Breaking News

Yearly Archives: 2019

चोरीला गेलेले दागिने मिळाले परत

पाली ः प्रतिनिधी बहुतांश वेळेला चोरीला गेलेल्या ऐवजावर अनेकांना पाणी सोडावे लागते. मात्र सुधागड तालुक्यातील पाली येथील विशाल शिंदे यांच्या घरातील चोरीला गेलेला ऐवज पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे  मिळाला. आपल्या चोरीला गेलेल्या दागिन्यांवर पाणी सोडून दिलेल्या विशाल शिंदे यांना सुखद अनुभव  मिळाला आहे. विशाल नामदेव शिंदे (रा. हरिओम वास्तू सोसायटी, समर्थ नगर …

Read More »

मुरूड वाचनालयातर्फे दिवाळी पहाट

मुरुड ः प्रतिनिधी  येथील सार्वजनिक वाचनालय आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष अनिल कारभारी यांच्या हस्ते झाले. ही दिवाळी पहाट मैफल रंगली. रसिकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. या वेळी उपाध्यक्ष केदार गद्रे, कार्यवाह विनय मथुरे, संस्कृती समिती अध्यक्ष अस्मिता पेंडसे, नितीन पाटील, निवास रसाळ, ग्रंथपाल संजय भायदे, ज्येष्ठ गायक रवींद्र …

Read More »

मानवाधिकार संघटनेकडून पालिका सफाई कामगारांना फराळ वाटप

मुरुड जंजिरा ः वार्ताहर             मुरुड नगर पारिषदेतील सफाई कर्मचार्‍यांना दिवाळीनिमित्त मानवाधिकार संघटनेकडून दिवाळी फराळ व त्यांच्या मुलांसाठी वही, पेन अशा शालोपयोगी वस्तूंचे वाटप नगरपरिषद आवारात रविवारी (दि.27)करण्यात आले. मुरुड शहराची स्वछता अबाधित राखण्याचे काम सफाई कर्मचारी करीत असतात. अत्यंत तुटपुंज्या पगारात शहराची स्वछता राखण्याचे ते काम करीत असल्याने यंदा सफाई …

Read More »

नागोठण्यात अभिनंदनाचा फलक फाडला

नागोठणे : प्रतिनिधी भाजपचे नवनिर्वाचित आमदार रविशेठ पाटील यांचे अभिनंदन करणारा बॅनर शनिवारी (दि. 26) रात्रीच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने फाडला असल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. आमदार रविशेठ पाटील यांचे खंदे समर्थक व येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच फरमान दफेदार यांनी उर्दू हायस्कूलनजिक रविशेठ यांचे अभिनंदन करणारा हा बॅनर लावला होता …

Read More »

कर्जतचा गड जिंकल्याचा अभिमान -उद्धव ठाकरे

आ. महेंद्र थोरवे यांनी घेतली ‘मातोश्री’वर भेट कर्जत ः बातमीदार कर्जत विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे पुन्हा सिद्ध झाले असून शिवसैनिकांचा विश्वास संपादन करून विजय मिळविला आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे, असे कौतुक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. कर्जत विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी विजयी झालेले आमदार …

Read More »

मुलांना आनंदाचा बूस्टर डोस

साने गुरुजी स्मारकात अभिव्यक्ती शिबिर पाली ः प्रतिनिधी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर येथे 10 ते 13 वयोगटातील मुलांसाठी दिवाळीच्या सुटीत 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर कालावधीत अभिव्यक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या वयातील मुलांनाही आता ताण, निराशा, स्पर्धा या सगळ्यातून जावे लागते. शाळेतील पूरक उपक्रम यासाठी उपयोगी पडतातही. …

Read More »

माथेरानकरांना परवडेना रुग्णवाहिकेचे भाडे

कर्जत ः बातमीदार माथेरान नगरपरिकडेे एक महिन्यापूर्वी रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांच्या जीवावर बेतण्यासारखे अनेक प्रकार घडल्याने रुग्णवाहिकेमुळे नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी प्रयत्न केल्याने मावळच्या खासदारांनी माथेरानकरांना आपल्या खासदार निधीतून नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली. मात्र येथील नगरपरिषदेने सर्वसामान्य रुग्णांकडून अवाजवी दर आकारण्यास सुरुवात केल्याने रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या खिशाला चाट …

Read More »

वनवासी पाड्यावर विहिंपतर्फे मिठाईचे वाटप

मुरुड ः प्रतिनिधी आकाशाला भिडलेल्या महागाईमुळे दिवाळी सण साजरा करणे गोरगरिबांना शक्य होत नाही. कष्टकरी वनवासी मंडळी सणाला गोडधोड करू शकत नाहीत. आपल्याच बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी यंदाही विहिंपतर्फे फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. दिवाळीच्या दिवशी मुरुडपासून 2 कि.मी. अंतरावरील डोंगरावर वसलेल्या टक्याच्या आदिवासी वाडीवर विश्व हिंदू परिषदेतर्फे 45 …

Read More »

पावसाने भातशेतीचे नुकसान

पंचनामे त्वरित करण्याची मागणी मुरुड ः प्रतिनिधी    मुरुड तालुक्यातील खारआंबोली परिसरातील परतीच्या पावसामुळे कापलेल्या पिकाला कोंब आल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. कापणीयोग्य झालेले पीक शेतात आडवे पडल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मुरुड कृषी खात्यात अनेक शेतकरी पंचनामे करा, अशी मागणी करीत आहेत. …

Read More »

रायगडात महायुतीच्या चक्रीवादळात महाआघाडीची वाताहत!

कोकण किनारपट्टीवरील रायगड जिल्ह्याला वादळे नवी नाहीत. पावसाळ्यात जिल्ह्यामध्ये अनेकदा वावटळी उठतात. यंदा सोसाट्याच्या वार्‍यासह अतिवृष्टीने थैमान घातले. अगदी दिवाळी आली तरी वादळ आणि पाऊस कायम आहे. अशातच जिल्ह्यातील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित पक्षांना विशेषतः शेतकरी कामगार पक्षाला अक्षरशः झोडपून काढले. भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीच्या चक्रीवादळात शेकाप, राष्ट्रवादी …

Read More »