ही वाढ अंदाजे 65 टक्के आहे. स्थानिकांच्या सहभागातून वनविभागाने व्याघ्रसंवर्धनासाठी जे प्रयत्न केले त्याचे हे यश असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. महाराष्ट्रात 2006 साली 103 वाघ होते ते 2010 मध्ये …

Read More »

आरोग्य महाशिबिराच्या नियोजनासंदर्भात विचारविनिमय

पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिर 4 ऑगस्ट रोजी खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात होणार आहे. महाशिबिराच्या नियोजनासंदर्भात सोमवारी (दि. 29) रायगड …

Read More »

गुन्ह्यांचा शोध गतिमान करणार्या अॅम्बिस प्रणालीचा शुभारंभ

मुंबई : प्रतिनिधी  – सुमारे सहा लाख गुन्हेगारांची छायाचित्रे, बोटांचे ठसे, डोळ्यांचे बुबुळ इत्यादींचा एकत्रित डेटाबेस ऑनलाईन उपलब्ध करून देणार्‍या अ‍ॅम्बिस प्रणालीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (दि. 29) शुभारंभ करण्यात आला. देशात अशा प्रकारची जागतिक प्रणाली उपयोगात आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी या वेळी आनंद …

Read More »

खारघरमधील राखी फेस्ट महोत्सवाचा समारोप

खारघर ः रामप्रहर वृत्त येथील भाजप कार्यालयाजवळ कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या वतीने दोन दिवसीय ‘राखी फेस्ट महोत्सवाचे’ अयोजन   करण्यात आले आहे. या महोत्सवात महिलांनी बनवलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या महोत्सवाला सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या व …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दापोली विद्यालयात वह्यावाटप

दापोली ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दापोली येथील रयत शिक्षण संस्थेच्या आनंता पांडुरंग भोईर विद्यालयामध्ये गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (दि. 29) करण्यात आले होते. भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या …

Read More »

पनवेल ः शहरातील तलावासमोरील भाजी मार्केट येथील म्युनिसिपल शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये  बिकानेर हे दुकान नव्याने सुरू झाले आहे. याचे उद्घाटन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. या वेळी शांताराम पाटील, हुसेन शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Read More »

पनवेल ः भाजप महिला मोर्चाच्या पनवेल शहर सरचिटणीस सपना पाटील यांना वाढदिवसानिमित्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, सरचिटणीस लीना पाटील, श्वेता खैरे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Read More »

पनवेल : शहरातील उरण नाका येथील मच्छीमार्केटच्या स्वच्छतेसंदर्भात सोमवारी महापालिकेच्या वतीने पाहणी करण्यात आली. या वेळी उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक नितीन पाटील, तेजस कांडपिळे, नगरसेविका दर्शना भोईर, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रसाळ, सहाय्यक आयुक्त भोसले, शहर अभियंता कटेकर आदी उपस्थित होते. (छाया : लक्ष्मण ठाकूर)

Read More »

बापाने केले मुलाचे अपहरण; उरण पोलीस आरोपीच्या शोधात

उरण ः प्रतिनिधी उरण तालुक्यातील आवरे गावात आईच्या मृत्यूनंतर आजोबांकडे राहणार्‍या पाच वर्षांच्या तनुश विशाल तर्लोस्कर याचे त्याच्या वडिलांनी व आत्याने आपहरण केले असून, याबाबत त्यांच्या विरोधात तनुशचे आजोबा शांताराम गावंड (78) यांनी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार आवरे येथील शांताराम गावंड व इंदिरा …

Read More »