पनवेल ः रामप्रहर वृत्त नवरात्र मित्र मंडळ व कमळ महिला मंडळ भंगारपाडा यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त हळदीकुंकू समारंभाचे गुरुवारी (दि. 3) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रसिद्ध सिनेअभिनेत्री वर्षा उसगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, पंचायत समिती …
Read More »Monthly Archives: October 2019
खानावमध्ये शेकापला खिंडार ; शेकापमधील कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाला लागलेली गळती कायम आहे. खानाव येथील शेकापच्या अनेक कार्यकर्त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक …
Read More »सुपारीचे नुकसान, भात पिकावर करपा
कोकणाला सुमारे 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला असून या सागरी किनार्याला लागून उंच अशा नारळी पोफळीच्या मोठ्याच मोठ्या बागा दिसून येतात. कोकणातील लोकांचे मुख्य पीक म्हणजे भातशेतीबरोबरच नारळ व सुपारी पिकावर त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो. घराच्या शेजारी बागायात जमीन व तिथे उंच अशा नारळ सुपारीच्या बागा अस्तित्वात आहेत. कडक उन्हातसुद्धा …
Read More »पर्यावरणाचे ठेकेदार!
संपूर्ण अभ्यासाअंती अचूक आराखड्यांनिशी पुढे जाणारा मेट्रो प्रकल्प आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. अशा वेळी केवळ स्वार्थी राजकारणासाठी त्याला विरोध करणे हा खरा आंधळेपणा आहे. पर्यावरण आणि विकास ही हातात हात घालून चालणारी सख्खी भावंडे आहेत. या भावंडांच्या दरम्यान तेढ निर्माण करण्याने सवंग लोकप्रियता मिळेल, परंतु विकास मात्र कैक योजने …
Read More »सुधागड किल्ल्यावरील भोराई देवी
पाली : प्रतिनिधी सुधागड किल्ल्यावरील श्री भोराई देवी तालुक्याचे शक्तिपीठ मानण्यात येते. अश्विन नवरात्रीमध्ये तालुक्यातील भाविक देवीच्या दर्शनासाठी किल्ल्यावर गर्दी करतात. सध्या त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. सुधागड किल्ल्यावर प्राचीन काळातील श्री भोराई देवीचे मंदिर आहे. या देवीची स्थापना भृगऋषींनी केली आहे. म्हणून या देवीला भृगअंबा, भोरंबा, भोराई अशी नावे …
Read More »आम्ही प्लास्टिक वापरणार नाही, गावातही वापरू देणार नाही
मेंदडी गावात प्लास्टिकबंदी जनजागृती फेरी म्हसळा : प्रतिनिधी आम्ही प्लॉस्टिक वापरणार नाही आणि गावातही वापरू देणार नाही, अशा घोषणांनी मेंदडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावात फेरी काढून प्लास्टिकबंदीविषयी जनजागृती केली. या वेळी मुलांनी चौक सभा घेऊन प्लास्टिक आपल्या गावाकडील वातावरणाला कसे घातक आहे, ते सांगितले. या वेळी स्वच्छतेची व …
Read More »चांदोरे बौद्धवाडीत एकास मारहाण
आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल माणगाव : प्रतिनिधी किरकोळ कारणावरून चांदोरे बौध्दवाडी (ता. माणगाव)मधील एका इसमाला तिघा जणांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि. 2) संध्याकाळी घडली. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांदोरे बौद्धवाडी येथील फिर्यादी अनंत तुळशीराम तांबे (40) यांनी मंगळवारी (दि. …
Read More »धुळीत हरवला नागोठणे-वाकण मार्ग
Exif_JPEG_420 नागोठणे : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गाच्या नागोठणे ते वाकण या तीन किलोमीटर अंतरात पावसाळ्यात चिखलातून वाट काढत जाणार्या वाहनांना आता रस्त्यावर होणार्या धुळीला सामोरे जाऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. याबाबत संबंधित कामाच्या ठेकेदार कंपनीचे एक अधिकारी एस. एम. स्वामी यांना विचारले असता, या रस्त्यावर दररोज पाणी मारून रस्ता ओला ठेवण्याचा …
Read More »लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी
मुरूड : प्रतिनिधी नांदगाव परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुरूड पोलिसांनी योगेश यशवंत तळेकर याला अटक करून मुरूड न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. अंगणामध्ये काही लहान मुली खेळत असताना योगेश तळेकर याने एका मुलीस जबरदस्तीने एकांतात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, …
Read More »जिल्ह्यातील कुपोषण कमी करायचे आहे -जिल्हाधिकारी
कर्जत : बातमीदार रायगड जिल्ह्यातील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात कुपोषण आहे. ते कमी करण्यासाठी नियोजनबद्ध काम सुरू आहे. कर्जतप्रमाणेच इतरत्रही कुपोषित बालकांसाठी उपचार केंद्रे सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी येथे केले. जिल्हा नियोजन मंडळाने दिलेल्या निधीमधून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात बाल उपचार केंद्र सुरू …
Read More »