Breaking News

Monthly Archives: April 2020

उरणमध्ये आरोग्य तपासणी शिबिर

उरण : वार्ताहर – अ‍ॅड. निग्रेश पाटील आणि मित्र परिवारच्या वतीने उरण येथील जांभुळपाडा आदिवासी वाडी, विंधणे आदिवासी वाडी, कंठवली आदिवासी वाडी आणि कंठवली गाव अशा चार ठिकाणी बुधवारी (दि.15) आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. उरण  तहसिलदार भाऊसाहेब अंधारे आणि 95 गाव गावठाण विस्तार संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश ठाकूर तसेच …

Read More »

कामोठ्यातील रोडवर सामाजिक संदेश

कामोठे : रामप्रहर वृत्त – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून लोकांना घरी राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे, तरीसुध्दा लोक काही ना काही कारण काढून घराबाहेर पडत आहेत. म्हणून कामोठेमधील सर्व चौक तसेच मुख्य रोडवर सामाजिक संदेश देणारे पेंटिंग करून जनजागृती केली. तसेच कामोठ्यातील नागरी आरोग्य केंद्रावर …

Read More »

पत्रकार संघर्ष समितीकडून भल्याची वाडी येथे वस्तूंचे वाटप

पनवेल : वार्ताहर – पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने पनवेल तालुक्यातील भल्याची वाडी येथे मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप निराधार कुटुंबांना करण्यात आले. सामाजिक सुरक्षितता पाळा गर्दी टाळा स्वच्छता राखा मास्क वापरा हात सातत्याने साबणाने धुवा, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असा सामाजिक संदेश देत पनवेल तालुका पत्रकार संघर्ष …

Read More »

गरजूंची मोफत आरोग्य तपासणी

पनवेल : वार्ताहर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरीब, गरजू कुटुंबीयांच्या त्रासात भर पडली आहे. अशा गरजू नागरिकांना आधार देण्यासाठी कोपरखैरणे येथील ओम गगनगिरी रुग्णालय आणि अ‍ॅक्युपेशनल सेंटर तसेच प्रभात ट्रस्टच्या वतीने नवी मुंबईतील दुसरे कम्युनिटी आरोग्य केंद्र कोपरखैरणे येथील ज्ञानविकास शिक्षण संस्थेच्या प्रांगणात सुरू करण्यात आले आहे. या सेंटरच्या वतीने एक्स …

Read More »

भारत विकास परिषदेच्या वतीने मास्क

पनवेल : रामप्रहर वृत्त – भारत विकास परिषद, पनवेल शाखेच्या वतीने  पंचशील नगर वस्ती मध्ये मास्क वाटप करण्यात आले. संस्थेच्या सदस्यांनी देणगीच्या रुपात कापडी व धुवून पुन्हा पुन्हा वापरता येतील असे एक हजार मास्क जमा केले व घरोघरी जाऊन दिले, ज्यायोगें गर्दी टाळता आली. मास्क वाटप करताना सर्व सदस्यांनी मास्क …

Read More »

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन कोचिंग क्लासेस

उरण : प्रतिनिधी – कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे दहावीच्या मुलांचे अतोनात नुकसान होत आहे. उरण तालुक्यातील सर्व दहावीच्या विद्यार्थ्याचा महत्त्वाचा वेळ वाया जावू नये, या करिता हे ऑनलाईन लाईव्ह क्लासेस घेण्यात येणार आहेत. यासाठी प्रथमच स्कूल सेक्शनसाठी ऑनलाइन आणि लाईव्ह क्लास सोमवार (दि. 20) पासून सकाळी 9 ते 12 असे सुरू …

Read More »

आधार लिंक असो-नसो सर्व शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य द्या!

आमदार गणेश नाईक यांची मागणी नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई शहरातील सर्व रेशनिंग दुकानांमध्ये सर्व अन्नधान्याचा पुरवठा करणे तसेच शिधापत्रिका आधार कार्डशी लिंक न केलेल्या शिधापत्रिकाधारकांना देखील अन्नधान्याचे वाटप करावे, अशी मागणी ूआमदार गणेश नाईक यांनी कोकण विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य …

Read More »

एपीएमसी मार्केट खांदेश्वरच्या ग्राऊंडवर

पनवेल प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय पनवेल : वार्ताहर – पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमधील वाढती गर्दी पाहून 10 एप्रिल पासून कृषी उत्पन्न बाजार बंद करण्याच्या निर्णय जिल्हा उपनिबंधक यांनी केला होता. मात्र जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा पडू नये, म्हणून पुन्हा हा बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार येत्या दोन दिवसात …

Read More »

वेदनादायी मूतखडा

पुरेसे पाणी न प्यायल्याने शरीरावर होत असलेल्या विविध परिणामांपैकी एक म्हणजे मूतखड्याचा आजार. काही वेळा आकाराने लहान असलेले खडे मूत्रविसर्जनावाटे बाहेर पडल्याचे लक्षातही येत नाही, मात्र त्यांचा आकार वाढला की मूत्रपिंडात किंवा मूत्रमार्गात अडकल्याने त्रास सुरू होतो. मूतखडे कसे होतात? रोजच्या चौरस आहारातील काही सत्त्वांचे विघटन न झाल्याने ते मूत्रपिंडात …

Read More »

उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी डॉक्टर मानधनाच्या प्रतीक्षेत

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने विशेष तज्ज्ञ पदावर काम करणार्‍या पाच डॉक्टरांना 2019-20मध्ये माहे ऑगस्ट 19पासून अद्यापपर्यंत सहा महिन्यांचे कामाचे मानधन संबंधित कार्यालयाकडून अनुदान प्राप्त न झाल्यामुळे मिळाले नसल्याने या सर्व डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे. माणगाव उपजिल्हा रुग्णालय हे दक्षिण रायगडमधील मोठे व …

Read More »