Breaking News

Monthly Archives: December 2019

‘एनपीआर’ होणार अद्ययावत, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला केंद्राची मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी)वरून चर्वितचर्वण सुरू असतानाच केंद्र सरकारने राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला (एनपीआर) अद्ययावत करण्यास मंजुरी दिली आहे. एनपीआर अंतर्गत देशातील नागरिकांचा डेटाबेस तयार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे एनपीआर म्हणजे नागरिकत्वाचे प्रमाण नसेल. एनपीआरची यादी अद्ययावत करण्यास मंजुरी देण्याबरोबरच …

Read More »

मद्यधुंद पाटर्यांमध्ये विनापरवाना गाणी वाजवण्यास बंदी

मुंबई : प्रतिनिधी ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागत पाटर्यांच्या आयोजनासाठी विविध हॉटेल्स, पब्ज आणि रेस्तराँ सज्ज झाले आहेत, मात्र अशा ठिकाणी होणार्‍या मद्यधुंद पाटर्यांमध्ये विनापरवाना गाणी वाजवण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. हायकोर्टाने आदेशात म्हटले की, शहरातील हॉटेल्स, पब्ज व रोस्तराँत ख्रिसमस आणि सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी …

Read More »

नववर्षात धावणार माथेरानची मिनीट्रेन, मध्य रेल्वेकडून जोरदार हालचाली

कर्जत : संतोष पेरणे आबालवृद्ध पर्यटकांची लाडकी माथेरानची राणी अर्थात नेरळ-माथेरान मिनीट्रेन या वर्षी पावसाळ्यात माथेरानच्या डोंगरात झालेल्या भूस्खलनामुळे वाहून गेलेला नॅरोगेज मार्ग दुरुस्त करण्याच्या कामासाठी बंद आहे. ही मिनीट्रेन पुन्हा सुरू व्हावी याकरिता मध्य रेल्वे प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. नवीन वर्षात ती सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, …

Read More »

देशात लवकरच मिथेनॉलमिश्रित इंधन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पेट्रोलियम मंत्रालयास सूचना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात लवकरच मिथेनॉलमिश्रित इंधन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे जोरदार प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत. इंधन आयातीवरील खर्चामध्ये लक्षणीय कपात व वाहनांमुळे होणार्‍या प्रदूषणात घट हा दुहेरी लाभ यातून साध्य होईल, असा सरकारला विश्वास आहे. या अनुषंगाने देशभरातील पेट्रोलपंपांवर मिथेनॉल उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना केंद्रीय …

Read More »

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाला मंजुरी

नवी दिल्ली : केंद्रीय सुरक्षा समितीने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. स्वातंत्र्यदिनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीडीएस पदाची निर्मिती करण्याची घोषणा केली होती. तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वय राखण्याबरोबरच सीडीएसवर लष्करी विषयांवर सरकारला सल्ला देण्याची जबाबदारी असणार आहे. लष्कराच्या विविध मोहिमांमध्ये समन्वय राखण्याबरोबरच …

Read More »

सुकापूर भगतवाडी (पनवेल) : जय अंबे माता मंडळाच्या वतीने प्रथमच आगरी कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव आदी सोबत होते. या वेळी मंडळाचे अध्यक्ष भगवानशेठ …

Read More »

सूर्यग्रहण पाहण्याची माथेरानला पर्वणी

कर्जत : बातमीदार येत्या गुरुवारी (दि. 26) होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण दक्षिण भारतातून दिसणार आहे, तर काही ठिकाणीसुद्धा खंडग्रास स्थितीत साधारण 85% सूर्य झाकोळला गेलेला पहायला मिळेल. या ग्रहणाबद्दल लहान मुलांमध्येदेखील उत्सुकता असून, माथेरानच्या प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर शाळेतील विध्यार्थ्यांना ही खगोलशास्त्रीय पर्वणी अनुभवता येणार आहे. एका वर्षात जगभरात साधारणपणे दोन …

Read More »

संकटांवर मात करून हिमतीने उभे राहा

सिंधुताई सपकाळ यांचा विद्यार्थ्यांना संदेश पेण : प्रतिनिधी चटके बसल्याशिवाय आयुष्य काय आहे, हे कळत नाही, म्हणून जीवनात संकटांवर मात करून हिमतीने उभे राहा, असा संदेश  निराधारांची माय सिंधुताई सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना दिला. महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त पेण येथील  सार्वजनिक विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज येथे संस्थेच्या वतीने सिंधुताई सपकाळ …

Read More »

पर्सेसिन पद्धतीच्या मासेमारीविरोधात आक्षी साखर खाडीत पारंपरिक मच्छीमारांचे आंदोलन

अलिबाग : प्रतिनिधी एलईडी दिव्यांच्या सहाय्याने पर्सेसिन पद्धतीने चालणार्‍या मासेमारीवर तात्काळ बंद घालण्यात यावी, या मागणीसाठी 3 जानेवारी 2020 रोजी अलिबाग तालुक्यातील आक्षी साखर खाडीत पारंपरिक मच्छिमार आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात जिल्ह्यातील एक हजार मच्छीमार बोटी सहभागी होतील, अशी माहिती रायगड जिल्हा पारंपरिक मच्छीमार संघर्ष समिती तर्फे मंगळवारी (दि. …

Read More »

क्षुल्लक कारणावरून दोन कुटुंबांत हाणामारी

तीन जण किरकोळ जखमी महाड : प्रतिनिधी महाड शहराजवळील सुंदरवाडीमधील दोन शेजार्‍यांमध्ये क्षुल्लक कारणावरून सोमवारी (दि. 23) जोराचे भांडण झाले. या वेळी हाणामारी आणि विनयभंग झाल्याने महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हर्षल अशोक तुपट आणि राजेंद्र महादेव तुपट हे दोघे सुंदरवाडी येथे शेजारी राहतात. सोमवारी दुपारी …

Read More »