निवड समिती पर्यायांच्या शोधात मुंबई : प्रतिनिधी यष्टीरक्षक ऋषभ पंतचा फलंदाजीतील ढासळलेला फॉर्म हा गेल्या काही दिवसांमधला भारतीय संघासाठीचा चिंतेचा विषय ठरला आहे. विश्वचषकात भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर निवड समितीने आगामी ट्वेन्टी-20 विश्वचषकासाठी पंतला पसंती देणार असल्याचे स्पष्ट केले. यानंतर विंडीज दौर्यात पंतला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये संधी देण्यात आली, …
Read More »Monthly Archives: September 2019
कुस्तीत सुरेखा वाघमारे सरस
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या कर्जत तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत तिघर शाळेतील सुरेखा शंकर वाघमारे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तिची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. रायगड जि. प. शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी पावसाळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते. यात विविध खेळांचा समावेश असतो. यंदा कर्जत तालुकास्तरीय …
Read More »धोनीचा क्रिकेटमधील टाइम संपलाय : गावसकर
मुंबई : प्रतिनिधी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चा जोरावर असतानाच माजी कसोटीपटू सुनील गावसकर यांनी याबाबत आपले मत मांडले आहे. ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील धोनीचा टाइम आता संपलाय. टीम इंडियाने आता त्याच्या पलीकडे पाहायला हवे,’ असे गावसकर यांनी म्हटलंय. एका वृत्तवाहिनीशी बोलताना गावसकर यांनी हे वक्तव्य केले. ‘धोनीच्या मनात …
Read More »गणेश मोन्नाक यांची अध्यक्षपदी निवड
मुरूड : राजपुरी ग्रुप ग्रामपंचायतची तहकूब ग्रामसभा सरपंच हिरकणी गिदी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आली. या सभेत महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी समाजसेवक गणेश मोन्नाक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गणेश मोन्नाक 2008 ते 2017 पर्यंत तंटामुक्ती समितीचे सदस्य, तर 2018 पासून उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी सागर रक्षक …
Read More »बॉक्सर अमित पंघल फायनलमध्ये
एकतरिनबर्ग (रशिया) ः वृत्तसंस्था भारताचा बॉक्सरपटू अमित पंघलने शुक्रवारी (दि. 20) इतिहास रचला. जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या सेमीफायनलच्या सामन्यात कझाकस्तानच्या साकेन बिबोसिनोवचा 3-2 असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली; तर दुसरीकडे भारताच्या मनीष कुमारला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. भारताच्या अमित पंघल (52 किलो) आणि मनीष कौशिक (63 किलो) …
Read More »कळंब येथे वीज अंगावर पडल्याने आदिवासी तरुण जखमी
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यात बुधवारी (दि. 18) सायंकाळी विजांच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस झाला. त्या वेळी भागूचीवाडी कळंब येथील आदिवासी तरुणाच्या अंगावर वीज कोसळली. त्यात जखमी झालेल्या तरुणावर कळंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. कळंब ग्रामपंचायत हद्दीमधील भागूचीवाडी येथील शंकर हरी निरगुडा (वय 35) हा शेतकरी बुधवारी संध्याकाळी …
Read More »टेबल टेनिस स्पर्धेस भरघोस प्रतिसाद
अनिशा, दजांग एकेरीचे विजेते पनवेल : रामप्रहर वृत्त लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. ही स्पर्धा नवीन पनवेल येथील सिडको समाजमंदिरात खेळली गेली. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते रायगड …
Read More »प्रत्येक घरात पाणी पोहचले पाहिजे
अॅड. महेश मोहिते यांची अधिकार्यांना बैठकीत सूचना; 26 गाव पाणीपुरवठा योजना रोहे ः प्रतिनिधी तालुक्यातील 26 गाव पाणीपुरवठा योजनेत समाविष्ट असलेल्या सर्व गावांना या योजनेचे पाणी पोहचत नाही, त्याची संबंधित अधिकार्यांनी गंभीर दखल घ्यावी. या कामात अडथळे येत असतील, तर पोलीस संरक्षण घेऊन ते दूर करावेत. या पाणीपुरवठा योजनेतील शेवटच्या …
Read More »रसायनीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी
मोहोपाडा ः वार्ताहर श्री समर्थ सामाजिक संस्था रसायनी व लोना इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोपाडा वावेघर झोपडपट्टी येथे आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी एमजीएम हॉस्पिटल कामोठेतर्फे स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, सर्जन, नेत्ररोग अशा तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले. त्याचप्रमाणे ब्लड ग्रुप, सीबीसी, …
Read More »कैदी सुधार वेल्फेअर फाउंडेशनची आढावा बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये कैदी सुधार वेल्फेअर फाउंडेशनच्या माध्यमातून मार्गदर्शनपर विशेष आढावा बैठक घेण्यात आली. प्रसंगी संघटना विस्ताराच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय अध्यक्ष आणि महिला राष्ट्रीय अध्यक्ष या प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली. विशेष म्हणजे संघटनेची दोन्हीही महत्त्वाची पदे पनवेलमध्ये देण्यात आली. या वेळी राष्ट्रीय अध्यक्षपदी मुनिरभाई तांबोळी, तर महिला राष्ट्रीय अध्यक्षपदी …
Read More »