नवी दिल्ली : वृत्तसंस्था केरळच्या मलप्पुरम गावातील इरफान कोलोथूम थोडी या 29 वर्षीय खेळाडूने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट जिंकले आहे. जपान येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेतील चालण्याच्या शर्यतीच्या इरफानने 1 तास 20.57 सेकंदाची वेळ नोंदवताना ऑलिम्पिक आणि 2019मध्ये होणार्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता निश्चित केली. विशेष म्हणजे इरफानला या स्पर्धेत …
Read More »Yearly Archives: 2019
मनोरुग्ण महिलेला मिळवून दिला मायेचा निवारा
राम हिसालगे या तरुणाने घडविला आदर्श कर्जत : बातमीदार आपण या समाजात वावरत असताना आपल्या आजूबाजूला कुटुंब आणि समाजापासून दुरावलेले अनेक मनोरुग्ण दिसत असतात, मात्र आपल्या कामात व्यस्त होऊन आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जातो. बहुदा असेच होते, मात्र नेरळ परिसरात फिरत असलेल्या मनोरुग्ण महिलेला पाहून येथील तरुण हा फार …
Read More »शिरसे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका
कर्जत : बातमीदार शिरसे ग्रामपंचायत मधील शिवसेनेच्या पॅनल प्रचाराचा नारळ फोडण्यात आला, त्या वेळी वेगवेगळ्या पक्षात असलेले भोईर कुटुंबीय उपस्थित असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिरसे ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेकडून उभ्या करण्यात आलेल्या पॅनलच्या थेट सरपंच पदाचे उमेदवार आरती संदीप भोईर आणि अन्य आठ उमेदवार यांच्या प्रचाराचा नारळ शिरसे येथील शिरसाई मंदिरात …
Read More »मुरूड वीज मंडळाकडून ग्राहकांची फसवणूक
वीज उपकेंद्राऐवजी स्विचिंग सेंटर; सर्वपक्षीय संघर्ष समिती संतप्त मुरूड : प्रतिनिधी मुरूड वीज मंडळाकडून ग्राहकांची फसवणूक सुरू असून, हे वीज उपकेंद्राऐवजी स्विचिंग सेंटर असल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय संघर्ष समितीने संताप व्यक्त केला आहे. मुरूड येथील वीज मंडळाने काही दिवसापूर्वीच सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून दत्तमंदिर परिसरात वीज उपकेंद्राचे उद्घाटन …
Read More »अॅड. प्रकाश आंबेडकरांकडून महामानवाच्या विचारांना गालबोट
नगर : प्रतिनिधी : जातीच्या अंतासाठी लढणार्या अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीच लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर करताना उमेदवारांच्या नावासमोर जातीचा उल्लेख केला आहे़ या कृतीतून प्रकाश आंबेडकर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनाच गालबोट लावले असल्याची टीका पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी …
Read More »रेल्वे रुळावर पबजी खेळणे महागात; दोघे ठार
हिंगोली : प्रतिनिधी : पबजी गेमच्या वेडापायी हिंगोलीत दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. नागेश गोरे (वय 22) आणि स्वप्नील अन्नपुर्णे (वय 24) अशी मृत तरुणांची नावे आहेत. नागेश आणि स्वप्नील हिंगोली येथील खटकाळी बायपास भागात रेल्वे रुळावर बसून पबजी गेम खेळण्यात दंग असताना दोघांना रेल्वेने चिरडले आणि त्यातच त्यांचा …
Read More »न्यूझीलंडमधील गोळीबारात सात भारतीयांचा मृत्यू
ख्राईस्टचर्च : वृत्तसंस्था : न्यूझीलंडमध्ये मशिदींवरील दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सात भारतीयांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यामध्ये हैदराबादमधील एक, केरळाची एक महिला आणि गुजरातमधील दोन व्यक्तींचा समावेश आहे. अन्य तीन जण भारतीय वंशाचे आहेत. त्यापैकी दोन गुजरात आणि एक तेलगंणातील असल्याचे समजते. न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च शहरातील मशिदींमध्ये शुक्रवारी …
Read More »‘चौकीदार नरेंद्र मोदी’
पंतप्रधानांनी ट्विटर हँडलवरील नाव बदलले नवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतीय जनता पक्षाने 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘चौकीदार’ हा शब्द अधोरेखित केला आहे. देशभरातील सभांमध्ये स्वतःचा ‘देश का चौकीदार’ असा उल्लेख करणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ‘मैं भी चौकीदार’ हा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. त्यानंतर आता पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर हँडलवरील …
Read More »रात्रीस खेळ… चाले हा…
नितीन देशमुख : पनवेल – दो भेल देना’, ‘एक भेल… कांदा टमाटर जादा’ …एकामागोमाग एक ऑर्डर्स सुरू असतात. भेळवालाही सगळे जिन्नस एकत्र करून झटपट भेळेची पुडी तयार करून देत असतो. मुंबईतल्या जवळपास सगळ्या रेल्वेस्थानकांमध्ये संध्याकाळच्या वेळी हे चित्र दिसून येऊ लागलंय. भेळेला अचानक एवढी मागणी येण्याचं कारण डाएटच्या बाबतीत मुबईकरांमध्ये …
Read More »नेमेचि येते पाणीटंचाई
कर्जत हा रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका. आज मुंबईचे उपनगर म्हणून विकसित होत आहे. भाताचे कोठार म्हणून समजला जाणारा हा तालुका आता फार्महाऊसचा तालुका बनला आहे, मात्र या तालुक्याची भौगोलिक रचना लक्षात घेता कर्जत तालुका हा अर्ध्याहून भागात आदिवासी समाज डोंगर वस्तीत राहून आहे. त्याच वेळी तालुक्यात असलेल्या नद्या या डोंगरभागामुळे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper