Breaking News

Monthly Archives: July 2019

बीएसएनएलच्या कारभारावर महाडकरांचा संताप

बिल वेळेवर भरतो मग सेवा का नाही; व्यापारी वर्गाचा संतापजनक सवाल महाड : प्रतिनिधी तालुक्यात भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या सेवेचा गेल्या वर्षभरापासून बोजवारा उडाला असून, या खंडित सेवेमुळे ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत ऐकून घेण्यास स्थानिक पातळीवर अधिकारीदेखील नसल्याने ही सेवा म्हणजे वार्‍यावरची वरात झाली आहे. …

Read More »

नेरळकरांची तहान भागणार

मुख्यमंत्री पेयजल योजनेला पालकमंत्र्यांकडून तत्त्वतः मान्यता कर्जत : बातमीदार नेरळला नवीन पाणी योजना मंजूर करण्यात यावी, यासाठी नेरळ भाजपच्या वतीने पालकमंत्र्यांची भेट घेण्यात आली. त्या वेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत  पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री पेयजल योजनेमधून नेरळ वाढीव नळपाणी योजनेला तत्त्वतः मान्यता दिली. नेरळची लोकसंख्या …

Read More »

आरोग्य हीच खरी संपत्ती!

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे ‘हेल्थ इज वेल्थ’. याचा अर्थ आरोग्य हीच खरी संपत्ती! ते खरंच आहे. आरोग्य निरोगी व सुदृढ असेल, तर माणूस काहीही करू शकतो. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला दैनंदिन धावपळ करावी लागते. नोकरी-व्यवसायातून कुटुंबाची गुजराण करण्यासाठी कष्ट करावे लागतात, मात्र हे करीत असताना अनेकदा स्वत:च्या शरीराची हेळसांड होते. …

Read More »

पेणच्या नील वैद्यची जागतिक स्पर्धेसाठी निवड

पेण : प्रतिनिधी येथील नील योगेश वैद्य नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय सेकंड लेझर-रन स्पर्धेत भारतातून प्रथम आला. या कामगिरीमुळे त्याची जागतिक लेझर-रन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा 6 सप्टेंबर रोजी हंगेरीत होणार आहे. 12 वर्षीय नील वैद्य याने किक बॉक्सिंग, कराटे, जलतरण, धावणे या स्पर्धांसाठी आतापर्यंत स्पेन, दुबई, रशिया, श्रीलंका …

Read More »

भारताचा विदित गुजराती विजेता

बर्न (स्विर्त्झलँड) : वृत्तसंस्था भारताचा ग्रँडमास्टर विदित गुजरातीने अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन करीत एक फेरीआधीच बाएल आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले आहे. अनोख्या पद्धतीने खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत आठ स्पर्धकांना क्लासिकल पद्धतीच्या सात फेर्‍या, जलद बुद्धिबळाच्या सात फेर्‍या आणि ब्लिट्झ पद्धतीच्या 14 फेर्‍या खेळावयाच्या होत्या. क्लासिकल फेरी जिंकणार्‍याला तीन गुण, जलद …

Read More »

रायगडच्या खेळाडूंचे घवघवीत यश

पनवेल : वार्ताहर आठवी राज्यस्तरीय युनिफाइट स्पर्धा कोल्हापूर येथे झाली. या स्पर्धेत युनायटेड शोतोकन कराटे असोसिएशनच्या कामोठे, वेश्वी, ओवळे व उरण या शाखेतील 27 खेळाडू सहभगी झाले होते. त्यांनी 15 सुवर्ण, 7 रौप्य, 5 कांस्य अशा पदकांची लयलूट केली. विजयी खेळाडूंची 30 व 31 ऑगस्ट रोजी पंजाबमधील लुधिया येथील संतान …

Read More »

काँग्रेसचे नेते मारुती देवरेंचा भाजपत प्रवेश

नागोठणे : प्रतिनिधी रोहे तालुका काँग्रेसचा राजीनामा दिलेले मारुती देवरे यांनी मंगळवारी (दि. 30) मुंबईत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी रामचंद्र देवरे, परशुराम तेलंगे, सचिन मोदी यांच्यासह मारुती देवरे यांचे शेकडो समर्थक भाजपत दाखल झाले. भाजपचे ज्येष्ठ नेते संजय कोनकर, युवा नेते …

Read More »

शैक्षणिक साहित्यांचे वाटप व वृक्षारोपण सोहळा

उरण : बातमीदार पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र व मुंबई वेस्ट मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने पेंधर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 64 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांची लागवडही करण्यात आली. या वेळी पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे, खजिनदार शैलेश ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष सुनील …

Read More »

गव्हाण विद्यालयात विद्यार्थ्यांनी केले आकर्षक दिवे

गव्हाण : रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये सालाबादप्रमाणे या वर्षीही दीप अमावास्येनिमित्त विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून विविध आकारांचे आकर्षक दिवे तयार केले. या अत्यंत देखण्या व आकर्षक दिव्यांचे प्रदर्शन या वेळी आयोजित करण्यात आले होते. या दीप प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाच्या …

Read More »

उत्पादन शुल्क विभागाने केली दोन लाखांची गावठी दारू नष्ट

पनवेल : बातमीदार राज्य उत्पादन शुल्क विभाग, पनवेल शहर, पनवेल ग्रामीण आणि भरारी पथकाने संयुक्तरीत्या राबविलेल्या मोहिमेत कर्जत तालुक्यातील बेकरे या गावाच्या हद्दीतील दारूच्या निर्मिती केंद्रावर छापा टाकून अंदाजे दोन लाख किमतीच्या गावठी दारूच्या रसायनांची विल्हेवाट लावली आहे. कर्जत तालुक्यातील बेकरे या गावामध्ये गावठी दारू तयार होत असल्याची माहिती उत्पादन …

Read More »