Breaking News

Monthly Archives: July 2019

सवतकडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

मुरुड : संजय करडे पावसाळ्यात वर्षासहलीचा आनंद लुटण्यासाठी मुरुड तालुक्यातील निसर्गरम्य सवतकडा धरणावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ लागल्याने सुट्टीच्या दिवशी येथे गर्दी होऊ लागली आहे. एका बाजूला उंच कडा, त्यातून फेसाळत खाली येणारे दुधाळ धबधबे, तर दुसर्‍या बाजूला धुक्याचे अच्छादन घेतलेली खोल दरी. हा निसर्गाचा नजराणा पाहताना स्वर्गसुखाचा अनूभव आल्याशिवाय …

Read More »

नीता माळी यांच्यामुळे चार दिवसांच्या बाळाला जीवदान

पनवेल ः रामप्रहर वृत्त – आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा नगरसेविका नीता माळी यांच्यामुळे सोमवारी (दि. 29) सकाळी चार दिवसाच्या बाळाला जीवदान मिळाले. नगरसेविका नीता माळी या सर्व सामान्य माणसाच्या मदतीसाठी सतत झटत असतात. पुराचे पाणी घरात आले की त्यांना प्रत्यक्ष जाऊन मदत करणे, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना सहकार्य …

Read More »

माजी राज्यपाल राम नाईक भाजपमध्ये पुनश्च सक्रिय

मुंबई : प्रतिनिधी – उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल व माजी केंद्रीय मंत्री राम नाईक मंगळवारी (दि. 30) मुंबईत पुनश्च भाजपत सक्रिय झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाईक यांचे स्वागत करताना त्यांच्या मार्गदर्शनाचा व अनुभवाचा पक्षाला लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला. या वेळी उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, प्रदेश सरचिटणीस …

Read More »

विवेक भालेराव, युवराज वलिंद्रे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार  महापुरात नाला पार करीत असताना दहिगाव इंजिवली (ता. कर्जत) येथील विवेक भालेराव (वय 17) तरुण वाहून गेला होता. राज्य शासनाच्या वतीने मृत विवेकचे वडील बबन भालेराव यांना शासकीय मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच गटारात पडून मृत्यू पावलेल्या माथेरानमधील युवराज या बालकाचे वडील धीरज वारीद्रे यांना …

Read More »

’राष्ट्रवादीकडून निवडून येण्याचे दिवस गेले; शिवेंद्रराजेंनी दिला राजीनामा

मुंबई : प्रतिनिधी – शिवेंद्रराजे हे भाजपमध्ये जाणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. जावळी मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजे यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. शहराच्या विकासासाठी भाजपत प्रवेश करण्याच्या आमदार शिवेंद्रराजे यांच्या भूमिकेला प्रमुख पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक यांनी पाठिंबा दर्शविला आहे. राष्ट्रवादीकडून निवडून येण्याचे दिवस …

Read More »

काँग्रेसला मोठा धक्का!

गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय संजय सिंह यांची पक्षाला सोडचिठ्ठी नवी दिल्ली ः वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव आणि राहुल गांधी यांनी तडकाफडकी दिलेल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर सुरू झालेली काँग्रेसची घसरण सुरूच आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. 30)  काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून, गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय असलेले उत्तर प्रदेशातील नेते …

Read More »

राजनाल्याचा बांध फुटल्याने शेतीचे नुकसान

कडाव : प्रतिनिधी मागील चार-पाच दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने कर्जत तालुक्यातील राजनाल्याचा बंधारा तांबस गावाजवळ फुटल्याने परिसरातील भात लागवड झालेल्या जमिनीचे  नुकसान झाले. मात्र अद्यापही या ठिकाणी स्थानिक यंत्रणा फिरकली नसल्याने शेतकरी प्रचंड नाराजी व्यक्त करत आहेत. 26 आणि 27 जुलै रोजी कर्जत तालुक्यात अतिवृष्टी झाली. त्यात कर्जत तालुक्यातील …

Read More »

पाली येथील जुन्या पोलीस ठाण्याची भिंत ढासळली

पाली : प्रतिनिधी येथील रामआळीजवळ ब्रिटिशकालीन दगडी इमारतीमध्ये पोलीस ठाणे आणि न्यायालय होते. मुसळधार पावसामुळे या इमारतीची भिंत कोसळली. त्यामुळे येथून जाणार्‍या येणार्‍यांसाठी धोका निर्माण झाला आहे. या ब्रिटिशकालीन चिरेबंदी वास्तूत पोलीस ठाणे आणि न्यायालयासह तहसील व उपलेखा कार्यालय देखील होते. ही सर्व कार्यालये नवीन इमारतीत हालविण्यात आली आहेत. त्यामुळे …

Read More »

निसार तांबोळी पदकाने सन्मानित

पनवेल ः रामप्रहर वृत्त पोलीस खात्यात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांना नुकतेच राज्य पोलीस मुख्यालयात राज्यपालांच्या हस्ते पोलीस मेडलने सन्मानित करण्यात आले. हिंगोली, नांदेड, वर्धा, नंदुरबार, औरंगाबाद, नाशिक तसेच मुंबई येथे निसार तांबोळी यांनी पोलीस खात्यावरील ठिकाणी अतिशय चांगले काम केले. त्यांनी 20 वर्षे पोलीस खात्यात …

Read More »

खोपोली रेल्वेस्थानक मार्गावर खड्डे व पाणीच पाणी

खोपोली : प्रतिनिधी खोपोली परिसरात पावसाचा जोर कायम आहे. येथील रेल्वेस्थानक रोडवर मोठमोठे खड्डे व मोठ्या प्रमाणात  पाणी साचत असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. या पूर्वी डागडुजी म्हणून नगरपालिकेकडून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र मागील चार पाच दिवसातील मुसळधार पावसामुळे येथे टाकलेली खडी व कच पूर्ण वाहून …

Read More »