पनवेल : बातमीदार नेरूळ येथून पामबीचमार्गे पनवेल येथे जाणार्या तरुणांच्या मोटरसायकलला उरणच्या दिशेने जाणार्या भरधाव एसटी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकल चालविणारा तरुण ठार, तर अन्य दोघे जबर जखमी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री किल्ला जंक्शन येथे घडली. या अपघातातील दोघा जखमी तरुणांवर अपोलो रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातप्रकरणी …
Read More »Monthly Archives: November 2019
कळंबोलीत चोरीप्रकरणी दोघांना अटक
पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फायर ब्रिगेडजवळ ट्रेलर आणि त्यातील मालासह 20 लाख रुपयांची चोरी करणार्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल परत मिळवण्यात आला आहे. कळंबोली फायर ब्रिगेडजवळ 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता चालक सोपान वनखेडे याने उभा करून ठेवलेला ट्रेलर (एमएच 46-एच …
Read More »कर्जत तालुक्यात त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात, डोलकाठीचे भाविकांना आकर्षण
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील किरवली, हालीवली, वांजळे आदी गावांमध्ये त्रिपुरारी पौर्णिमा यात्रा स्वरूपात साजरी करण्यात येते. किरवली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा उत्साहात पार पडली. किरवली – देऊळवाडी येथे देवाची डोलकाठी नाचविली जाते. त्याचे आकर्षण भाविकांना असते यंदासुद्धा तरुण ग्रामस्थांनी ही डोलकाठी हनुवटीवर, दातांवर, कपाळावर, हातावर ठेऊन नाचविली. नवसाला पावणार्या …
Read More »भरदिवसा घरफोडी करणार्यांच्या मुसक्या आवळल्या
सराईत गुन्हेगार अटकेत सात लाख 27 हजारांचा मुद्देमाल हस्तगत पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार दिवसाढवळ्या घरफोडी करणार्या सराईत गुन्हेगारांना खांदेश्वर पोलिसांनी पकडून सात लाख 27 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नवी मुंबई आयुक्तालय हद्दीत भरदिवसा घरफोडीच्या घटना घडू लगाल्याने नागरिकांत घबराट पसरली होती. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संजीवकुमार, सहआयुक्त …
Read More »पालीत सार्वजनिक स्वच्छतागृहांची वानवा; नागरिक, भाविकांची कुचंबणा
पाली : प्रतिनिधी पाली हे सुधागड तालुक्याचे मुख्यालय आहे, तसेच धार्मिक स्थळदेखील आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिक खरेदी, शासकीय कामे करण्यासाठी तसेच विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी, रुग्ण दवाखान्यासाठी पालीत येतात. तीर्थक्षेत्र असल्याने पालीत भाविकांचा राबतादेखील नियमित असतो. मात्र सार्वजनिक स्वच्छतागृहे नसल्याने विशेषत: महिलांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे पालीत महत्वाच्या ठिकाणी …
Read More »देव होण्याचा प्रयत्न करा -इंदुरीकर महाराज
कर्जत : प्रतिनिधी जगात सर्वात पवित्र गोष्ट म्हणजे ज्ञान, आई-बापाची सेवा जो करतो त्याने देवाला गेलेच पाहिजे असे नाही. स्वतःचा धर्म पाळणे हीच देवाची पूजा. देव पाहू नका देव होण्याचा प्रयत्न करा, असे मार्गदर्शन ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून येथे केले. कर्जत तालुक्यातील हलीवली येथील भैरवनाथ मंदिरामधील काकड …
Read More »शिहूत सांडपाण्यामुळे भातशेती धोक्यात; शेतकर्यांचा आरोप
नागोठणे : प्रतिनिधी येथील रिलायन्स कंपनीतून धरमतर खाडीकडे सांडपाणी वाहून नेणार्या पाईपलाईनला शिहू ग्रामपंचायत हद्दीतील आटीवली, गांधे भागात गळती लागली असल्याने काहीअंशी हातात आलेली भातशेती नष्ट होण्याची भीती शेतकर्यांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत रिलायन्स कंपनीच्या एका जबाबदार अधिकार्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी त्यांचा भ्रमणध्वनी न उचलल्याचे कंपनीकडून कोणत्याही प्रकारची …
Read More »खोपोलीत आरोग्यसेवेचे तीन तेरा, रुग्णालयात सुविधा निर्माण होण्यासाठी स्वाक्षरी मोहीम
खोपोली : प्रतिनिधी नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात आवश्यक सोयी सुविधा व रुग्णालय अद्यावत होण्यासाठी आत्ता सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याचे निश्चित केले आहे. नगरपालिका व संबंधित व्यवस्थेवर दबाव वाढविण्यासाठी शहरातील नागरिकांना बरोबर घेण्यात येणार असून, त्यासाठी स्वाक्षरी मोहीम ही सुरू होणार आहे. खोपोली नगरपालिका रुग्णालयात मागील काही दिवसांपासून विविध गैरसुविधा …
Read More »साजगावच्या जत्रेत पेणची सुकी मच्छी
पेण : प्रतिनिधी खोपोली जवळील साजगाव येथे सुरु झालेल्या बोंबल्या विठोबाच्या यात्रेत पेण कोळीवाड्यातील कोळी बांधवांनी सुक्या मच्छीची दुकाने थाटली असून, या दुकानांतील पेणच्या सुक्या मच्छीला वाढती मागणी आहे. ‘धाकटीपंढरी’ म्हणून ओळख असलेल्या विठोबा मंदिर परिसरात कार्तिकी एकादशीपासून यात्रेला सुरुवात झाली असून, ती पंधरा दिवस चालणार आहे. या जत्रेत सुकीमच्छीचा …
Read More »एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला
खालापूर : प्रतिनिधी सावरोली – खारपाडा मार्गावर धामणीनजीक स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशिन फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला असून, चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे. खालापूर हद्दीत धामणी गावानजीक विश्वनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम केंद्र आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याचे तसेच संध्याकाळी हा भाग निर्मनुष्य …
Read More »