प्रत्येक मुलामुलींनी जी मुलं आपल्या आई-वडिलांचा अपमान करतात, पानउतारा करतात, क्षुल्लक कारणावरून रागवतात त्यांनी विचार करावा, त्यांच्यासाठी आपल्या आई-वडिलांनी काय काय सोसलंय याची जाणीव व्हावी, हा या लेखामागील हेतू आहे. एका मध्यमवर्गीय मुलाच्या जीवनातील कहाणी आहे. मुलाला दहावीच्या परीक्षेत 93 टक्के गुण मिळाले. मुलाचे वडील त्या खुशीने आनंदित होत, मार्कलिस्ट …
Read More »Yearly Archives: 2019
घासून पुसून आली, पण महायुतीच!
महाराष्ट्राच्या 14व्या विधानसभेसाठी सोमवार, 21 ऑक्टोबर 2019 रोजी भारताच्या मुख्य निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणूक घेतली. हरयाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतील अनुक्रमे 90 आणि 288 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. तशाच काही ठिकाणी पोटनिवडणुकाही घेण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयनराजे भोसले निवडून आले होते. त्यांनी भारतीय जनता …
Read More »आयुक्तांसोबत पत्रकारांनी केला दिवाळी फराळ
पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या साथीने पनवेल परिसरातील पत्रकारांनी दिवाळी फराळ करून एक आगळीवेगळी परंपरा जोपासली. नेहमीच महानगरपालिका प्रशासन व पत्रकार यांच्यामध्ये विविध विषयांवरून साधक-बाधक चर्चा होत असतात, तर कधी कधी राग-रुसवेसुद्धा होतात. हे सर्व त्या-त्या व्यक्तीच्या कामानिमित्त असते. जो तो आपल्याकडे असलेली जबाबदारी पार पाडत …
Read More »खोपोलीत झाड कोसळून नुकसान
खोपोली ः प्रतिनिधी सुसाट्याचा वारा व सतत कोसळत असलेल्या पावसामुळे शुक्रवारी सकाळी खपोलीतील वासरंग गावातील रहिवासी चाळीवर भलेमोठे झाड कोसळले. झाड कोसळल्याने दोन घरांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही. या घटनेची माहिती स्थानिक नगरसेवक मंगेश दळवी व नितीन मोरे यांनी खोपोली नगरपालिका, अग्निशमन दल …
Read More »पनवेल आगारातील उरण प्रवासी शेडवरील होर्डिंग धोकादायक
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल एसटी स्थानकावरील उरणला जाणार्या गाड्यांच्या प्रवासी शेडवरील जाहिरातीच्या होर्डिंगचे पत्रे लोंबकळत असल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका असल्याचे दिसून येत आहे. उरणला जाणार्या प्रवाशांना कडक उन्हात किंवा पावसात गाडीची वाट पाहत तासन्तास उभे राहावे लागत आहे. त्यातच पत्रा पडून अपघात झाल्यास त्याची जवाबदारी कोणाची, असा प्रश्न प्रवासी विचारीत …
Read More »कार्यकर्त्यांच्या अपार मेहनतीचे हे यश -आ. रवींद्र पाटील यांचे प्रतिपादन
पाली ः प्रतिनिधी शिवसेना, भाजप, रिपाइं महायुतीची ताकत व तळागळातील कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अपार मेहनतीचे हे यश असल्याचे प्रतिपादन पेण, सुधागड, रोहा मतदारसंघात भरघोस मतांनी विजयी झालेले महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी केले. जनतेने दाखविलेला विश्वास कायम सार्थकी ठरविणार असून जनतेचे जितके आभार मानू तेवढे थोडेच अशा शब्दांत रविशेठ पाटील यांनी …
Read More »रविशेठ पाटील यांच्या विजयाने विकासाची दारे खुली
नागोठणे : प्रतिनिधी महायुतीच्या माध्यमातून पेण विधानसभा मतदारसंघातून भाजपचे रविशेठ पाटील यांना पुन्हा एकदा विधिमंडळाची दारे खुली झाली आहेत. सन 2004 मध्ये निवडून गेल्यावर मंत्रिपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळताना त्यांनी नागोठणे विभागात केलेली विकासकामे स्थानिक नागरिक विसरले नसल्याने त्यांच्या विजयाने पुन्हा एकदा येथे विकासकामांची कोटीच्या कोटी उड्डाणे होणारच, असा आत्मविश्वास व्यक्त …
Read More »कायर चक्रीवादळाचा धोका, कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा
अलिबाग : प्रतिनिधी अरबी समुद्रात कायर नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर वादळी वार्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, तसेच खोल समुद्रात गेलेल्या बोटी परत किनार्यावर आणाव्यात अशा सूचना देण्यात …
Read More »योग्य नियोजनामुळे कर्जत मतदारसंघात परिवर्तन
कर्जत विधानसभा मतदारसंघात महाआघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार सुरेश लाड आणि महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये अत्यंत चुरशीची लढत होईल, अशी भाकिते होत होती, परंतु थोरवे यांनी जिद्द आणि योग्य नियोजनाच्या आधारावर ही निवडणूक सहज जिंकली. या मतदारसंघात अद्याप एकाही उमेदवाराने एक लाख मते मिळविली नाहीत, मात्र थोरवे यांनी …
Read More »सकारात्मकतेचा परिसस्पर्श
नेहमीच्या जगण्यातल्या चिंता-विवंचना कुठे पळून जाणार नसतात. पण दिवाळीच्या दिवसांत त्या नजरेआड करून आपल्या जिवाभावाच्या माणसांसोबत चार दिवस अगदी मनापासून आनंद आणि उत्साहातच घालवायचे असा निश्चय जणु काही आपसूकच प्रत्येकाच्या मनात साकारतो. दिवे लागले रे, दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले… नैराश्याचा झाकोळ दूर करून मन आनंद, उत्साहाने भारून टाकण्याची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper