Breaking News

Monthly Archives: December 2019

भाजपमध्ये पुन्हा ‘इनकमिंग’

कोल्हापुरातील महाडिक बंधूंच्या हाती ‘कमळ’ कोल्हापूर : प्रतिनिधीशिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिला होता, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जीवावर राज्यात सत्ता आणेल, असा शब्द त्यांनी बाळासाहेबांना दिला होता का? असा शब्द बाळासाहेबांना दिला असता, तर त्यांनी तो खपवून घेतला नसता, असे सांगतानाच मी पाहिलेले …

Read More »

‘आरटीपीएस’मध्ये रंगला क्रीडा महोत्सव

खारघर : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल (आरटीपीएस)मध्ये रविवारी (दि. 22) वार्षिक क्रीडा महोत्सव रंगला. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, तर पारितोषिक वितरण भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. …

Read More »

दिघाटीत प्रवेशद्वार, बसथांब्याचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील दिघाटी येथे महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे साकारलेल्या बसथांब्याचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 23) करण्यात आले. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक पोलीस …

Read More »

विद्यार्थ्यांनाही मिळणार स्मार्टकार्ड पास, उरण आगारात लावले सूचना फलक

उरण : वार्ताहर विद्यार्थ्यांना शिक्षण सवलती करिता देण्यात येणारा प्रवाशी पास 1 जानेवारी 2020 पासून  स्मार्ट कार्ड मध्ये रुपांतरीत होणार आहे. तर सध्या अस्तित्वात असणारा कागदी पास हा 31 डिसेंबर 2019  पर्यंतच वैध्य असणार आहे. त्यामुळे अशा सूचना देणारा फलक उरण एसटी डेपो मध्ये लावण्यात आला आहे. गेल्या 70 वर्षा …

Read More »

पनवेल बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी मनोज भुजबळ

पनवेल : बातमीदार पनवेल बार असोसिएशन या वकिलांच्या संघटनेच्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक आणि वकील मनोज भुजबळ यांनी बाजी मारत दुसर्‍यांदा अध्यक्षपदावर बसण्याचा मान मिळविला. उपाध्यक्ष संदीप जगे यांना मनोज भुजबळ यांनी पराभूत केले. पनवेल बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले. पनवेल बार असोसिएशनची निवडणूक यापूर्वी कधी नव्हे ती पहिल्यांदाच चर्चेत …

Read More »

शिवसेनेकडून मराठी माणसाचा विश्वासघात, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची घणाघाती टीका

महाड : प्रतिनिधी हे राज्य सरकार कोकणाचं नाही किंवा मराठी माणसाचं नाही. सत्तेसाठी शिवसेनेने कोकण आणि मराठी माणसाचा विश्वासघात केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी सोमवारी (दि. 23) महाड येथे केला. महाड येथे आमदार प्रवीण दरेकर यांचा सोमवारी जाहीर सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत …

Read More »

‘न्यू होरायजन’चे स्नेहसंमेलन रंगले

पनवेल : रामप्रहर वृत्त न्यू होरायजन पब्लिक स्कूल आणि पेंग्विन किड्स, पनवेल या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन गुरुवारी (दि. 19) व शुक्रवारी (दि. 20) झाले. ’निरंतर’ असे या सोहळ्याचे नामकरण करण्यात आले होते. या सोहळ्याला संस्थेच्या संस्थापक विश्वस्त सुवरा बॅनर्जी तसेच खजिनदार श्रीजीत भट्टाचार्य यांची उपस्थिती होती. संस्थेच्या नवी मुंबईतील विविध …

Read More »

नवीन वर्षात रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना भेट!

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल रेल्वे स्थानक स्थानीय सल्लागार समितीची बैठक बुधवारी (दि. 18) पनवेल रेल्वे स्थानकावर कमिटीचे चेअरमन मिनाजी-डी. सी. एम (गुड्स) मुंबई, पनवेल रेल्वे स्थानक प्रमुख व कमिटीचे कार्यवाह नायर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.  सर्व रेल्वे विभागामधील रेल्वे क्रॉसिंग गेट बंद करण्याच्या व अपघातमुक्त प्रवासी धोरणानुसार पनवेल रेल्वे स्थानकाजवळील …

Read More »

आदिवासी विद्यार्थिनींची मोफत आरोग्य तपासणी

पनवेल : रामप्रहर वृत्त शासकीय अनुदानाशिवाय चालविल्या जाणार्‍या युसूफ मेहरअली सेंटरच्या आदिवासी वसतिगृहातील आदिवासी मुलींची पनवेल विभागीय (ग्रामीण) डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने रविवारी (दि. 22) मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.  युसूफ मेहरअली सेंटरचे व्यवस्थापन समिती सदस्य सुरेश रासम यांच्या पुढाकाराने आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी रासम यांनी वसतिगृहाच्या उभारणीमागची सेंटरची भूमिका …

Read More »

नेत्रतपासणी शिबिरास पाले खुर्दमध्ये प्रतिसाद

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट व ईशान्य फाऊंडेशन यांच्या सहकार्याने शुक्रवारी (दि. 20) पाले खुर्द, तालुका पनवेल येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या ग्रामीण भागातील 316 नागरिकांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली. यामध्ये 82 नागरिकांना मोतीबिंदूच्या तक्रारी दिसून आल्या, तसेच 168 नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले असून 42 नागरिकांना …

Read More »