Breaking News

Monthly Archives: September 2019

विद्यार्थ्यांची स्वच्छता जागृती रॅली

उरण : प्रतिनिधी चिरनेर प्रार्थमिक शाळेच्या वतीने स्वच्छता पंधरवडा व पल्स पोलीओ जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी स्वच्छतेबाबत व लसिकरणाबाबत संदेश देणारे फलक विद्यार्थ्यांनी हाती धरले होते. संपूर्ण चिरनेर गावात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी जनजागृती केली. या वेळी मुख्याध्यापक प्रवीण म्हात्रे व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. …

Read More »

गव्हाणच्या ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये शिक्षक-पालक मेळावा यशस्वी

पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 12 वी (कला व वाणिज्य) शाखेच्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थी-शिक्षक व पालक मेळावा स्थानिक शाळा समितीचे चेअरमन तथा संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत यांच्या …

Read More »

वीर वाजेकर महाविद्यालयात कोरियन विद्यार्थांचा परिसंवाद

उरण : रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मानसशास्त्र विभागाच्या वतीने स्ट्राँग माइण्ड आणि माइण्डसेट या विषयावर दक्षिण कोरियन विद्यार्थ्यांचा परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरख सांगळे होते. या परिसंवादात दक्षिण कोरियातील किम दो क्योम, कियो हाँग व …

Read More »

17 सप्टेंबर राष्ट्रीय कामगार दिन साजरा करावा; बीएमएसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील यांची मागणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय मजदूर संघ (बीएमएस) रायगड युनिटच्या वतीने व जेएनपीटी जनरल कामगार संघटना व जेएनपीटी वर्कर्स युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने जेएनपीटी टाऊनशीप हॉलमध्ये नुकतीच राष्ट्रीय श्रमिक दिनानिमित्त विश्वकर्मा जयंती, विश्वकर्मा पूजन व कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या वेळी जेएनपीटी जनरल कामगार संघटनचे व भारतीय मजदूर संघ (बीएमएस) …

Read More »

महाराष्ट्रात स्थिर सरकार द्या

महाजनादेश यात्रेच्या समारोपप्रसंगी पंतप्रधानांचे आवाहन नाशिक ः प्रतिनिधी गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात चांगली गुंतवणूक, शेतकरी, महिलांचा विकास झाला. भटक्या विमुक्त जाती, मागासवर्गीय जनतेला आवाज मिळाला. पूर्ण बहुमत नसतानाही महाराष्ट्रात प्रगतशील सरकार भाजपच्या रूपात मिळाले. गेल्या 60 वर्षांत पहिल्यांदा देशात स्थिर सरकार आले. हे केवळ फडणवीस सरकारचे रिपोर्ट कार्ड नाही. जनतेने …

Read More »

नवीन पनवेलमधील भुयारी पूल ऑक्टोबरपासून वाहतुकीस खुला

पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधून जुन्या पनवेलकडे (तक्का) जाण्यासाठी सुरू असलेले भुयारी मार्गाचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे पूर्ण झाले असून हा मार्ग ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुरू होईल. या भुयारी मार्गामुळे नवीन पनवेलसह विचुंबे, उसर्ली परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे. नवीन पनवेलमधील सेक्टर 15, 15 ए, …

Read More »

खा. सुनील तटकरे समर्थक नगराध्यक्षाला महिलांकडून चोप

श्रीवर्धन ः प्रतिनिधी पतसंस्थेत ठेवीदारांचे पैसे गुंतवलेले असूनही ते देण्यास टाळाटाळ करणार्‍या राष्ट्रवादीच्या नेत्याला ठेवीदारांनी चोप दिला. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते नरेंद्र तथा अप्पा भुसाणे हे श्रीवर्धन नगरपालिकेचे नगराध्यक्षही आहेत. पतसंस्थेमध्ये ठेवीदार आपल्या कष्टाची कमाई जमा करतात, पण भुसाणे व्यवस्थापक असलेल्या पतसंस्थेमध्ये ठेवलेले पैसे गेल्या कित्येक महिन्यांपासून मिळत नसल्याने ठेवीदारांचा …

Read More »

ग्रामीण भागाला विकासाची भेट

पनवेल ः प्रतिनिधी कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणी व पाठपुराव्यानुसार ग्रामीण भागातील विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून तब्बल 19 कोटी रुपयांची आणखी विकासकामे होणार आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम निधीतून वरची करंबेळी गावात अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे (10 लाख रुपये), खैरवाडी गावात अंतर्गत रस्ता …

Read More »

तु. ह. वाजेकर विद्यालयात मोफत वह्यावाटप

उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे येथे बुधवारी (दि. 18) गरजू विद्यार्थ्यांना धुतुम गावाचे सुपुत्र आणि प्रसिद्ध उद्योगपती धनाजी ठाकूर यांच्यातर्फे मोफत पाठ्यपुस्तके व वह्यावाटप करण्यात आले. वह्यावटपाबरोबर इयत्ता नववी, दहावी आणि अकरावी सायन्स पाठ्यपुस्तकाचे प्रत्येकी 10-10 संच विद्यालयातील ग्रंथालयास भेट दिले. …

Read More »

उरण नगर परिषदेच्या साखरचौथ गणपतीचे विसर्जन

उरण : प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उरण नगर परिषदेमध्ये अधिकारी, कर्मचारी वर्गातर्फे दीड दिवसाचे साखरचौथ गणपती बसविण्यात आले होते. नगर परिषदेमधील दीड दिवसाच्या साखरचौथ गणपतीचे उरण शहरातील विमला तलावात मोठ्या थाटामाटात विसर्जन करण्यात आले. या साखरचौथ गणपतीचे मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, वरिष्ठ लिपिक के. जी. जाधव, महेश लवटे, …

Read More »