पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबईतील विक्रोळी येथील विद्या विकास सोसायटी संचलित मटकर संगीत विद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सुगम संगीत स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सीकेटी इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. संगीतकार सुधीर फडके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी 29 जुलै या त्यांच्या स्मृतिदिनी ही स्पर्धा घेतली …
Read More »Monthly Archives: July 2019
गेल वादळ घोंगावले
नवी दिल्ली : वृत्तसंस्था वेस्ट इंडिज संघाचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने कॅनडात सुरू असलेल्या ग्लोबल ट्वेन्टी-20 लीगमध्ये जोरदार फटकेबाजी करीत शतक लगावले. त्याने या वादळी खेळीत 12 षटकार व 7 चौकारांसह 54 चेंडूंत 122 धावा चोपल्या. अर्धशतक होण्यापूर्वी गेल इतका आक्रमक नव्हता. त्याने 28 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर …
Read More »गर्भाशय कॅन्सर रोग निदान शिबिर
पनवेल महापालिकेच्या वतीने आयोजन पनवेल ः प्रतिनिधी महापालिका क्षेत्रातील महिलांच्या गर्भाशयाच्या कॅन्सरचे रोग निदान शिबिर दि. 1 आणि 2 ऑगस्ट रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात येणार असल्याची माहिती महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. महिला व बाल कल्याण समिती व वैद्यकीय आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने …
Read More »पावसाच्या पाण्यावर तयार झालेल्या भाज्या खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल
खोपोली : प्रतिनिधी आदिवासी बांधव पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात भाज्यांची लागवड करतात. यावर्षी पावसाचे आगमन लांबल्यामुळे माळरानावर लावलेली भाजी तयार होण्यास विलंब लागला. मात्र मागील आठवड्यापासून विविध प्रकारच्या रानभाज्या बाजारपेठेत येऊ लागल्या आहेत. पावसाच्या पाण्यावर तयार होत असलेल्या या भाज्या खाण्यासाठी रुचकर आणि चवदार असल्याने त्या भाज्या ग्राहक आवडीने खरेदी करतात. …
Read More »‘त्या’ पर्यटकांचा शोध सुरूच
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील निगडे गावाजवळील निगडी नदीत रविवारी (दि. 28) मुंबई चुनाभट्टी येथील पर्यटक रवी चव्हाण बुडाल्याची घटना घडली होती. अद्यापही त्या बुडालेल्या तरूणांचा तपास लागला नाही. वडखळ पोलीस ठाणे हद्दीतील मुंबई चुनाभट्टी येथील नऊ पर्यटक रविवारी पर्यटनांसाठी निगडे गावाजवळील निगडी नदीकिनारी गेले होते. त्यापैकी काहीजण नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले …
Read More »उमरोली येथे वाहून आले रेल्वेचे स्लीपर आणि खडी
कर्जत : बातमीदार मध्यरेल्वेच्या कल्याण-कर्जत मार्गाच्या बाजूला असलेल्या उमरोली गावातील शेतकर्यांच्या शेतात पावसाच्या पाण्याबरोबर रेल्वेचे स्लीपर वाहून आले असून, रेल्वे मार्गाची खडीदेखील मोठ्या प्रमाणात आली आहे. दरम्यान, महसूल विभागाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. कर्जत तालुक्यातील उमरोली गावातील शेतकरी हिरू बुंधाटे आणि सुरेश बुंधाटे यांची भातशेती गारपोली गावाजवळ आहे. त्यांच्या …
Read More »भिलवले धरणाजवळ पुन्हा आढळली मगर
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील भिलवले धरण पूर्णपणे भरून ओसंडून वहात आहे, त्याच पाण्याच्या प्रवाहातून सोमवारी (दि. 29) चार किलो वजनाची एक मगर बाहेर आली. भिलवले धरणातून यापूर्वी तीन मगरी पकडून वन खात्याकडे सुपूर्द केल्या आहेत. आज पुन्हा पाण्याच्या प्रवाहातून चार किलो वजनाची मगर बाहेर आली. स्थानिक मजूर सोमनाथ वाघमारे, …
Read More »पाली, जांभुळपाडा पुलांवर पुराचे पाणी ; अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, वाहतूक ठप्प, सतर्कतेचा इशारा
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याला गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपले आहे. सोमवारी (दि. 29) अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे वाकण-पाली-खोपोली मार्गावरील पाली व जांभुळपाडा पुलाला पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. दुसर्या दिवशी मंगळवारी (दि. 30) सकाळी 8वाजल्यापासून या पुलावरील पाणी वाढल्यामुळे खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने दोन्ही बाजूची …
Read More »‘ग्राहकांना चांगल्या सोयी-सुविधा पुरविण्यासाठी महावितरण कटिबद्ध’
पनवेल ः वार्ताहर पनवेल शहर व परिसरातील वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करणे तसेच त्यांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी महावितरण कंपनी कटिबद्ध असून यासाठी वेगवेगळ्या योजना तसेच सबस्टेशनच्या माध्यमातून वीजपुरवठा कसा अखंडित होईल याकडे लक्ष असल्याचे पनवेल शहर महावितरण कंपनीचे सहाय्यक कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे यांनी वीज वितरण कंपनीमार्फत सुरू असलेल्या विविध योजनांची …
Read More »पीरकोनचा तुषार म्हात्रे ठरला सर्वोत्कृष्ट लेखक
उरण ः प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवाशक्ती उपक्रमांतर्गत मराठी भाषा दिनानिमित्ताने लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयीन गट, शिक्षक गट आणि खुला गट अशा गटांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. अलीकडेच या स्पर्धेचा निकाल लागला असून रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, जूचंद्र येथील तुषार म्हात्रे यांना शिक्षक …
Read More »