Breaking News

Monthly Archives: October 2019

अलिबागमध्ये काँग्रेसकडून दोन उमेदवार

राजेंद्र ठाकूरांपाठोपाठ अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर यांचा अर्ज अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाकडून उमेवारी मिळवण्यावरून ठाकूर कुटुंबात सुरू असलेले वाद चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेसने अधिकृत उमेदवार म्हणून रायगड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा अ‍ॅड. श्रध्दा ठाकूर यांना उमेदवारी दिली.  शुक्रवारी (दि. 4) त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी …

Read More »

ब्राह्मण सभा आयोजित भोंडला रंगला

नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्त ब्राह्मण सभा, नवीन पनवेल यांच्या वतीने भोंडला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नवीन पनवेल येथील आंध्र कला केंद्राच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात पनवेल परिसरातील महिला व मुलींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. हादग्याची गाणी गात फेर घरून नृत्य करून महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला. सूर्याचा हस्त नक्षत्रात …

Read More »

भेंडखळ येथे मोफत आरोग्य शिबिर

पनवेल ः रामप्रहर वृत्त नवतरुण नवरात्र उत्सव मंडळ भेंडखळ आणि डॉ. आर.एन. पाटील, सुरज हॉस्पिटल, सानपडा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार (दि. 2) म्हातार आळी, भेंडखळ येथे मोफत आरोग्य शिबिर झाले. श्री. नवतरुण नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यक्षम व समाजकार्याची आवड असलेले सदस्य अनिल ठाकूर यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. सकाळी …

Read More »

पुरस्कार स्वरूपात मिळालेल्या रोपाची विद्यार्थ्यांकडून लागवड

मोहोपाडाः वार्ताहर चौक येथील गुणगौरव व पुरस्कार सोहळ्यात मिळालेल्या रोपांची लागवड शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांसोबत करून शिक्षकांनी पर्यावरणाचा जागर केला. दिलासा फाऊंडेशन दरवर्षी तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांचा गुणीजन गुणगौरव पुरस्कार देऊन गौरव करते. यंदाही 18 शिक्षकांना गौरविण्यात आले. पुरस्कार सोहळ्यात सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळाच्या जोडीने पुष्पगुच्छाच्या ऐवजी औषधी रोपांचे वाटप करण्याची प्रथा …

Read More »

आयडीबीआयमधील ठेवी सुरक्षित ; अफवांवर विश्वास ठेवू नका -अजयसिंह ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त जुने पनवेल येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेत बँकेचा 56वा स्थापना दिवस नुकताच साजरा करण्यात आला. स्थापना दिवसाचे औचित्य साधून ग्राहकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबिरासाठी युनिकेअर हेल्थ सेंटरचे सहकार्य लाभले. आयडीबीआय बँकेतील ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहेत. भारत सरकारने नुकतीची नऊ हजार 300 कोटींची …

Read More »

स्त्री शक्तीतर्फे मुद्रा लोन कार्यशाळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त स्त्री शक्ती फाऊंडेशन आणि घाटी मराठी संघटना महाराष्ट्र पोलीस मित्र समन्वय समिती नवी मुंबई आयोजित मुद्रा लोन प्रत्यक्ष कार्यशाळा व मार्गदर्शन मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे वर्षा भोसले, संचालिका  सीताराम रोकडे, सिडकोमा रघुवंशी, राहुल हनुवंते, खादी ग्रामोद्योग अधिकारी धनंजय गायकवाड, प्युअर करिअर संचालक …

Read More »

बारावीच्या विद्यार्थ्यांना आवेदनपत्र प्रदान

पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमधील इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी 2020 या परीक्षेला प्रविष्ठ होणार्‍या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्याचा शुभारंभ विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाला. रयत …

Read More »

कर्मवीरांचे शैक्षणिक कार्य दूरदर्शी; शताब्दी महोत्सवप्रसंगी सागर रंधवे यांचे प्रतिपादन

पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्यातील गोरगरीब, उपेक्षित, वंचित बहुजनांच्या शैक्षणिक प्रगतीची अध्वर्यु असलेल्या आणि आशिया खंडातील अव्वल दर्जाची एकमेवाद्वितीय असलेल्या रयत शिक्षण संस्थेचा स्थापनेचा शताब्दी महोत्सव साजरा होत असताना पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील आणि सौ. लक्ष्मी वहिनींच्या असीम त्यागाने तमाम बहुजनांच्या भावना ओथंबलेल्या असून कर्मवीरांचे दूरदर्शी शैक्षणिक कार्य 100व्या …

Read More »

नवी मुंबईत काँग्रेसला खिंडार ; दशरथ भगत समर्थकांसह भाजपमध्ये

नवी मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसचे नेते, नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि माजी जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनी सहकार्‍यांसह गुरुवारी (दि. 3) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे नवी मुंबईत काँग्रेसला खिंडार पडले आहे. वाशी येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे नेते संजय उपाध्याय, माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार …

Read More »

उरण विधानसभा मतदारसंघातून महेश बालदी आज अर्ज भरणार

उरण : वार्ताहर जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी शुक्रवारी (दि. 4) आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उरण विधानसभा मतदारसंघात विकासकामांच्या जोरावर त्यांनी झंझावात निर्माण केला आहे. आमदार नसतानाही महेश बालदी यांनी कोट्यवधी रुपयांची कामे करून जनतेची मने जिंकली आहेत. त्यामुळे त्यांना जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून, त्यांचा विजय निश्चित असल्याची खात्री …

Read More »