Breaking News

Monthly Archives: October 2019

पनवेलमध्ये दिवाळीच्या खरेदीला आलेल्यांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

पनवेल : प्रतिनिधी दिवाळी खरेदीसाठी पनवेल शहरात आलेल्या 30पेक्षा जास्त जणांचे एका पिसाळलेल्या श्वानाने लचके तोडल्याची घटना रविवारी (दि. 27) दुपारी घडली. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेले बहुसंख्य जण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. सुटीचा दिवस आणि नरकचतुर्दशीचा मुहूर्त साधून रविवारी दुपारी अनेक जण कुटुंबासह पनवेलमध्ये खरेदीसाठी आले होते. …

Read More »

शत्रुत्वाची भावना संपवा -मोदी ‘मन की बात’मधून पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’द्वारे देशातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या वेळी पंतप्रधानांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि देशाच्या एकतेचा उल्लेख करीत अयोध्या प्रकरणावर भाष्य केले. दिवाळीचा प्रकाश सर्वदूर पसरवत शत्रुत्वाची भावना समाप्त करून टाका, असा बंधुभाव आणि प्रेमाचा संदेश दिला. पंतप्रधान मोदी …

Read More »

‘इसिस’चा म्होरक्या बगदादीचा अमेरिकेकडून खात्मा

वॉशिंग्टन : अवघे जग इस्लाममय करण्याची स्वप्ने पाहणार्‍या आणि निष्पाप नागरिकांच्या कत्तली करीत सुटलेला इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरिया अर्थात इसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याचा अमेरिकेने खात्मा केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली. यापूर्वी त्यांनी सकाळी ‘काही तरी मोठे घडलेय’ अशा …

Read More »

परतीच्या पावसाचे पाणी शेतात

मोहोपाडा : प्रतिनिधी पावसाच्या लांबलेल्या मुक्कामामुळे बळीराजाला लुटले असून, शेतात भाताचे उभे पीक आडवे झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.खालापुरात भातपिकाचे लागवड क्षेत्र सरासरी 3000 हेक्टर आहे. या वर्षी 2754 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली होती. सदर क्षेत्रापैकी हळवे व निमगरवे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून गरवे क्षेत्र अल्प …

Read More »

सिडकोच्या उर्वरित 272 सदनिकांसाठी अर्ज नोंदणी सुरू

नवी मुंबई : सिडको वृत्त सिडकोच्या व्हॅली शिल्प आणि सीवूड् इस्टेट या गृहनिर्माण योजनांतील मिळून शिल्लक 272 सदनिकांसाठी अर्ज नोंदणीचा प्रारंभ शनिवारी (दि. 26) दुपारी 2.00 वा. सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते करण्यात आला. सदर 272 सदनिका या उच्च उत्पन्न आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी उपलब्ध आहेत. …

Read More »

अनंत कर्वे ः 55 वर्षे कंदील बनविणारा अवलिया

सेवा निवृत्तीचा काळ म्हणजे आराम, भटकंती. पण 74वर्षीय अनंत कर्वे यांनी स्वतःला आपल्या आयुष्यातील एका जुन्या छंदाने झपाटले आहे. टाकाऊपासून टिकाऊ आणि त्यातही आकर्षक वस्तू बनविणारे कर्वे यांना उतारवयात हा छंद वयाचे भान विसरायला लावतो. दरम्यान, या छंदातून त्यांनी हस्तकला आणि टिकाऊ वस्तूंचा खजिना उभा केला आहे. 39 वर्षे नोकरी …

Read More »

वरुणराजाची बळीराजावर अवकृपा

दिवाळी आली, ऑक्टोबर संपायला आला तरी पाऊस जाण्याचे नाव घेत नाही. परतीचा पाऊस झोडपतच आहे. कोकणात भातशेती हे मुख्य पीक घेतले जाते. यंदा सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यामुळे पीक चांगले आले. लावणीसाठी पावसाची वाट पाहावी लागली नाही, पण भातपीक हाताशी आले व शेतकर्‍यांच्या हातचा घासच निघून गेला आहे. पावसामुळे शेतकर्‍यांची …

Read More »

चोरीला गेलेले दागिने मिळाले परत

पाली ः प्रतिनिधी बहुतांश वेळेला चोरीला गेलेल्या ऐवजावर अनेकांना पाणी सोडावे लागते. मात्र सुधागड तालुक्यातील पाली येथील विशाल शिंदे यांच्या घरातील चोरीला गेलेला ऐवज पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे  मिळाला. आपल्या चोरीला गेलेल्या दागिन्यांवर पाणी सोडून दिलेल्या विशाल शिंदे यांना सुखद अनुभव  मिळाला आहे. विशाल नामदेव शिंदे (रा. हरिओम वास्तू सोसायटी, समर्थ नगर …

Read More »

मुरूड वाचनालयातर्फे दिवाळी पहाट

मुरुड ः प्रतिनिधी  येथील सार्वजनिक वाचनालय आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष अनिल कारभारी यांच्या हस्ते झाले. ही दिवाळी पहाट मैफल रंगली. रसिकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. या वेळी उपाध्यक्ष केदार गद्रे, कार्यवाह विनय मथुरे, संस्कृती समिती अध्यक्ष अस्मिता पेंडसे, नितीन पाटील, निवास रसाळ, ग्रंथपाल संजय भायदे, ज्येष्ठ गायक रवींद्र …

Read More »

मानवाधिकार संघटनेकडून पालिका सफाई कामगारांना फराळ वाटप

मुरुड जंजिरा ः वार्ताहर             मुरुड नगर पारिषदेतील सफाई कर्मचार्‍यांना दिवाळीनिमित्त मानवाधिकार संघटनेकडून दिवाळी फराळ व त्यांच्या मुलांसाठी वही, पेन अशा शालोपयोगी वस्तूंचे वाटप नगरपरिषद आवारात रविवारी (दि.27)करण्यात आले. मुरुड शहराची स्वछता अबाधित राखण्याचे काम सफाई कर्मचारी करीत असतात. अत्यंत तुटपुंज्या पगारात शहराची स्वछता राखण्याचे ते काम करीत असल्याने यंदा सफाई …

Read More »