Breaking News

Monthly Archives: November 2019

पंतला निवड सार्थ ठरवावी लागेल, नाहीतर… -लक्ष्मण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऋषभ पंतचा फलंदाजीतील खालावलेला फॉर्म आणि यष्टींमागची सुमार कामगिरी हा चर्चेचा विषय ठरला आहे. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर निवड समितीने महेंद्रसिंह धोनीला डावलून पंतला अधिक संधी देण्याचा निर्णय घेतला, मात्र वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश दौर्‍यात पंतने निराशाजनक कामगिरी केली. यानंतरही पंतची …

Read More »

भारताकडून यष्टीरक्षण करण्यासाठी मी सज्ज -संजू सॅमसन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऋषभ पंतची यष्टींमागे होत असलेली सुमार कामगिरी आणि फलंदाजीतील अपयश पाहता निवड समितीने बांगलादेश दौर्‍यात संजू सॅमसनला संघात जागा दिली, मात्र एकही सामना न खेळवता निवड समितीने विंडीजविरुद्ध मालिकेत सॅमसनला वगळले. या निर्णयावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे निवड समितीने …

Read More »

चौथ्या क्रमांकासाठी अय्यर चांगला पर्याय – प्रसाद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर कोणता फलंदाज येणार यावरून बराच उहापोह झाला, मात्र भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समितीला याचे ठोस उत्तर न मिळाल्यामुळे भारतीय संघाला वर्ल्डकपमध्ये याचा फटका बसला. या स्पर्धेनंतर निवड समितीने पुन्हा एकदा …

Read More »

राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत निलांश, अमिन व प्रथम अजिंक्य

मुंबई : प्रतिनिधी राज्य क्रीडा व युवक संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्या विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय कॅरम स्पर्धेच्या मुले ऐकरीच्या विविध तीन गटांतील (14, 17 व 19 वर्षाखालील मुले) विजेते अनुक्रमे मुंबईचा निलांश चिपळूणकर, अमिन अख्तर अहमद व प्रथम करिहार (नागपूर) यांनी विजेतेपद पटकाविले. …

Read More »

दीपिका, अंकिता यांना ऑलिम्पिकचे तिकीट

बँकॉक : वृत्तसंस्था भारताच्या दीपिका कुमारी हिने बँकॉकयेथे सुरू असलेल्या 21व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेत महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात सुवर्ण जिंकले, अंकिता भक्त हिने रौप्यपदकाची कमाई केली. यासह दोघींनीही टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले. विशेष म्हणजे स्पर्धेची अंतिम फेरी भारतीय खेळाडूंमध्येच रंगली. उपखंडातील देशांसाठी ही पात्रता फेरी होती. त्यातून तीन जागांचा कोटा …

Read More »

इचलकरंजीचा मुलगा बनला भारतीय खो-खो संघाचा कर्णधार

मुंबई : प्रतिनिधी नेपाळमधील काठमांडू शहरात 1 ते 10 डिसेंबरदरम्यान दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेसाठी भारताच्या राष्ट्रीय खो-खो संघाच्या कर्णधारपदी इचलकरंजीच्या बाळासाहेब पोकार्डे याची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे. आंतरराष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सहभागी होण्याची बाळासाहेब पोकर्डेची ही तिसरी वेळ आहे. तो …

Read More »

भारताविरुद्ध पोलार्डकडे धुरा, विंडीज संघाची घोषणा, अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन

केपटाऊन : वृत्तसंस्था वेस्ट इंडिज संघाच्या आगामी भारत दौर्‍यासाठी टी-20 आणि वन-डे संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. 6 डिसेंबरपासून विंडीजच्या भारत दौर्‍याला सुरुवात होईल. या दौर्‍यात दोन्ही संघ प्रत्येकी तीन टी-20 आणि वन-डे सामने खेळतील. अपेक्षेप्रमाणे किएरॉन पोलार्डकडे विंडीजच्या संघाचे नेतृत्व देण्यात आलेले असून, काही जुन्या आणि अनुभवी खेळाडूंनीही संघात …

Read More »

पाली येथे सायरनमुळे दरोड्याचा प्रयत्न फसला

पाली : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात चोर्‍या व घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत असताना पाली येथे एका ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसल्याची घटना घडली आहे. दरोडा टाकताना कुलपाला लावलेला सायरन वाजल्याने दरोडेखोरांचीच भंबेरी उडून त्यांनी तेथून पळ काढला. हा फसलेला दरोडा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात टिपला गेला आहे.  पाली बाजारपेठेत मुख्य रहदारीच्या …

Read More »

पोलादपूरमध्ये बैलदिवाळीनिमित्त मर्दानी खेळाचा थरार

पोलादपूर : प्रतिनिधी दक्षिण भारतात जलिकट्टू आणि युरोपियन देशांमध्ये बुलफाईट सर्वांना ज्ञात असताना पोलादपूरच्या ग्रामीण भागात बैलदिवाळीच्या पारंपरिक मर्दानी खेळाचे आकर्षण चाकरमानी आणि स्थानिकांमध्ये आजही कायम आहे. दिवाळीनंतर मंगळवारी देवदिवाळी झाली आणि ग्रामदैवतांचा कौल घेऊन देणे देऊन बुधवारी मार्गशीर्ष प्रतिपदेला बैलदिवाळीची प्रथा सुरू झाली. पोलादपूर तालुक्याच्या ग्रामीण भागाने जपलेली ही …

Read More »

आदर्श घोटाळ्याची पुन्हा चौकशी

मुंबई : प्रतिनिधी कुलाबा येथील आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेतील घोटाळ्याची सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता काँग्रेसचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे, मात्र त्यापूर्वीच पुन्हा एकदा ‘आदर्श’ची चौकशी सुरू झाल्याने …

Read More »