माणगाव : प्रतिनिधी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून रोज दुपारनंतर विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळत असून, त्यामुळे भाताच्या पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्यांकडून करण्यात येत आहे. पावसाची सर्व नक्षत्रे संपल्यानंतर दीपावलीपूर्वी पाऊस जाणे अपेक्षित होते, मात्र यंदा दीपावली संपल्यानंतरही …
Read More »Yearly Archives: 2019
रेवदंड्यात दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू
रेवदंडा : प्रतिनिधी चालकाचे नियत्रंण सुटल्याने मंगळवारी (दि. 5) दुपारी रेवदंडा बायपास रस्त्यावरून जाणारी दुचाकी घसरून झाडावर आदळली. या अपघातात दुचाकीस्वार जबर जखमी होऊन मृत्यू पावला. रेवदंडा मोठे बंदर येथील येशुदास जॉन फर्नांडिस उर्फ बाबू हा मंगळवारी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून (एमएच-06, बीसी-4624) रेवदंडा बायपासने जात होता. एका …
Read More »हायवेवरील बॅनर्स धोकादायक
खोपोली : प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग अथवा राज्यमार्गावर जाहिरातींचे लावलेले बॅनर्स जीवितहानी अथवा अपघाताला कारणीभूत ठरू शकतात. मुंबई-पुणे महामार्गावरील चौक हद्दीतील कर्जत फाटा येथे बॅनर लावण्यासाठी अनेक लोखंडी स्ट्रक्चर उभे आहेत. त्यातील एका स्ट्रक्चरवरील बॅनर पूर्णपणे फाटून तो हवा येईल तसा लटकून फिरत आहे. त्यामुळे तो कधी तुटेल व कुठे पडेल …
Read More »निधी मंजूर होऊनही कामे रखडली
खोपोली : प्रतिनिधी खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई फाटा ते ताकई गाव आणि पंत पाटणकर चौक ते मोगलवाडी या दोन प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाकडून साडेनऊ कोटींचा निधी ऑगस्ट महिन्यात मंजूर झाला आहे, मात्र निधी मंजूर होऊन चार महिने होत आले तरीही अद्याप या दोन्ही रस्त्यांवर कोणत्याही कामांना सुरुवात …
Read More »वन डेत 50ऐवजी दोन डाव 25-25 षटकांचे असावेत
सचिन तेंडुलकरचे मत नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वन डे क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये एका मोठ्या बदलाची गरज बोलून दाखवली आहे. आधुनिक काळात प्रेक्षकांचे हित आणि महसुलाच्या दृष्टीने क्रिकेटमध्ये नवनवीन गोष्टी अवलंबल्यामुळेच खेळ आणखी समृद्ध होईल, असे सचिन म्हणाला. काळानुसार वन डे क्रिकेटमध्ये बदलाची गरजही त्याने बोलून दाखवली. वन …
Read More »लुईस हॅमिल्टन सहाव्यांदा जगज्जेता!
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मर्सिडिझच्या लुइस हॅमिल्टनला अमेरिकन ग्रां. प्रि. फॉर्म्युला-वन शर्यतीत दुसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले तरी त्याने सहाव्यांदा जगज्जेतेपदावर आपले नाव कोरले. यासह हॅमिल्टनने मायकेल शूमाकरच्या सात जगज्जेतेपदांच्या विक्रमाच्या दिशेने कूच केली आहे. मर्सिडिझच्या वाल्टेरी बोट्टासने सुरुवातीपासूनच शर्यतीवर नियंत्रण मिळवत विजेतेपद पटकाविले. त्याचे हे या मोसमातील चौथे, तर …
Read More »‘धोनीला निवृत्तीचा सामना मिळायलाच हवा’
मुंबई ः प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेले काही दिवस महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीविषयीची चर्चा सुरू आहे. विश्वचषकानंतर धोनीने क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. निवड समितीनेही आगामी मालिकांमध्ये ऋषभ पंत पहिली पसंती असेल, असे म्हणत धोनीला सूचक इशारा दिला, मात्र धोनीसारख्या खेळाडूला त्याच्या लौकिकाला साजेसा निवृत्तीचा सामना मिळायलाच हवा, असे मत प्रसिद्ध समालोचक हर्षा …
Read More »केपीएलमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंग
क्रिकेटपटूला अटक बंगळुरू : वृत्तसंस्था मॅच फिक्सिंगचे भूत पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटमध्ये समोर आले आहे. आयपीएलच्या धर्तीवर सुरू झालेल्या कर्नाटक प्रीमियर लीग (केपीएल)मध्ये मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. याआधी केपीएलशी जोडल्या गेलेल्या एका टीमच्या प्रशिक्षकालाही अटक करण्यात आली होती. बंगळुरूमध्ये भारतीय क्रिकेटपटू निशांत सिंह शेखावत याला …
Read More »दुर्लक्षित गडकिल्ल्यांचे होणार संवर्धन प्रकल्प स्वराज्य अंतर्गत गडकिल्ल्यांचे रूपडे पालटणार
पनवेल : बातमीदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडातील किल्ले संरक्षित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्रकल्प स्वराज्य अंतर्गत राबविण्यात येणार्या या उपक्रमाची जबाबदारी रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्यावर देण्यात आली. यासाठी पनवेलच्या शिवसह्याद्री संस्थेने पुढाकार घेतला आहे. रायगड जिल्ह्यात एकूण 64 गडकिल्ले आहेत. यापैकी काही किल्ले राज्य …
Read More »कळंबोळीजवळ महामार्गावर ट्रॅव्हल्सचा गराडा
पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील कळंबोली येथे असलेल्या मॅकडोनल्डच्या समोरील महामार्गावर मोठ्या प्रमाणात खाजगी ट्रॅव्हल्स गाड्यांचा गराडा पडलेला असून यामुळे येथून वाहन चालविताना मोठे जिकिरीचे बनले असून यातूनच एखाद्या दिवशी मोठा अपघात घडून नाहक प्रवासी या गाड्यांखाली चिरडले जाण्याची शक्यता असताना सुद्धा वाहतूक शाखा याबाबत पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याबाबत प्रवासी वर्गाकडून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper