Breaking News

Yearly Archives: 2019

विद्यार्थ्यांना दिले जाणारे वाघिणीचे दूध रोखलं?

जगात इंग्रजी भाषेच्या वापरात अमेरिका सर्वप्रथम आहे तर भारत दुसर्‍या स्थानावर आहे. इंग्लंड देश चौथ्या स्थानावर आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकरांसारख्या समाजसुधारकाने इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध म्हटले आहे. मात्र, राज्यसरकारने सेमी इंग्रजी मिडियमच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या पाल्यांनाही हे वाघिणीचे दूध पिण्याची संधी उपलब्ध केली असताना पोलादपूर तालुक्यात मात्र झारीतील शुक्राचार्यांनीच हे वाघिणीचे दूध …

Read More »

वाडी गिळली कुणी

धरण कुणाच्या हद्दीत येते यावरून बराच काळ चालढकल झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. तर धरणाजवळ अलीकडच्या काळात खणलेल्या विहिरांकरिता जे सुरुंगांचे स्फोट केले गेले, तेही कदाचित धरणाला तडे जाण्यास जबाबदार असावेत अशी भीती आहे. अर्थातच, विहिरींच्या कामांची माहिती देखील स्थानिक प्रशासनाकडे असणे अपेक्षित आहे. धरणाचे बांधकाम मुळातच निकृष्ट दर्जाचे होते का त्याची …

Read More »

‘साहित्यसंपदा’तर्फे साहित्य संस्कार शिबिर

ठाणे : प्रतिनिधी साहित्यसंपदा समूहातर्फे ठाणे येथील नवजीवन विद्या मंदिर येथे साहित्य संस्कार शिबिर घेण्यात आले. मराठी भाषेवर होणारे आक्रमण आणि लोप पावणारी वाचन संस्कृती असे ज्वलंत मुद्दे सर्वत्र चर्चेत असताना साहित्यसंपदा समूहाने त्यावर ठोस पाऊल उचलत साहित्य क्षेत्रात आपले भरीव योगदान साहित्य संस्कार शिबिरांतर्गत देण्यास सुरुवात केली. या शिबिराला …

Read More »

‘तरणखोप ग्रा.पं.मधील भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी’

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील तरणखोप ग्रामपंचायत हद्दीतील गोविर्ले गावामध्ये  2016-2017 या कालावधीत न केलेल्या कामांचे बिल अदा करून मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जिल्हा नियोजन समिती सदस्य जगदिश ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तरणखोप ग्रामपंचायतीच्या वतीने गोविर्ले गावात किती विकासकामे …

Read More »

जालन्यातील धामणा धरणाला तडे, चार गावांना धोका

जालना : प्रतिनिधी एकीकडे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं असतानाच तिकडे जालना जिल्ह्यातल्या धामणा धरणाच्या भिंतीलाही तडे गेले आहेत. भिंतीमधून पाणी पाझरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या तड्यांमुळे धरणाच्या आजूबाजूच्या तीन ते चार गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे. धामणा धरण हे भोकरदन तालुक्यातील सेलूदमध्ये आहे. या …

Read More »

डॉ. महेश केळुसकर सेवानिवृत्त

मुंबई : प्रतिनिधी आकाशवाणीतील प्रदीर्घ सेवेनंतर साहित्यिक डॉ. महेश कुळुसकर सेवानिवृत्त झाले. 1983 पासून ते आकाशवाणीत कार्यरत होते. रत्नागिरी, दमण, विविध भारती, सांगली, मुंबई या केंद्रांवर काम करताना त्यांनी 26 अभिवाचन मालिका केल्या. त्यातील महानायक ही अभिवाचन मालिका खूप गाजली. त्याचबरोबर त्यांनी प्रभाते मनी, ऐसी अक्षरे रसिके, चिंतन हा चिंतामणी …

Read More »

हजारो फुटांच्या उंचीवर आयटीबीपीची आव्हानात्मक मोहीम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था काही दिवसांपूर्वी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सकडून हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये 21 हजार फुटांच्या उंचीवर एक मोहिम हाती घेण्यात आली होती. काही गिर्यारोहकांच्या बचावासाठी ही मोहिम हाती  घेण्यात आली होती. गिर्यारोहकांच्या या गटात एकूण 12 जणांचा सहभाग होता. ज्यामध्ये 11 परदेशी तर, एका भारतीय नागरिकाचा समावेश होता. 11 …

Read More »

पनवेल ः बारापाडा ते कर्नाळा नाका या परिसरात वीटभट्टी मालकांनी अनधिकृतपणे केलेल्या मातीच्या भरावामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने या परिसरातील सुमारे तीनशे एकर  भातशेतीची जमीन पाण्याखाली आहे. अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षामुळे ही जमीन पडिक आहे.

Read More »

उपमहापौरांनी केली परिसरातील गटारांची पाहणी

पनवेल ः वार्ताहर महापालिकेचे उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी पनवेल परिसरातील गटारे, नाले, तसेच समस्यांची पाहणी केली व आवश्यक त्या सूचना पनवेल महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना देऊन जागेवर स्वतः उभे राहून त्या समस्यांचे निराकरण करून घेतले. पनवेल परिसरातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे त्यातच भरतीचे पाणी उलटे आल्याने पाणी तुंबण्याचे प्रकार …

Read More »

धरणे, धबधब्यांवर जाताय तर जरा सावधान ; पोलिसांकडून सूचना फलक

पनवेल ः वार्ताहर दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात मुंबईसह, ठाणे, कल्याण व उपनगरातून वर्षासहलीसाठी नागरिक पनवेल परिसरातील गाढेश्वर धरण, मोर्बे धरण, कुंडी धबधबा, पांडवकडा आदी भागांमध्ये येत असतात. पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या अखत्यारित येत असलेल्या गाढेश्वर धरण, मोर्बे धरण, कुंडी धबधबा या ठिकाणी पर्यटनास मनाई असल्याचे फलक पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या …

Read More »