Breaking News

Yearly Archives: 2019

अतिवृष्टीमुळे शेतीलाही फटका

तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने करून भरपाई देण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे दरड कोसळल्यामुळे किंवा भूभाग खचल्यामुळे रस्ते बंद झाले असल्याने काही …

Read More »

उरणची दंगल गर्ल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या आखाड्यात

खोपट्यातील अमेघा घरतची भरारी उरण : रामप्रहर वृत्त उत्तराखंड येथे 17 ते 19 ऑगस्ट रोजी होणार्‍या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या आखाड्यात उरण तालुक्यातील खोपटे गावातील दंगल गर्ल अमेघा अरुण घरत उतरणार आहे. वयाच्या सातव्या वर्षी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून क्रीडा क्षेत्रात आपले करियर घडविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून आणि वडिलांकडून प्राथमिक प्रशिक्षण …

Read More »

अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान; रायगडात 18 हजार हेक्टर क्षेत्र बाधीत; बळीराजा हवालदिल

अलिबाग : प्रतिनिधी अतिपावसामुळे रायगड जिल्ह्यात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 1116 गावांमधील 18 हजार 595 हेक्टर क्षेत्रावरील भात शेती, भाजीपाला, आंबा बागायतींचे नुकसान झाले आहे. सुमारे 20 टक्के कृषिक्षेत्र बाधित झाले आहे. रायगड जिल्ह्यात एक लाख 23 हजार हेक्टर भात लागवडीचे क्षेत्र आहे. यापैकी यंदा एक लाख …

Read More »

अमन लॉज-माथेरान शटल सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद

कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेने नेरळ-माथेरान पाठोपाठ आता अमन लॉज-माथेरान ही शटल सेवा पावसामुळे काही ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.पावसाळा संपल्यानंतर रेल्वे ट्रॅकची पाहणी करून पुढील निर्णय होणार आहे, पण अमन लॉज माथेरान शटल सेवा या मार्गावर कोणतेही दरडीचे प्रकार घडले नाहीत त्यामुळे ही शटल …

Read More »

मोहोपाड्यात बाराशे कार्यकर्ते भाजपत

मोहापाडा ः रामप्रहर वृत्त येथील जनता विद्यालयाच्या सभामंडपात भारतीय जनता पक्षाचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम शुक्रवारी (दि. 9) रात्री झाला. या मेळाव्याला पालकमंत्री रवींद्र चव्हाण, तसेच माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. या वेळी बाराशे कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजप …

Read More »

एक राखी जवानांसाठी!; सैनिक भावासाठी खोपोलीच्या भगिनींनी पाठवल्या राख्या ; सहजसेवा फाऊंडेशन, लायन्स क्लबचा अभिनव उपक्रम

खालापूर : प्रतिनिधी देशरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या भारतीय सैन्याप्रती प्रत्येकालाच अभिमान असतो. याच भावनेतून खोपोली आणि परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनी भारतीय सैनिकांना पाठविण्यासाठी तब्बल 1200 राख्या आणि शुभेच्छा संदेश जमा केले आहेत. सैनिक आणि नागरिक यांच्यातील अतूट बंधनाचे हे प्रतीक आता लष्करापर्यंत पोहोचवले जाणार आहे. खोपोलीतील सहजसेवा फाऊंडेशन आणि लायन्स क्लब …

Read More »

नागोठण्यात शांतता समितीची बैठक; सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन

नागोठणे : प्रतिनिधी या महिन्यात बकरी ईद, नारळी पौर्णिमा, गोकुळअष्टमी आदी सण, तसेच स्वातंत्र्य दिन सोहळा होत आहे. नागोठणे शांतताप्रिय गाव असून सर्वधर्मीय नागरिक येथे एकोप्याने राहत असून हे सर्व कार्यक्रम शांततेत साजरे करावेत, असे आवाहन पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी केले. आगामी सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 9)सकाळी नागोठणे …

Read More »

कामथी खोर्यात अतिवृष्टी ; सार्वजनिक मालमत्तांची हानी, पूल गेला वाहून

पोलादपूर : प्रतिनिधी संततधार पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता पूर आणि अतिवृष्टीने हानी झालेल्या सार्वजनिक तसेच खाजगी मालमत्तांची माहिती प्रशासनाकडे येत आहे. तालुक्यातील मोरसडे कामथी नदीवरील पायवाट पूल वाहून गेल्याने पादचार्‍यांना यापुढे मोठा वळसा घालून यावे लागणार आहे. अतिवृष्टीमध्ये तालुक्यातील मोरसडे येथील कामथी नदीवर असलेला जुना पायवाट पूल पुरामध्ये वाहून गेला. …

Read More »

आदिवासी दिनानिमित्त अलिबागमध्ये मिरवणूक

अलिबाग :  प्रतिनिधी जागतिक आदिवासी दिन शुक्रवारी (दि. 9) रायगड जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. आलिबाग शहरात आदिवासींनी मिरवणूक काढली होती. पारंपरिक वेश परिधान केलेल्या महिला व पुरुष या मिरवणुकीत सहभागी झाले होते. आदिवासी बांधवांसाठी भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आदिवासी बांधवांनी आपली पारंपरिक हत्यारे घेऊन, तसेच …

Read More »

जिल्ह्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा; कर्जतमध्ये संघटनेच्या वतीने बाईक रॅली

कर्जत : बातमीदार आदिवासी दिनानिमित्त कर्जत तालुका आदिवासी संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि. 9) बाईक रॅली काढण्यात आली होती. नेरळ येथे सुरुवात झालेली ही आदिवासी रॅली कर्जत शहर मार्गे कशेळे येथे पोहचली. वाटेत सर्व ठिकाणी आदिवासी समाजाने आपल्या संस्कृतीचे प्रदर्शन करीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. कर्जत तालुक्यात ठाकूर-कातकरी आदिवासी संघटनेच्या वतीने आंतरराष्ट्रीय …

Read More »