Breaking News

Yearly Archives: 2019

भाजप नागोठणे शहर अध्यक्षपदी सचिन मोदी

नागोठणे : प्रतिनिधी येथील प्रथितयश व्यावसायिक तथा भाजपचे निष्ठावंत युवा कार्यकर्ते सचिन मोदी यांची भारतीय जनता पक्षाच्या नागोठणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यासंबंधीचे नियुक्तीपत्र पेण येथील कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मोदी यांना देण्यात आले. सचिन मोदी यांचा जनसंपर्क सर्वोत्तम असून नागोठणेसह विभागात तळागाळापर्यंत पोहोचवून भाजप …

Read More »

नेरळ आणि कर्जत येथे हुतात्म्यांना आदरांजली

कर्जत : बातमीदार ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त शुक्रवारी कर्जतमधील आमराई परिसरात असलेल्या क्रांती स्तंभाला नगर परिषदेच्या वतीने, तर नेरळच्या माथेरान नाक्यावर या असलेल्या हुतात्मा चौकात ग्रामपंचायत आणि आदिवासी संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. कर्जत नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांनी आमराई परिसरातील हुतात्मा स्तंभाला पुष्पहार घालून …

Read More »

शूरा मी वंदिले..! स्वातंत्र्यवीरांना अभिवादन ; मानिवली हुतात्मा स्मारकात क्रांती दिन साजरा

कर्जत : बातमीदार ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त कर्जत पंचायत समिती आणि मानिवली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 9) मानिवली येथील हुतात्मा हिराजी पाटील स्मारकात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांच्या नातेवाईकांचा सन्मान करण्यात आला. कर्जत पं. स. सभापती राहुल विशे यांच्या हस्ते हुतात्मा हिराजी पाटील …

Read More »

विद्यार्थी-शिक्षकांना दिलासा

राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर मात्र तोंडी परीक्षा नसल्याचा विपरित परिणाम झाल्याचे दिसून आले. अर्थातच अकरावी प्रवेशाच्या अटीतटीच्या स्पर्धेत राज्य मंडळाचे विद्यार्थी मार खाणार हे स्पष्ट होते. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याची भावना व्यापकपणे व्यक्त झाल्याने सरकारवर संबंधित निर्णयाचा फेरविचार करण्याकरिता दबाव आला. खरे तर, वाढीव अंतर्गत गुणांच्या भ्रामक भोपळ्यातून निव्वळ …

Read More »

सुषमा पाटील विद्यालयात आदिवासी दिन

पनवेल ः रामप्रहर वृत्त सुषमा पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज कामोठे येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन दिलीप पाटील, सचिव डॉ. मंदार पनवेलकर, संस्थेचे संचालक अर्जुन गोवारी, मुख्याध्यापिका मनीषा जाधव, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन जान्हवी महाले हिने केले. कार्यक्रमात आदिवासी …

Read More »

कोयना धरण क्षेत्रात विक्रमी पाऊस

सातारा : प्रतिनिधी कोयना धरणाच्या क्षेत्रात यंदा विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. 3 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या पाच दिवसांमध्ये कोयना धरणातील पाण्याचा साठा तब्बल 50.63 टीएमसीने वाढल्याचे समोर आले आहे. याची टक्केवारी काढायची झाल्यास अवघ्या पाच दिवसांत धरणात 48.10 टक्के पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या वरच्या क्षेत्रात …

Read More »

जेएनपीटी कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाची नौकानयन मंत्र्यांशी चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय मजदूर पोर्ट अ‍ॅण्ड डॉक मजदूर संघाचे उपाध्यक्ष व जेएनपीटी जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, कार्याध्यक्ष सुधीर घरत, जनरल सेक्रेटरी जनार्दन बंडा यांनी केंद्रीय नौकानयन मंत्री मन्सूक मांडविया यांची जेएनपीटीच्या विश्रामगृहात भेट घेतली व स्वागत केले. या वेळी मंत्री मन्सूक मांडविया यांना जेएनपीटी तृतीय व …

Read More »

‘रयत’च्या सुवर्णमहोत्सवी लोगोचे अनावरण

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचा महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने यंदाच्या वर्षी 50व्या वर्षात पदार्पण केले असून 50वा सुवर्ण महोत्सवी वर्ष महाविद्यालयात साजरा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत 50व्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या लोगोचे रयत मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी अनावरण करण्यात आले. या …

Read More »

तिन्ही आरोपी डॉक्टरांना जामीन मंजूर

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण मुंबई : प्रतिनिधी डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली असून, मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकणार्‍या डॉ. पायल तडवी हिने 22 …

Read More »

चिरनेरमध्ये नाला बांधबंधिस्ती विकासकामाचा शुभारंभ

चिरनेर, उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर गावाला दरवर्षी पुराचा तडाखा देणार्‍या मध्यवर्ती नाल्याचे खोलीकरण व संरक्षण भिंत बांधण्याच्या विकासकामाचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 9) रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यासाठी जेएनपीटीचे विश्वस्त व भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या प्रयत्नांतून एमएमआरडीएकडून पाच कोटींचा निधी मंजूर झाला …

Read More »