पनवेल : रामप्रहर वृत्त अतिवृष्टीमुळे घरात पाणी येऊन नुकसान झालेल्या डोलघर येथील 58 कुटुंबांना भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी आर्थिक मदत केली आहे. या पूरग्रस्तांना घरटी तीन हजार रुपये घरोघरी जाऊन देण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, शुक्रवार व शनिवारी तर वरुणराजाने …
Read More »Monthly Archives: July 2019
नवीन पनवेलमधील पाण्याचा प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा भाजपचा इशारा
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे. अधिकार्यांच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचे हाल होत असल्याने भाजपच्या नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींनी सोमवारी (दि. 29) आक्रमक होत महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या (एमजेपी) अधिकार्यांना धारेवर धरले. नवीन पनवेलमधील पाण्याचा प्रश्न सोमवारपर्यंत न सोडविल्यास एमजेपीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा पनवेल …
Read More »पाण्याची शेती कशी कराल?
जलसंवर्धनासाठी पूरक असलेली आपली पारंपरिक शेती काळाच्या ओघात नष्ट होत असल्यामुळे आता आपल्या सर्वांवर प्रत्यक्ष पाण्याचीच शेती करण्याची वेळ आली आहे. ’पेरलत तरच उगवेल’ हा पारंपरिक शेतीचा मंत्रच या पाण्याच्या शेतीलादेखील लागू होतो. पाण्याची शेती, जी करण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही, ती करणे सर्वसामान्यांसाठी सोपे कसे होईल, हे संगण्यासाठीच पागोळी …
Read More »गुणांचा फुगवटा नकोच
विद्यार्थ्यांना शाळांकडून गुणांची खिरापत मिळण्याचा एक मार्ग म्हणून नव्हे तर भाषा विषयांत लेखीप्रमाणेच तोंडी प्राविण्यही जोखले जाणे योग्यच ठरते. यासंदर्भात झालेल्या इतक्या गदारोळानंतर तरी आता मूळ हेतूकडे दुर्लक्ष न करता शाळांकडून योग्य तर्हेने गुणदान होईल अशी अपेक्षा आहे. कारण गुणांचा अवास्तव फुगवटा अंतिमत: विद्यार्थ्यांवर अनावश्यक ताण वाढवणाराच ठरतो. राज्य शिक्षण …
Read More »बॉक्सिंग चॅम्पियनशिपला खेळाडूंचा प्रतिसाद
बॉक्सिंग चॅम्पियनशिपला खेळाडूंचा प्रतिसाद पनवेल, उरण : वार्ताहर महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने सब ज्युनिअर व ज्युनिअर कन्या चॅम्पियशनशिप जेएनपीटीच्या सहकार्याने उरण येथील जेएनपीटी वसाहत बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला खेळाडूंचा प्रतिसाद मिळाला. बेटी बचाओ बेटी पढावो यावर आधारित बॉक्सिंग स्पर्धेत राज्यातील 300 खेळाडूंनी सहभाग घेतला. यामध्ये रायगड …
Read More »भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदासाठी प्रवीण आम्रेंचा अर्ज
मुंबई : प्रतिनिधी भारतीय संघाच्या फलंदाज प्रशिक्षकपदावरून सध्या कार्यरत असलेल्या संजय बांगरची गच्छंती अटळ असल्याचे म्हटले जात आहे. त्यातच भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू प्रवीण आम्रे यांनी फलंदाज प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे बांगरचे पद धोक्यात आले आहे. ऑगस्ट 2014पासून बांगर भारतीय संघाचा फलंदाज प्रशिक्षक असून, त्याने काही काळ मुख्य प्रशिक्षकपदाची …
Read More »रोहितसोबत मतभेद नाहीत : विराट
मुंबई : प्रतिनिधी अष्टपैलू खेळाडू, उपकर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत बेबनाव असल्याच्या बातम्यांचे कर्णधार विराट कोहलीने सोमवारी (दि. 29) स्वत: खंडन केले. आमच्यात बेबनाव असता, तर आम्ही सेमीफायनलपर्यंतचा पल्ला गाठलाच नसता, असे सांगतानाच या सर्व बातम्या हास्यास्पद असल्याचे विराटने सांगितले. विराटच्या या म्हणण्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही समर्थन केले. वेस्ट इंडिज …
Read More »जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
दुबई ः वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सोमवारी (दि. 29) अधिकृत घोषणा केली. 1 ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेपासून या अजिंक्यपद स्पर्धेचा श्रीगणेशा होणार आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील 14 ऑगस्टपासून सुरू होणारी दोन कसोटी सामन्यांची मालिका आणि भारतीय संघाचा …
Read More »वडखळ ग्रामपंचायतीत वृक्षारोपण व साहित्य लोकार्पण सोहळा
पेण : प्रतिनिधी – ग्रुप ग्रामपंचायत वडखळच्या वतीने सरपंच राजेश मोकल यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत हद्दीत नुकताच वृक्षारोपण कार्यक्रम व जेएसडब्ल्यू कंपनीच्या वतीने विविध वास्तूंचे वाटप व हायमास्ट दिव्यांचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धरमतर पोर्ट जेट्टीचे अधिकारी अनुराग भगौळीवाळ, सी. एस. आर. व्यवस्थापक सुशील पाटील, सरपंच राजेश …
Read More »सर्पमित्रांनी दिले अजगरास जीवनदान
रेवदंडा : फणसाड अभयारण्याला लागूनच असलेल्या ताराबंदर गावातील प्राथमिक मराठी शाळेत रविवारी (दि. 28) सकाळी आठ वाजता नऊ फुट लांबीचा अजगर ग्रामस्थांच्या नजरेस पडला. शाळेच्या पाठीमागील बाजूला या भल्यामोठ्या अजगराने ठाण मांडले होते. या अजगरास पाहून ग्रामस्थांची धावपळ उडाली. त्यांनी लागलीच रेवदंडा येथील संर्पमित्र दुशांत झावरे व सुरज धुमाळ यांना …
Read More »