पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त होणार्या आरोग्य महाशिबिरात प्रत्येक रुग्णाला योग्य आरोग्यसेवा मिळावी यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर, डॉक्टर व त्यांच्या सहकार्यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही नियोजन समित्यांमधील पदाधिकार्यांनी दिली. कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 45व्या वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या …
Read More »Yearly Archives: 2019
फडके नाट्यगृहात दुरुस्ती, उपाययोजना करा
सभागृह नेते परेश ठाकूर यांचे अधिकार्यांना निर्देश पनवेल : प्रतिनिधी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने साकारलेल्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाला मंगळवारी (दि. 30) महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी नाट्यगृहाची पाहणी करून आढावा घेतला, तसेच आवश्यक …
Read More »काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार
भोसले, पिचड, नाईक, कोळंबकरांचा राजीनामा मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, संदीप नाईक, वैभव पिचड; तर काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी मंगळवारी (दि. 30) विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले सातार्यातील जावळी मतदारसंघाचे, वैभव पिचड …
Read More »पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपचेच पारडे जड
राज्यात विधानसभा निवडणूक 2019चे पडघम वाजू लागले आहेत. पनवेल विधानसभा मतदारसंघात प्रचारात भाजपने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांचा उमेदवार ठरला आहे. सिडकोचे अध्यक्ष आणि विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर. शेकाप आणि राष्ट्रवादी आघाडी मात्र उमेदवारांची चाचपणी करीत आहे. काँग्रेसने आघाडीत जायचे का स्वतंत्र लढायचे याचा निर्णय अद्याप घेतला नाही. बहुजन …
Read More »युवक मंडळाकडून मुंगोशी येथे वृक्षारोपण
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील मुंगोशी गावामधील युवक मंडळाच्या पुढाकाराने रविवारी (दि. 28) सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत गावाजवळील मुंगोशी फाटा ते पूल दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूस 200 झाडे लावण्यात आली. त्यासाठी युवक, ग्रामस्थ व महिलांनी श्रमदान केले. सुरुवातीस खड्ड्याचे व झाडांचे तसेच त्यासाठी लागणारे कुदळ, फावडा, घमेले, पहार, कोयता …
Read More »टायगर जिंदा है!
1973 साली देशात व्याघ्र प्रकल्पाची सुरूवात झाली तेव्हा देशभरात अवघे नऊ व्याघ्र संवर्धन प्रकल्प होते. आता ही संख्या 50 वर पोहोचली आहे ही निश्चितच आनंदाची बाब आहे. एकंदर 72 हजार 749 चौ. किमीचे क्षेत्र या प्रकल्पांअंतर्गत येते. 2014 मधील 2226 वाघांवरून भारतातील वाघांची संख्या 2018 मध्ये 2967 वर पोहोचली आहे. …
Read More »सवतकडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी
मुरुड : संजय करडे पावसाळ्यात वर्षासहलीचा आनंद लुटण्यासाठी मुरुड तालुक्यातील निसर्गरम्य सवतकडा धरणावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ लागल्याने सुट्टीच्या दिवशी येथे गर्दी होऊ लागली आहे. एका बाजूला उंच कडा, त्यातून फेसाळत खाली येणारे दुधाळ धबधबे, तर दुसर्या बाजूला धुक्याचे अच्छादन घेतलेली खोल दरी. हा निसर्गाचा नजराणा पाहताना स्वर्गसुखाचा अनूभव आल्याशिवाय …
Read More »नीता माळी यांच्यामुळे चार दिवसांच्या बाळाला जीवदान
पनवेल ः रामप्रहर वृत्त – आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा नगरसेविका नीता माळी यांच्यामुळे सोमवारी (दि. 29) सकाळी चार दिवसाच्या बाळाला जीवदान मिळाले. नगरसेविका नीता माळी या सर्व सामान्य माणसाच्या मदतीसाठी सतत झटत असतात. पुराचे पाणी घरात आले की त्यांना प्रत्यक्ष जाऊन मदत करणे, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना सहकार्य …
Read More »माजी राज्यपाल राम नाईक भाजपमध्ये पुनश्च सक्रिय
मुंबई : प्रतिनिधी – उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल व माजी केंद्रीय मंत्री राम नाईक मंगळवारी (दि. 30) मुंबईत पुनश्च भाजपत सक्रिय झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाईक यांचे स्वागत करताना त्यांच्या मार्गदर्शनाचा व अनुभवाचा पक्षाला लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला. या वेळी उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, प्रदेश सरचिटणीस …
Read More »विवेक भालेराव, युवराज वलिंद्रे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार महापुरात नाला पार करीत असताना दहिगाव इंजिवली (ता. कर्जत) येथील विवेक भालेराव (वय 17) तरुण वाहून गेला होता. राज्य शासनाच्या वतीने मृत विवेकचे वडील बबन भालेराव यांना शासकीय मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच गटारात पडून मृत्यू पावलेल्या माथेरानमधील युवराज या बालकाचे वडील धीरज वारीद्रे यांना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper