उधाणामुळे सुरुच्या बनालाही धोका मुरूड : प्रतिनिधी मुरुड शहराला तीन किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. मात्र पावसाळ्यातील मोठ्या भरतीमुळे धुप्रतिबंधक बंधारा फुटून मुरुड समुद्र किनार्याचे मोठे नुकसान झाले आहे. सुरुच्या झाडांची वनेसुध्दा नष्ट होत आहेत. लाटांसोबत वाहून येत असलेल्या कचर्यामुळे मिनी गोवा म्हणून परिचित असलेल्या मुरूडच्या समुद्र किनार्याला बकाल स्वरूप …
Read More »Monthly Archives: November 2019
दोन तासांत चोरट्याला केले जेरबंद
अलिबाग : प्रतिनिधी चेंढरे येथील बाफनाबाग परिसरात चोरी करून पळ काढणार्याला अलिबाग पोलिसांनी अवघ्या दोन तासात जेरबंद केले. त्याच्याकडून चोरून नेलेला मुद्देमालही हस्तगत केला. नागडोंगरी येथील बाफनाबाग सोसायटीतून पाण्याचा पंप आणि दुर्मिळ पितळी घंटा चोरीला गेली होती. या संदर्भात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. पोलीस निरीक्षण के. डी. …
Read More »माणगाव संगमेश्वर मंदिरात ‘त्रिपुरारी’
माणगाव : प्रतिनिधी येथील श्री स्वयंभू संगमेश्वर मंदिरात मंगळवारी (दि. 12)त्रिपुरारी पौर्णिमा भक्तीभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मंदिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाविकांनी शिवशंकराची मनोभावे प्रार्थना केली. मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजयअण्णा साबळे व सर्व ट्रस्टी यांनी भक्तगणांचे स्वागत केले. मंगळवारी प्रसाद खरे, सचिन गोरेगांवकर, व सहाकार्यांनी मंदिराच्या …
Read More »‘वाचनालय हे त्या शहराचा चेहरा’
कर्जत : प्रतिनिधी वाचनालयावरून त्या शहराची किंवा गावाची संस्कृती समजते, म्हणूनच वाचनालय हे त्या शहराचा चेहरा असतो. मराठी भाषेतील शब्दांचे अर्थ विविध आहेत. ते गुगल सर्च करून कळणार नाहीत तर त्यासाठी शब्दकोश वापरले पाहिजेत असे प्रतिपादन प्रा. संध्या शहापुरे यांनी येथे केले. कर्जतमधील लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालयाचे शतक महोत्सवी वर्ष सुरू …
Read More »मुरूड आयटीआयचे स्थलांतर
नूतन इमारतीत वर्ग भरण्यास सुरुवात मुरुड : प्रतिनिधी पंधरा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मुरुड येथील औद्योगीक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सोमवारी (दि. 11) नवीन स्वतंत्र इमारतीत स्थलांतरीत झाली आहे. मुरुड आयटीआय गेल्या 15वर्षापासून शहरातील सर एस. ए. हायस्कूलच्या एका हॉलमध्ये सुरू होते. दरम्यान, शहरातील एका टेकडीवर असलेल्या दत्त मंदिराच्या परिसरात या आयटीआयची …
Read More »नेरळमध्ये त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त रोषणाई
कर्जत : बातमीदार त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नेरळ येथील श्री कुसुमेश्वर मंदिरात मंगळवारी (दि. 12) रात्री दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. श्री समर्थ सेवा संघाच्या वतीने कुसुमेश्वर मंदिर परिसर शेकडो दिव्यांनी उजळवून टाकण्यात आला होता. नेरळ गावातील कुसुमेश्वर मंदिर पुरातन असल्याच्या नोंदी आहेत. या मंदिरात मंगळवारी रात्री त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन …
Read More »रेवदंड्यात नागाला दिले जीवदान
रेवदंडा : प्रतिनिधी चौल भगवती-नवगाव येथील गजानन राऊत यांच्या घराच्या पाठिमागे असलेल्या बिळांमध्ये साप आढळल्याने परिसरातील सर्वांचीच धावपळ व घबरगुंडी उडाली. कोणीतरी चौलमधील सर्पमित्र स्वप्नील ठाकूर यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून बोलावून घेतले. स्वप्नील ठाकूर लागलीच घटनास्थळी पोचले. त्यांनी बिळाचे भेावती खड्डा मारून सापाला बाहेर काढण्यास यश मिळविले. अंदाजे साडेपाच फुट …
Read More »मुरुड तालुक्यातील चिचघर धरण बेवारस
मुरुड : प्रतिनिधी शहरापासून 15 किमी अंतरावर असलेल्या चिचघर धरणाकडे लघुपाटबंधारे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष्य झाले आहे. त्यामुळे हे धरण ओसाड व असुरक्षीत झाले आहे. प्रामुख्याने शेतीला पाणी पुरविण्यासाठी 1988साली चिचघर धरणाची उभारणी करण्यात आली होती. या धरणाची गेल्या अनेक वर्षापासून डागडूजी करण्यात आलेली नाही. धरणाच्या भिंतीवर मोठमोठी झाडे रुजलीत आहेत. …
Read More »स्केटिंग स्पर्धेत ‘गुरुकुल’चे यश
मोहोपाडा : प्रतिनिधी रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन याक पब्लिक स्कूल येथील स्केटिंग रिंकवर करण्यात आले होते. यामध्ये चौक येथील श्रीस्वामीनारायण गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. श्रीस्वामीनारायण गुरुकुलचा शेल सणस या विद्यार्थ्याने 17 वर्षांखालील क्वाड या गटात तीन रौप्यपदके, तर देव पटेल याने 14 …
Read More »श्रीराम स्पोर्ट्स असोसिएशनचे राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत यश
रेवदंडा : प्रतिनिधी पुणे येथे नुकत्याच झालेल्या 39व्या राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील श्रीराम स्पोर्ट्स असोसिएशनच्या मल्लखांब खेळाडू यांनी सुयश प्राप्त केले आहे. महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना व पुणे जिल्हा मल्लखांब संघटना यांच्या सयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करताना सागमळा येथील श्रीराम …
Read More »