कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेचा उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त नवीन पनवेलमधील सिडको समाजमंदिर येथे कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या वतीने भव्य प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते आणि भाजप महिला मोर्चाच्या रायगड जिल्हा अध्यक्षा कल्पना राऊत यांच्या प्रमुख …
Read More »Monthly Archives: August 2019
पनवेल महापालिका स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे प्रवीण पाटील
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी शनिवारी (दि. 3) झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे प्रवीण पाटील यांची बिनविरोध निवड झाली. विरोधी पक्षाचे बबन मुकादम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी जाहीर केले. पनवेल महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची मुदत 30 जून रोजी …
Read More »श्रावणी सोमवारसाठी केगावचे माणकेश्वर मंदिर सज्ज
उरण ः वार्ताहर अरबी समुद्राचा त्रिवेणी संगम होतो अशा पवित्र ठिकाणी म्हणजेच केगावस्थित उरण तालुक्यात वसलेले माणकेश्वर मंदिर हे शंकराचे स्वयंभू मंदिर आहे. श्रावणी सोमवारसाठी मंदिर व्यवस्थापन सज्ज झाले आहे. सुमारे 400 वर्षांपूर्वी केगाव परिसरातील एक शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत असताना त्याला आपल्या नांगराच्या फळाला रक्त लागलेले आढळले. त्या …
Read More »गुळसुंदे येथे जातीचे दाखले वाटप
पनवेल ः वार्ताहर गुळसुंदे येथे मराठा समाजाच्या जातीच्या दाखल्यांचे वाटप पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या वेळी मराठा समाज समन्वयक विनोद साबळे प्रामुख्याने उपस्थित होते. गुळसुंदे येथे झालेल्या जातीचे दाखले वाटप शिबिरास पनवेल तहसीलचे अधिकारी, प्रभाकर नवाळे, जान्हवी मानकामे (सेतू संचालक पनवेल), सेतू कर्मचारी भाग्यक्षी कांबळे, उज्ज्वला …
Read More »युईएस कॉलेज ऑफ मॅनेजमेंटमध्ये रक्तदान शिबिर
उरण ः रामप्रहर वृत्त राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)अंतर्गत यु. ई. एस. कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड टेक्नॉलॉजी व नागरी संरक्षण दल, उरण यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. युईएसचे अध्यक्ष आर्किटेक्ट तनसुख जैन, उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, सहसचिव चंद्रकांत ठक्कर, खजिनदार विश्वास दर्णे, माजी प्राचार्या व सदस्या स्नेहल प्रधान, …
Read More »पेंधर, खांदा कॉलनीत वह्यावाटप
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे सिडको अध्यक्ष, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पेंधर शाळेतील व खांदा कॉलनीतील गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करण्यात आले. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या सौजन्याने आणि भारतीय जनता पार्टी …
Read More »नेत्रतपासणी शिबिरास पनवेलमध्ये प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त वीर वुमन फाऊंडेशन, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ आणि लक्ष्मी आय इन्स्टिट्युटच्या वतीने पनवेलमधील श्री जैन श्वेतांबर स्थानक येथे नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन शुक्रवारी (दि. 2) करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद लाभला. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, राजू …
Read More »पनवेल शहर व तालुका भाजप महिला मोर्चा
मुख्यमंत्र्यांना पाठविणार सुमारे पाच हजार राख्या पनवेल : रामप्रहर वृत्त रक्षाबंधन पर्व अभियान अंतर्गत पनवेल शहर व तालुका भाजप महिला मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच हजारहून अधिक राख्या पाठविण्यात येणार आहेत. यासंदर्भात गुरुवारी (दि. 1) झालेल्या बैठकीत माहिती देण्यात आली. या वेळी भाजप सदस्य नोंदणी अभियानाचाही आढावा घेण्यात …
Read More »आरोग्य महाशिबिराची जय्यत तयारी
पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोचे अध्यक्ष, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष, कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 45व्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, रायगड मेडिकल असोसिएशन आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (4 ऑगस्ट) खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात होणार्या …
Read More »विरोधकांनी आत्मचिंतन करावे
ईव्हीएमवरून गळे काढणार्यांना मुख्यमंत्र्यांचा टोला वर्धा : प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमुळे भाजपचा विजय झाला, ईव्हीएममध्ये घोळ आहे, असे म्हणत गळे काढणार्या विरोधकांना आत्मचिंतनाची गरज असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने शुक्रवारी (दि. 2) वर्धा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ईव्हीएमवर अविश्वास दाखविणे म्हणजे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper