Breaking News

Monthly Archives: July 2019

जिल्हा परिषद शाळा उलवेच्या व्यवस्थापन कमिटीच्या सभापतीपदी भाजपच्या शीतल सोमासे

उलवे ः जिल्हा परिषद शाळा उलवेच्या व्यवस्थापन कमिटीच्या सभापतीपदी भाजपच्या शीतल महेश सोमासे यांची बहुमताने निवड झाली, तसेच उपाध्यक्षपदी भाजपचे अनिल कुंभार हे विजयी झाले. त्याबद्दल भाजपचे ज्येष्ठ नेते एम. डी. खारकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी उलवे सरपंच कविता खारकर, उपसरपंच जगदीश खारकर, दिलीप कोळी, राजू …

Read More »

पनवेलमध्ये स्तनपानाविषयी जनजागृती

पनवेलः बातमीदार गरोदरपणात स्त्रियांच्या मनातील प्रश्न, त्यांच्या समस्या, या दिवसांमध्ये घ्यावयाची काळजी तसेच स्तनपानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी खारघर येथील मदरहूड रुग्णालयाच्या वतीने रविवारी (दि. 28) पनवेल येथे लिटील थिंग्स अबाऊट प्रेग्नन्सी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी पार पडलेल्या या शिबिरात जवळपास 50 जोडप्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या …

Read More »

काव्य दरबाराची वर्षा सहल

उरण ः काव्य दरबार या उरणमधील नावाजलेल्या साहित्यिक संस्थेने चिरले येथे वर्षा सहलीचा व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास जिल्ह्यातील कवी उपस्थित होते. आगरी कवितांचे बादशहा पुंडलिक म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या वेळी प्रकाश ठाकूर, हरिभाऊ घरत, ए. डी. पाटील, राजेंद्र नाईक, काशिनाथ मढवी, हरिश्चंद्र माळी, …

Read More »

हर्षिता भोईरच्या विक्रमाची इंडिया रेकॉर्ड बुकमध्ये नोंद

उरण ः रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील भेंडखळ गावची हर्षिता कविराज भोईर या पाच वर्षांच्या चिमुरडीने राज्यातील सर्वात उंच असलेले कळसुबाई शिखर सर केले होते. याची दखल इंडिया रेकॉर्ड बुकने घेऊन तिला सन्मानित केले आहे. हर्षिता भोईर या पाच वर्षीय चिमुरडीने 7 जून 2019 रोजी राज्यातील सर्वात उंच असलेले कळसुबाई शिखर …

Read More »

जसखारची प्रणाली मढवी जपानमध्ये शास्त्रज्ञ

उरण ः प्रतिनिधी उरणमधील अनेक व्यक्ती विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. अनेकांनी उंच गरुडभरारी घेतली आहे. त्यापैकीच एक असलेल्या जसखार गावातील प्रणाली अशोक मढवी हिने आपल्या मेहनतीच्या व अभ्यासाच्या जोरावर संशोधनात चांगले कार्य केल्याने तिची निवड जपान या देशातील 5-जी कंपनीमध्ये शास्त्रज्ञ म्हणून झाली आहे. प्रणाली मढवीचे शालेय शिक्षण …

Read More »

‘नाते तुमचे आमचे’चे अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त सकाळ वृत्तपत्र समूह आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून ‘सकाळ प्रीमियर नाते तुमचे आमचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांसाठी खेळ पैठणीचा, दिलखुलास गप्पागोष्टी आणि अनेक कलाकारांच्या गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (दि. 29) करण्यात आले होते. याचे उद्घाटन सुप्रसिद्ध कलाकार …

Read More »

कळंबोलीकरांचे भवितव्य एक फेजवर

विजेच्या कमी-जास्त दाबाने विद्युत उपकरणे जळाली; नागरिकांचे नुकसान कळंबोली ः रामप्रहर वृत्त महावितरणच्या कळंबोली विभागाला विजेचे साहित्य पुरविण्यात येत नसल्याने कळंबोलीच्या काही भागात एक फेजवरच विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. तीन फेजचे काम एकच फेज करत असल्याने सतत विजेचा लपंडाव आणि विजेच्या कमी-जास्त दाबाने विजेची उपकरणे जळाली आहेत. त्यामुळे नागरिकांचे …

Read More »

नवी मुंबईत होणार मोठे पक्षांतर?

राष्ट्रवादीच्या 52 नगरसेवकांचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय नवी मुंबई : प्रतिनिधी महत्त्वाच्या नेत्यांचे होणारे पक्षांतर डोकेदुखी ठरले असताना राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या 52 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी (दि. 29) झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय झाला असून, राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक …

Read More »

महाडमध्ये मगरींचा मुक्त संचार?

महाड : प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे पुराच्या पाण्यासोबत मगरीही महाड शहरात आल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. शहरातील गांधारी पूल आणि दस्तुरी नाका परिसरात या मगरी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. महाडला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे शहराजवळील सावित्री, गांधारी, काळ या नद्या दुथडी भरून वाहिल्या. या पुराच्या पाण्यातून सर्प, कीटक …

Read More »

पंतप्रधान मोदींची जंगल सफारी

बेअर ग्रिल्ससोबत ‘डिस्कव्हरी’मध्ये झळकणार नवी दिल्ली : वृत्तसंस्था सतत व्यग्र असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वेगळे रूप लवकरच पाहायला मिळणार आहे. डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ या कार्यक्रमात ते झळकणार आहेत. कार्यक्रमाचा सूत्रसंचालक असलेला साहसवीर बेअर ग्रिल्सने यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली. बेअर ग्रिल्सने ट्विटवरून एक टीझर पोस्ट केला आहे. …

Read More »