Breaking News

Yearly Archives: 2019

मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा; काजल, ओजस, विकास विजेते

मुंबई : प्रतिनिधी मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत काजल कुमारी, ओजस जाधव व विकास धारिया यांनी अनुक्रमे महिला, पुरुष आणि कुमार गटात विजेतेपदाला गवसणी घातली. माटुंगा येथील सेंट्रल रेल्वे वेल्फेअर सभागृहात ही स्पर्धा झाली. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात इंडियन ऑइलच्या काजलने जैन इरिगेशनच्या निलम घोडकेचा 25-6, 25-18 असा धुव्वा उडवत …

Read More »

अनफिट लिओनेल मेस्सीची माघार; मोरोक्कोविरुद्धचा सामना खेळणार नाही

ब्यूनस आयर्स : वृत्तसंस्था 2018 विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनंतर लिओनेल मेस्सी पहिल्यांदाच अर्जेटिना संघाकडून खेळला, पण या सामन्यात त्यांना व्हेनेझुएलाकडून 1-3 अशा पराभवाला सामोरे जावे लागले. याच सामन्यात मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे मेस्सीला आता पुढील आठवड्यात मोरोक्कोविरुद्ध होणार्‍या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्याला मुकावे लागणार आहे. रशियात झालेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर मेस्सीवर आठ …

Read More »

सुरेश रैनाचा विक्रम; पाच हजार धावांचा टप्पा ओलांडला

चेन्नई : वृत्तसंस्था चेन्नई सुपरकिंग्जच्या सुरेश रैनाने पहिल्याच सामन्यात आपल्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. आयपीएलच्या इतिहासात पाच हजार धावांचा टप्पा ओलांडणारा रैना पहिला फलंदाज ठरला आहे. बंगळुरुविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने या अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. पहिल्या सामन्यात फलंदाजीला येईपर्यंत रैनाच्या नावावर आयपीएलमध्ये 4985 धावा जमा होत्या. पाच …

Read More »

चेन्नईकडून बंगळुरूचा धुव्वा; विराटच्या संघावर नकोशा विक्रमाची नोंद

चेन्नई : वृत्तसंस्था आयपीएलच्या बाराव्या हंगामात गतविजेच्या चेन्नई सुपकिंग्ज संघाने बाराव्या हंगामाची सुरुवात विजयाने केली आहे. पहिल्याच सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजीसमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ कोलमडला आणि मोठ्या फरकाने त्यांचा पराभव झाला. बंगळुरुने दिलेले 71 धावांचे माफक आव्हान चेन्नईच्या फलंदाजांनी सात गडी राखून सहज पूर्ण केले. याच सामन्यात बंगळुरुच्या नावावर काही …

Read More »

रायगडात ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

पनवेल : रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीची सर्वत्र रणधुमाळी असताना रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी (दि. 24) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांबरोबरच प्रशासन व पोलीस यंत्रणेने तयारी केली आहे. जिल्ह्यात 20 ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली होती. यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील आराठी, काळीजे, दांडा (बागमांडला), शिरस्ते, गौळवाडी, नागलोली, हरेश्वर, भोस्ते, वडवली, …

Read More »

तटकरेंवर भरवसा नाही, नाईलाज म्हणून पाठिंबा

मधुकर ठाकूर यांनी स्पष्ट केली भूमिका अलिबाग : प्रतिनिधी सुनील तटकरे यांच्यावर भरवसा नाही, परंतु पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस हा आमचा सहकारी पक्ष असल्याने काळजावर दगड ठेवून नाईलाजास्तव तटकरेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी शनिवारी (दि. 23) येथे पत्रकार परिषदेत सांगितले. लोकसभा निवडणुकीत …

Read More »

गिरीश बापटांना पुण्यातून उमेदवारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने शुक्रवारी रात्री 36 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. जळगावमधून स्मिता वाघ, नांदेडमधून प्रताप चिखलीकर, दिंडोरीतून डॉ. भारती पवार, पुण्यातून गिरीश बापट, बारामतीतून कांचन कुल आणि सोलापूरमधून डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने …

Read More »

मी राजीनाम्याच्या विचारात!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची ऑडिओ क्लिप व्हायरल चंद्रपूर : प्रतिनिधी ’माझे पक्षात कुणी ऐकत नाही, मीच राजीनाम्याच्या विचारात आहे’, असे वक्तव्य असलेली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कथित वक्तव्याची ऑडिओ क्लिप ऐन निवडणुकीच्या तोंडावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आपण हे बोललो आहोत, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले नसले …

Read More »

सोन्याची तस्करी; खालापुरात वृद्ध जेरबंद

खालापूर : प्रतिनिधी सोन्याची तस्करी करणार्‍या 75 वर्षीय वृद्धाला खालापूर पोलिसांनी शनिवारी (दि. 23) पहाटे सापळा रचून खाजगी बसमधून ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून सुमारे 44 लाख रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत. ते कोल्हापूरला नेण्यात येत होते. खालापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विश्वजित काईंगडे यांना खबर्‍याने, मुंबईहुन कोल्हापूरला जाणार्‍या एका खाजगी …

Read More »

करंजाडे नोड फ्लॅट ओनर्स वेल्फेअर असोसिएशनचे निवेदन

पनवेल : करंजाडे नोड फ्लॅट ओनर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने करंजाडे नोडमध्ये खेळाचे मैदान व इतर समस्या मार्गी लागाव्यात यासाठी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन देताना असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत गुजर, सदस्य संजय चाळके, सई पवार, पोपट जाधव, बाळासाहेब हाडोळे, नरेंद्र जोशी आदी उपस्थित होते. उरण तालुक्यात शिवजयंती उरण : …

Read More »