कळंबोली ः रामप्रहर वृत्त महातपस्विनी दीदी प्रकाशमणी यांच्या 12व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून प्रजपिता ब्रह्मकुमारी यांच्या विद्यमाने पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक शेजारील हुतात्मा स्मारकात वृक्षारोपण कार्यक्रम रविवारी (दि. 25) आयोजित करण्यात आला होता. या वेळी पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर, रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चा सरचिटणीस दर्शना भोईर, कस्टमचे …
Read More »Yearly Archives: 2019
रोह्याच्या राकेश कागडांनी पूर्ण केली सातारा मॅरेथॉन
रोहे : प्रतिनिधी रोहे शहरातील सामाजिक कार्यकर्ते राकेश कागडा यांनी रविवारी (दि. 25) झालेल्या सातारा मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत 21 किलोमीटरचे अंतर दोन तास 36 मिनिटांत पूर्ण केले. सातारा मॅरेथॉन ही खडतर मानली जाते. या स्पर्धेत धावण्यासाठी केनिया, आफ्रिकासारख्या देशातून अनेक ख्यातनाम धावपटू सहभागी होत असतात. या स्पर्धकांमध्ये स्वतःचे स्थान टिकवून …
Read More »‘तरुणांनी नोकरी देणारे बनावे’
पनवेल ः प्रतिनिधी सीकेपी समाजातील तरुणांनी नोकरी देणारे बनण्यासाठी व्यवसायात येणे आवश्यक आहे. त्यासाठी पनवेल सीकेपी समाजाने व्यवसायिकांना समाजरत्न पुरस्कार देऊन चांगली सुरुवात केली असल्याचे अखिल भारतीय सीकेपी मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष समीर गुप्ते यांनी पनवेल येथे रविवारी (दि. 25) श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा आणि सीकेपी समाजरत्न पुरस्कार सोहळ्यात बोलताना सांगितले. पनवेलच्या …
Read More »झुंजार शतकी ‘स्टोक्स’
हेडिंग्ले : वृत्तसंस्था अॅशेस कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या 359 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे दोन फलंदाज 15 धावांत माघारी परतले असताना बेन स्टोक्सने शतकी झुंज देत 135 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलिच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणत सामना एक विकेट्सने जिंकला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव …
Read More »‘हर घर जल’साठी लोकसहभागाची गरज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये ‘हर घर जल’ अशी घोषणा केली आहे. याबद्दल पंतप्रधानांचे कौतुक करायला हवे, पण त्यांच्या या अभियानाला प्रत्येक भारतीयाने साथ द्यायला हवी, तरच हे शक्य आहे. पंतप्रधानांनी अनेक योजना आणल्या आहे. स्वच्छता अभियान, प्लॅस्टिक बंदी अशी कितीतरी नावे घेता येतील. त्यांचा हेतू अत्यंत प्रामाणिक …
Read More »टीम इंडियाचा ‘विराट’ विजय
विंडीजला नमवून टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये गुणांचा श्रीगणेशा अँटिग्वा : वृत्तसंस्था भारतीय संघाने यजमान वेस्ट इंडिजवर 318 धावांनी विजय मिळवून कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या 419 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचा संपूर्ण संघ 100 धावांत माघारी परतला. अजिंक्य रहाणेची दमदार खेळी आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक मार्याला विजयाचे श्रेय जाते. …
Read More »मोदींच्या हाकेला देऊ साथ
प्रतिवर्षी लक्षावधी टनांचे प्लास्टिक समुद्रात विसर्जित होते आहे. त्यातून व्हेल आणि अन्य मत्स्यजीवांचे प्राण गुदमरत आहेत. हे आशिया खंडात सर्वाधिक होते आहे असेही म्हटले गेले आहे. अर्थात जगातील सर्वाधिक एकाकी बेटापासून सर्वाधिक उंच स्विस पर्वतराजीपर्यंत सर्वत्र प्लास्टिकचे प्रदूषण आढळते आहे. इतके की, जगभरातील नळाच्या पाण्यात आणि मानवी अन्नातही आता प्लास्टिकचे …
Read More »अरुण जेटली अनंतात विलीन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांना रविवारी (दि. 25) अखेरचा निरोप देण्यात आला. दिल्लीतील यमुना तिरावरील निगमबोध घाटावर जेटली यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा रोहन याने वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. या वेळी विविध पक्षांचे राजकीय नेते उपस्थित होते. जेटली …
Read More »भाजपवरील जनतेचा विश्वास वाढवा
जिल्हा संपर्कप्रमुख आमदार प्रवीण दरेकर यांचे आवाहन पनवेल : प्रतिनिधी जनतेचा आपल्या भारतीय जनता पक्षावर विश्वास निर्माण झाला आहे. हा विश्वास वाढविण्यासाठी बूथ कार्यकर्त्यांनी पोस्टमनची भूमिका बजवावी, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख आमदार प्रवीण दरेकर यांनी रविवारी (दि. 25) केले. ते भाजप उरण विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलनात बोलत होतेे. …
Read More »वांद्रे, चुनाभट्टी येथील गोविंदा पथके ठरली
साईतेज प्रतिष्ठानच्या आमदार चषकाचे मानकरी पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल पोदी येथील साईतेज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात पुरुषांमध्ये मुंबईतील वांद्रे येथील संगम गोविंदा पथकाने आणि महिलांमध्ये मुंबईच्याच चुनाभट्टी येथील मार्लेश्वर गोविंदा पथकाने मानाचा आमदार चषक पटकाविला. या पथकांना सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper