चंदीगड : वृत्तसंस्था मनोहरलाल खट्टर यांनी रविवारी (दि. 27) सलग दुसर्यांदा हरयाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत जननायक जनता पक्षाचे (जजप) नेते दुष्यंत चौटाला यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सत्यदेव नरेन आर्य यांनी दोघांनाही शपथ दिली. शपथविधी सोहळ्याला हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत, काँग्रेस नेते भूपिंदरसिंह हुड्डा, …
Read More »Yearly Archives: 2019
शेकापचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करावे, कामगार नेते महेंद्र घरत यांचा सल्ला
पनवेल, कळंबोली : प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्ह्यात पानिपत झाले. शेकाप हा अलिबाग व पेण मतदारसंघ आपले बालेकिल्ले समजत होता, मात्र तेही ढासळले. आता काही राहिले नाही. तेव्हा पुढे सन्मानाने राजकारण करता यावे म्हणून जयंत पाटील यांनी शेकापचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करावे, असा सल्ला काँग्रेसचे नेते …
Read More »नवीन पनवेलमध्ये साकारला किल्ले श्री राजगड; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल : दादाराम मिसाळ नवीन पनवेलमध्ये शनिवारी सायंकाळी शिवशाही अवतरली. निमित्त होते राजे शिवराय प्रतिष्ठानने साकारलेल्या ‘किल्ले श्री राजगड’ प्रतिकृतीच्या उद्घाटन सोहळ्याचे. मराठीतील कलाकार, शिवव्याख्याते सौरभ करडे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला. सिडको आरक्षित पोलीस मैदान, नवीन पनवेल, सेक्टर 7 …
Read More »पनवेलमध्ये दिवाळीच्या खरेदीला आलेल्यांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला
पनवेल : प्रतिनिधी दिवाळी खरेदीसाठी पनवेल शहरात आलेल्या 30पेक्षा जास्त जणांचे एका पिसाळलेल्या श्वानाने लचके तोडल्याची घटना रविवारी (दि. 27) दुपारी घडली. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेले बहुसंख्य जण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. सुटीचा दिवस आणि नरकचतुर्दशीचा मुहूर्त साधून रविवारी दुपारी अनेक जण कुटुंबासह पनवेलमध्ये खरेदीसाठी आले होते. …
Read More »शत्रुत्वाची भावना संपवा -मोदी ‘मन की बात’मधून पंतप्रधानांचे आवाहन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’द्वारे देशातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या वेळी पंतप्रधानांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि देशाच्या एकतेचा उल्लेख करीत अयोध्या प्रकरणावर भाष्य केले. दिवाळीचा प्रकाश सर्वदूर पसरवत शत्रुत्वाची भावना समाप्त करून टाका, असा बंधुभाव आणि प्रेमाचा संदेश दिला. पंतप्रधान मोदी …
Read More »‘इसिस’चा म्होरक्या बगदादीचा अमेरिकेकडून खात्मा
वॉशिंग्टन : अवघे जग इस्लाममय करण्याची स्वप्ने पाहणार्या आणि निष्पाप नागरिकांच्या कत्तली करीत सुटलेला इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरिया अर्थात इसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याचा अमेरिकेने खात्मा केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली. यापूर्वी त्यांनी सकाळी ‘काही तरी मोठे घडलेय’ अशा …
Read More »परतीच्या पावसाचे पाणी शेतात
मोहोपाडा : प्रतिनिधी पावसाच्या लांबलेल्या मुक्कामामुळे बळीराजाला लुटले असून, शेतात भाताचे उभे पीक आडवे झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.खालापुरात भातपिकाचे लागवड क्षेत्र सरासरी 3000 हेक्टर आहे. या वर्षी 2754 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली होती. सदर क्षेत्रापैकी हळवे व निमगरवे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून गरवे क्षेत्र अल्प …
Read More »सिडकोच्या उर्वरित 272 सदनिकांसाठी अर्ज नोंदणी सुरू
नवी मुंबई : सिडको वृत्त सिडकोच्या व्हॅली शिल्प आणि सीवूड् इस्टेट या गृहनिर्माण योजनांतील मिळून शिल्लक 272 सदनिकांसाठी अर्ज नोंदणीचा प्रारंभ शनिवारी (दि. 26) दुपारी 2.00 वा. सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते करण्यात आला. सदर 272 सदनिका या उच्च उत्पन्न आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी उपलब्ध आहेत. …
Read More »अनंत कर्वे ः 55 वर्षे कंदील बनविणारा अवलिया
सेवा निवृत्तीचा काळ म्हणजे आराम, भटकंती. पण 74वर्षीय अनंत कर्वे यांनी स्वतःला आपल्या आयुष्यातील एका जुन्या छंदाने झपाटले आहे. टाकाऊपासून टिकाऊ आणि त्यातही आकर्षक वस्तू बनविणारे कर्वे यांना उतारवयात हा छंद वयाचे भान विसरायला लावतो. दरम्यान, या छंदातून त्यांनी हस्तकला आणि टिकाऊ वस्तूंचा खजिना उभा केला आहे. 39 वर्षे नोकरी …
Read More »वरुणराजाची बळीराजावर अवकृपा
दिवाळी आली, ऑक्टोबर संपायला आला तरी पाऊस जाण्याचे नाव घेत नाही. परतीचा पाऊस झोडपतच आहे. कोकणात भातशेती हे मुख्य पीक घेतले जाते. यंदा सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यामुळे पीक चांगले आले. लावणीसाठी पावसाची वाट पाहावी लागली नाही, पण भातपीक हाताशी आले व शेतकर्यांच्या हातचा घासच निघून गेला आहे. पावसामुळे शेतकर्यांची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper