Breaking News

Monthly Archives: August 2019

रोहे, नागोठणे, महाडमध्ये पाणी शिरले

अलिबाग : प्रतिनिधी सलग दोन दिवस रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यात दोन ठिकाणी दरड कोसळली. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. रोहा तालुक्यातील काही गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे तेथील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. नागोठणे आणि महाडमध्येही पाणी घुसून नुकसान …

Read More »

पाणीपुरवठ्याच्या तक्रारी दूर करा

सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे अधिकार्‍यांना निर्देश नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको वसाहतींमधील पाणीपुरवठ्यासंदर्भात अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 3) बैठक घेऊन आढावा घेतला. या वेळी त्यांनी पाणीपुरवठ्याविषयी नागरिकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या दूर करा, असे निर्देश उपस्थित अधिकार्‍यांना दिले.  सिडको भवनमध्ये झालेल्या बैठकीस स्थायी समिती …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज आरोग्य महाशिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोचे अध्यक्ष, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष, कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 45व्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, रायगड मेडिकल असोसिएशन आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 4) खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात मोफत आरोग्य …

Read More »

रणकीरेड्डी-शेट्टी अंतिम फेरीत दाखल

बँकॉक : वृत्तसंस्था थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी प्रकारात भारताच्या सत्विकराज रणकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने अंतिम फेरीत धडक मारली आहे. जागतिक क्रमवारीत सोळाव्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जोडीने कोरियन प्रतिस्पर्ध्यावर 22-20, 22-24, 21-9 अशी मात केली. 2018 साली सत्विकराज आणि चिराग शेट्टी जोडीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये रौप्यपदक पटकाविले होते. …

Read More »

गेल पुन्हा बरसला!

44 चेंडूंत ठोकल्या 94 धावा ओटावा : वृत्तसंस्था कॅनडाच्या ट्वेन्टी-20 लीगमध्ये ख्रिस गेलचा झंझावात कायम असून, त्याने तुफान फटकेबाजी करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. गेलच्या फटकेबाजीचा या वेळी एडमोंटन रॉयल्स संघाला दणका बसला. व्हॅनकुव्हर नाइट्स संघाने एडमोंटन रॉयल्सविरुद्ध खेळताना 165 धावांचे आव्हान केवळ 16.3 षटकांत पूर्ण केले आणि त्यासाठी …

Read More »

मुंबईचा गुजरातला धक्का

प्रो-कबड्डीत अव्वल स्थानी विराजमान मुंबई : प्रतिनिधी प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात यू मुम्बाने घरच्या मैदानावर अखेरचा सामना खेळत असताना बलाढ्य गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाला पराभवाचा धक्का दिला आहे. चढाईपटू आणि बचाव फळीतल्या खेळाडूंनी केलेल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर मुंबईने या सामन्यात 32-20च्या फरकाने बाजी मारली. गुजरातचा या हंगामातला हा पहिला पराभव ठरला, तर …

Read More »

अण्णाभाऊ साठेंचे स्मारक उभारावे

नगरसेविका संतोषी तुपे यांची मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी व त्यांच्या आठवणी कायम टिकून राहाव्यात यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारावे, अशी मागणी नगरसेविका संतोषी तुपे यांनी केली आहे. दोन ते तीन वर्षापासून त्या यासाठी पाठपुरावा करीत असून …

Read More »

स्वखर्चातून नालेसफाई

नगरसेविका कुसूम पाटील यांचा पुढाकार कळंबोली ः रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी येथे सीकेटी महाविद्यालयाकडे जाणार्‍या रेल्वे उड्डाणपुलाखाली पावसाळ्यात नेहमी पाणी साचते. आता पनवेलमध्ये पाच दिवस सतत पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या पुलाखाली पाणी साचले आहे. यावर उपाययोजना करताना नगरसेविका कुसूम पाटील यांनी स्वखर्चाने यंत्रणा लावून गटारे, नालेसाफाई करून साचलेल्या पाण्याला …

Read More »

भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी कामगार नेते सुरेश पाटील

उरण : भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कामगार नेते सुरेश पाटील यांचे जेएनपीटी हॉस्पिटल व सफाई कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.

Read More »

रायगड जिल्हा परिषद शाळा सावळे आणि माध्यमिक विद्यालय सावळे येथे मोफत वह्यावाटप

पनवेल ः सिडको अध्यक्ष आणि भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे रायगड जिल्हा परिषद शाळा सावळे आणि माध्यमिक विद्यालय सावळे येथे मोफत वह्यावाटपाचा कार्यक्रम शुक्रवारी करण्यात आला. या वेळी आपटा पंचायत समिती सदस्या तनुजा टेंबे, भाजप तालुका उपाध्यक्ष संजय टेंबे, गुळसुंदे …

Read More »