Breaking News

Yearly Archives: 2019

महायुतीचा डंका

करवीर निवासिनी महालक्ष्मीचा आशीर्वाद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप-शिवसेना महायुतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फोडून पुन्हा एकदा राज्यात भगवा फडकवण्याचा संकल्प केला आहे. त्यांचा हा संकल्प तडीस लावण्यासाठी आता सर्वांनीच कंबर कसणे गरजेचे आहे. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद घेत पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांना पुन्हा …

Read More »

सेरेनाची माघार; फेडररची आगेकूच

मियामी : वृत्तसंस्था सेरेना विल्यम्स हिने पायाच्या घोट्याच्या दुखापतीमुळे मियामी खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली असून, महिलांमध्ये अग्रमानांकित टेनिसपटू नाओमी ओसाका हिला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे; तर पुरुषांमध्येही अलेक्झांडर झ्वेरेव्हचे आव्हान संपुष्टात आले असून, रॉजर फेडररने विजयी घोडदौड कायम राखत आगेकूच केली आहे. सेरेनाने रिबेका पीटरसनला 6-3, 1-6, …

Read More »

जसप्रीत बुमराहला दुखापत

मुंबई : प्रतिनिधी मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमातील पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला. त्याचबरोबर मुंबईचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या खांद्याला दुखापत झाली आणि त्यामुळे त्याच्या वर्ल्डकप खेळण्याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, पण सामन्यानंतर बुमराह दुखापतीतून सावरल्याची माहिती संघाकडून देण्यात आली. सामन्यानंतर मुंबई इंडियन्सच्या वतीने सांगण्यात आले …

Read More »

वॉर्नरचे झोकात पुनरागमन

गंभीर, शर्माचा विक्रम मोडला कोलकाता : वृत्तसंस्था सनराईजर्स हैदराबाद संघाला कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध पराभवाचा धक्का सहन करावा लागला. असे असले तरी हैदराबादचा धडाकेबाज डेव्हिड वॉर्नरने 85 धावांची आक्रमक खेळी केली. यासह त्याने गौतम गंभीरचा विक्रम मोडीत काढला. बॉल टॅम्परिंगमुळे वर्षभर बंदीची शिक्षा भोगणारा वॉर्नर याने आयपीएलमध्ये जोरदार पुनरागमन केले. …

Read More »

युवी इज बॅक!

मुंबई : प्रतिनिधी दिल्ली कॅपिटल्सने सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत केले. या सामन्यात दिल्लीने 213 धावांचा डोंगर उभारला होता. घरच्या मैदानावर खेळणार्‍या मुंबई इंडियन्सला हा भार पेलता आला नाही, पण युवराज सिंगने पुन्हा एकदा लढाऊ वृत्ती दाखवली आणि धमाकेदार अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या दमदार पुनरागमनाचे चाहत्यांकडून स्वागत करण्यात आले. …

Read More »

जय हनुमान सर्वे संघ विजेता

रेवदंडा : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील सर्वे येथे फणसाड भूमिपुत्र मंडळ आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गावातीलच जय हनुमान क्रिकेट संघाने विजेतेपद पटकाविले. मुरूड संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. या स्पर्धेत एकूण 16 संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील अंतिम सामना सर्वे विरुद्ध मुरूड असा रंगतदार झाला. यात सर्वे संघाने मुरूड संघाला …

Read More »

मुंबईवर दिल्ली भारी!

मुंबई : प्रतिनिधी घरच्या मैदानावर आपला पहिला सामना खेळणार्‍या मुंबई इंडियन्सला सलामीच्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबईवर 37 धावांनी मात करीत बाराव्या हंगामाची सुरुवात विजयाने केली. दिल्लीने दिलेल्या 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 176 धावांपर्यंतच मजल मारू शकला. मुंबईकडून युवराज सिंग आणि कृणाल …

Read More »

धाडी समाजाचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी असताना भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशाचप्रकारे रायगड जिल्हा आणि नवी मुंबईत राहणार्‍या धाडी समाजाच्या रहिवाशांनी रविवारी (दि. 24) सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला. श्री. रामशेठ ठाकूर …

Read More »

शेकाप नेते जयंत पाटील खोटारडे राष्ट्रवादीच्या दत्तात्रेय मसूरकरांचा पलटवार

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक (केटीएसपी) मंडळावर रायगड जिल्हा मध्यवर्ती (आरडीसी) बँकेचे फक्त पाच कोटींचे कर्ज असून, शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी याबाबत खोटी आकडेवारी सांगून दिशाभूल केली असल्याचा पलटवार खोपोली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व केटीएसपी मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रेय मसूरकर यांनी रविवारी (दि. 24) पत्रकार परिषदेत केला. दोन …

Read More »

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्मशानभूमी स्वच्छता अभियान

पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक हवामान दिनाचे औचित्य डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 24) स्मशानभूमी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यास श्रीसदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सातत्याने स्वच्छता अभियान राबविण्यात येत असते. त्यापुढे जाऊन रविवारी श्रीसदस्यांनी ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी …

Read More »