विधानसभा हे लोकशाहीचे महामंदिर आहे. जनता जनार्दन हीच त्याची स्वयंभू सार्वभौम देवता. प्रतिनिधी हे त्या देवतेचे उपासक. त्या उपासकांचे सेवासाधनेचे संवाद म्हणजेच विधिमंडळातील चर्चा. सत्ता आणि सेवा, विरोध आणि विनोद, शक्ती आणि युक्ती, वाद आणि संवाद, कर्तृत्व आणि वक्तृत्व, मान आणि इमान, नय आणि विनय, निष्ठा आणि प्रतिष्ठा, सवाल आणि …
Read More »Yearly Archives: 2019
…अन्यथा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट; भाजपचा शिवसेनेला निर्वाणीचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी सत्तावाटपाच्या अर्ध्या-अर्ध्या फॉर्म्युल्यावर अडून बसलेल्या शिवसेनेला भाजपने अखेर निर्वाणीचा इशारा दिला आहे. येत्या 7 नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे भाजपने म्हटले आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास सत्ता भाजपच्याच हाती राहणार असल्याने शिवसेना आता काय निर्णय घेते हे पाहावे लागणार आहे. विधानसभा …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांचा पुढाकार; श्वान निर्बिजीकरण केंद्र सुरू होणार
पनवेलः प्रतिनिधी/बातमीदार पनवेलमध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने 40हून अधिक जणांचा चावा घेतल्यानंतर निर्बिजीकरण केंद्र सुरू करण्याची सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. त्यानुसार निर्बिजीकरण केंद्र व त्याचबरोबर निर्बिजीकरण प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. निर्बिजीकरण केंद्र सुरू करण्यासाठी नव्याने कंत्राटदार नेमण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया पार पाडली. निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद न …
Read More »मुरूडचा समुद्रकिनारा उद्ध्वस्त होण्याची भीती
कोकणाला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. किनार्याची धूप, लाटांच्या मार्यामुळे दिवसेंदिवस उन्मळून पडणारी उंच सुरूची झाडे, उधाणासोबत वाहून आलेला कचरा, बसण्यासाठी बांधलेल्या सिमेंटच्या बाकांची दुर्दशा अशी स्थिती आहे मिनी गोवा म्हणून परिचित असलेल्या मुरूडच्या समुद्र किनार्याची. समुद्रकिनारा या पर्यटनवृध्दी होणार्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याकडे गांभीर्याने कोणीही लक्ष …
Read More »वेगवान उपाययोजना हवी
अनेक मानवनिर्मित वस्तू व कृतींमुळे पृथ्वीभोवतीच्या वातावरणात घातक वायूंचे उत्सर्जन होत असून परिणामस्वरुपी पृथ्वीवरील तापमानात वाढ होते आहे. या तापमानवाढीमुळे दोन्ही धु्रवांवरील हिमनग तसेच उंच पर्वतराजींवरील हिमावरण मोठ्या प्रमाणात वितळत असून समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये त्यामुळे वाढ होऊ लागल्याचे गेल्या अनेक वर्षांत आढळून आले आहे. येत्या अवघ्या 30 वर्षांत देशाची आर्थिक …
Read More »दिवाळीत 112.3 डेसिबल ध्वनी प्रदूषणाची नोंद
हरित फटाके संकल्पनेला नागरिकांचा प्रतिसाद; 15 वर्षांतील सर्वात कमी प्रदूषण अलिबाग : प्रतिनिधी राज्यात दिवाळी उत्साहात साजरी झाली असली तरी यावर्षी कानठळ्या बनवणार्या फटाक्यांचा आवाज अत्यंत कमी प्रमाणात ऐकायला मिळाला. गेल्या 15 वर्षांतील सर्वात शांत दिवाळी यंदा सर्वत्र साजरी झाल्याचे निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून दिवाळीतील ध्वनी प्रदूषण …
Read More »खालापूर तहसीलदारांचे शासकीय वाहन भंगार अवस्थेत; नवीन वाहनाची प्रतिक्षा
खोपोली : प्रतिनिधी तालुक्याचा कारभाराची जबाबदारी असलेल्या खालापूर तहसीलदारांचे शासकीय वाहन दोन वर्षापासून बंद असून, वर्षभरापूर्वी मागणी करूनही त्यांना अद्याप नवीन वाहन मिळालेले नाही. खालापूर तालुका वेगाने विकसित होत आहे. मोठे गृहप्रकल्प, कारखानदारीचा पसारा वाढत आहे. 2011च्या जणगणनेनुसार खालापूरची लोकसंख्या 2,07464 होती. त्यात आता प्रचंङ वाढ झाली असून तालुका विस्तारत …
Read More »कर्जत रेल्वेस्थानकातील पंखे गायब
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या कर्जत या महत्वाच्या स्थानकात लावण्यात आलेले पंखे रेल्वे प्रशासनाने काढून टाकले आहेत. त्यामुळे ऑक्टोबर हीटमध्ये या स्थानकात प्रवाशांवर घामाघुम होण्याची वेळ आली आहे. दरम्यान, त्याबाबत कर्जत पॅसेंजर असोसिएशनने रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून जाब विचारण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जत रेल्वे स्थानकात दक्षिणेकडे जाणार्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस …
Read More »राष्ट्रीय एकता दौडला अलिबागकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अलिबाग : प्रतिनिधी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा पोलीस दलातर्फे गुरुवारी (दि. 31) अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय एकता दौडला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती 31 ऑक्टोबर रोजी देशभरात साजरी होते. यानिमित्ताने जिल्हा पोलीस दलामार्फत अलिबाग शहरात एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग …
Read More »रायगडाला पावसाने झोडपले
अलिबाग : प्रतिनिधी दिवाळीत चार दिवस सुट्टीवर गेलेल्या पावसाने नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी रायगडकरांना भिजविले. शुक्रवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह अचानक आलेल्या या पावसाने रायगडकरांची तारांबळ उडविली. काही काळ तो चांगलाच रमला. येत्या 24 तासात रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यंदाचा मोसमी पाऊस उशिराने सुरू झाला आणि ऑक्टोबरनंतरही त्याचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper