Breaking News

Monthly Archives: April 2020

भाजप नगरसेविकेने राबविला आरोग्यविषयक उपक्रम

नवी मुंबई : बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रहिवासी भयभीत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नेरूळ पश्चिमेला प्रभाग 96च्या भाजपच्या स्थानिक नगरसेविका रूपाली भगत व समाजसेवक गणेश भगत यांनी आरोग्यविषयक उपक्रमांचा धडाका लावत स्थानिक रहिवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाचे पडघम वाजू लागताच नगरसेविका रूपाली भगत व समाजसेवक गणेश भगत यांनी …

Read More »

भाजप नेते चंद्रकांत घरत यांच्याकडून उरणमध्ये गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

उरण : वार्ताहर कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी शासनाने 21  दिवसांचे लॉकडाऊन केले आहे. हातावर पोट असलेल्या गरिबांचे खूप हाल झाले आहेत. त्यांना हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप रायगड जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष चंद्रकांत घरत यांच्या वतीने गरिबांना सोमवारी (दि. …

Read More »

नियमांचे उल्लंघन करून सोसायटीची बैठक

कामोठ्यातील यमुना गृहनिर्माण संस्थेतील प्रकार; रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण कळंबोली : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याची कोरोनाच्या साथीने झोप उडविली आहे. देशात, राज्यात आणीबाणीची परिस्थिती असताना पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोमोठे येथील यमुना गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी गृहनिर्माण संस्थेच्या आवारात मंगळवारी (दि. 7) सकाळी 11.30 वाजता खुली बैठक घेतली. संचारबंदी, लॉकडाऊन कलम 144 व सूचनांचे, …

Read More »

नेरळमधील रक्तदान शिबिरास उत्स्फू र्त प्रतिसाद; 155 दात्यांचा सहभाग

कर्जत ः बातमीदार – कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन अथक  प्रयत्न करीत असून रुग्णांवर उपचार करताना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत नेरळ येथे आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल 155 रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य केले. दरम्यान, नेरळमधील …

Read More »

भटक्या कुत्र्यांना अन्नदान; रोह्यातील प्राणीमित्रांनी जपली भूतदया

रोहा ः वार्ताहर – देशभरातील लॉकडाऊनमुळे भटके श्वान, रस्त्यावर फिरणार्‍या गायी तसेच अन्य प्राण्यांना अन्न मिळत नसल्यामुळे त्यांचे हाल होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर रोह्यातील प्राणीमित्र कुमार देशपांडे, शेखर सप्रे, स्वप्ना सप्रे व रोह्यातील अन्य प्राणीमित्रांनी एकत्र येत विशेष अभियान हाती घेतले आहे. लॉकडाऊनच्या काळात ते रोह्यातील प्राण्यांना नित्यनेमाने दहीभात …

Read More »

शिक्षकांकडून एसटीचालक, आदिवासींना मदतीचा हात

मुरूड ः प्रतिनिधी – संचारबंदीच्या काळात येथील श्री. छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतगर नांदगाव हायस्कूलमधील मुख्याध्यापक चिंतामणी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर वृंदाने मुरूड आगारातील एसटी चालक-वाहक व काशीद ग्रामपंचायतीमधील दोन आदिवासीवाडीमधील लोकांना तांदूळ, डाळ व गोडेतेल पाकिटांचे वाटप केले. या वेळी मुख्याध्यापक चिंतामणी जोशी, पर्यवेक्षक उत्तमराव वाघमोडे, …

Read More »

बँक ऑफ इंडियाकडून निराधार महिलांना धान्यवाटप

महाड ः प्रतिनिधी – लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब मजुरांचे रोजगाराअभावी हाल होऊ लागले आहेत. तसेच निराधार महिलांना कोणताच रोजगार नाही आणि त्यामुळे अन्नधान्यही मिळत नाही. या पार्श्वभूमीवर बँक ऑफ इंडियाच्या महाड शाखेने पुढे येत या महिलांना आधार दिला आहे. देशासह राज्यात कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे गरिबांचे कंबरडे मोडले आहे. निराधार महिलांना …

Read More »

निजामपूरला पाणीटंचाईचे चटके कायम

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना पायपीट माणगाव ः प्रतिनिधी – भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावू लागली आहे. त्यामुळे नदी, विहिरी, बोअरवेलचे पाणी आटू लागल्याने माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. निजामपूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भीषण पाणीटंचाई सुरू झाली असून गेली अनेक दिवसांपासून निजामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजाभाऊ रणपिसे व …

Read More »

दीर्घ लढाईसाठी देश सज्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्गार नवी दिल्ली : वृत्तसंस्थासध्या सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाविरुद्धची लढाई ही दीर्घकालीन असून, देशातील 130 कोटी जनता या युद्धात जिंकण्याच्या इच्छाशक्तीने एक झाली आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 6) काढले. ते भारतीय जनता पक्षाच्या 40व्या स्थापना दिनानिमित्त भाजप कार्यकर्त्यांशी …

Read More »

देशातील रुग्णांचा आकडा चार हजारांच्या वर

नवी दिल्ली, मुंबई : देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढून 4067वर पोहोचली आहे. एकूण 109 जणांचा आतापर्यंत मृत्यू आहे. यातील 30 जणांचा गेल्या 24 तासांत मृत्यू झाला असून 693 नवे करोना रुग्ण देशात आढळून आले आहेत, तर 4067 रुग्णांपैकी तबलीघी जमात मरकझशी संबंधित 1445 रुग्ण आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या …

Read More »