Breaking News

Monthly Archives: April 2020

नागुर्ले येथील आदिवाडीतील कुटुंबांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने धान्य वाटप

कर्जत ः तालुक्यातील नागुर्ले येथील आदिवाडीतील कुटुंबांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने धान्य वाटप करण्यात आले. या वेळी भाजप किसान मोर्चाचे सुनील गोगटे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेविका विशाखा जिनगरे, स्वामिनी मांजरे, दीपक बेहेरे,  राजेश भगत, मंदार मेहेंदळे, घन:श्याम परांजपे, गायत्री परांजपे, सूर्यकांत गुप्ता, दिनेश भरकले उपस्थित होते. (छाया : विजय मांडे)

Read More »

रिलायन्सकडून जीवनावश्यक साहित्याचे वाटप

नागोठणे ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. अनेकांचे उत्पन्न बंद झाले असून त्यात या भागातील आदिवासी समाजालासुद्धा त्याचा फटका बसला आहे. अनेक आदिवासींच्या घरातील अन्नधान्य संपल्याने येथील रिलायन्स कंपनीच्या सीएसआर विभागाच्या वतीने विभागातील रोहे आणि पेण तालुक्यातील 25 आदिवासी वाड्यांवर जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात …

Read More »

संचारबंदी आदेशाचा भंग; वाहनचालकांवर कारवाई

महाड ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात असताना जिल्ह्यामध्ये 144 कलम लागू करून संचारबंदी जारी करण्यात आली आहे. याची कडक अंमलबजावणी करण्याचे काम पोलीस करीत आहेत. त्यानुसार विनाकारण मोटरसायकलवरून फिरणार्‍यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत 500पेक्षा अधिक मोटरसायकलस्वारांवर कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी …

Read More »

ठाण्यात ड्युटी लावल्याने एसटीचालक नाराज

मुरूड ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांमधून एसटी चालकांची ड्युटी ठाणे येथे अत्यावश्यक सेवा म्हणून लावण्यात आली आहे. त्यानुसार काही आगारांतील चालक व वाहक ठाणे येथे आपली ड्युटी बजावण्यासही गेले होते, परंतु सर्वत्र लॉकडाऊन असल्याने येथे कर्तव्य बजावणार्‍या चालक-वाहकांची राहण्याची व भोजनाची परवड होऊ लागली. परिणामी एसटीचालकांत नाराजी पसरली आहे. …

Read More »

खालापुरात जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन; गुन्हा दाखल

खोपोली ः बातमीदार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्हाधिकार्‍यांनी जारी केलेल्या आदेशाचा भंग करून खाद्यपदार्थ विक्री करणारा हसमुख अशोक प्रजापती (27, रा. चौक, खालापूर) याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे, तर अन्य एका घटनेत दारूविक्री करणार्‍या इसमाला खोपोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौक पोलीस दूरक्षेत्र हद्दीत गुरुवारी संध्याकाळी सव्वासहा वाजता प्रजापती हा …

Read More »

माणगावात तिसर्या दिवशीही शुकशुकाट

माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी माणगाव व तालुक्यातील मोर्बा गावातील दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने दि. 2, 3 व 4 एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंद पाळण्याचा निर्णय घेतला. सलग तिसर्‍या दिवशीही माणगाव व मोर्बा या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात येऊन सर्वत्र शुकशुकाट होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणगाव, मोर्बात कडकडीत बंद पाळण्यात आल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी …

Read More »

कर्जत नगर परिषदेतर्फे स्वच्छता अभियान

कर्जत ः बातमीदार कर्जत नगर परिषदेने कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी संचारबंदीचा फायदा घेऊन कर्जत शहर निर्जंतुक केले आहे. त्यानंतर नागरिकांची काळजी घेण्यासाठी अधिकची उपाययोजना करण्यासाठी स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. कर्जत नगर परिषदेकडून नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी शहरात कोरोनाचा संसर्ग होऊ नये …

Read More »

योग्य आहाराने टाळा हृदयरोग

हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी पौष्टिक आहार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. चांगली जीवनशैली व आहार उच्च रक्तदाब, रक्तातील कोलेस्ट्रॉलचे वाढते प्रमाण, लठ्ठपणा यांसारखे आजार टाळण्यास मदत करू शकतात. हे सर्व घटक हृदयरोग होण्यासाठी कारणीभूत ठरतात. जगभरात व आपल्या देशातही वाढते शहरीकरण, आर्थिक प्रगती, कामामुळे व फिरण्यासाठी वाढलेला प्रवास, बाहेरचे खाणे …

Read More »

शिवरायांच्या मावळ्यांत कोरोनावर मात करण्याची ताकद -जिल्हाधिकारी

खोपोली ः प्रतिनिधी  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात आणि राज्यात अनेक रुग्ण आढळत असले तरी रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. कारण हा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असून महाराजांचे मावळे कोरोनासारख्या विषाणूंना घाबरणारे नसून त्याच्या विरोधात लढणारे आहेत, मात्र यादरम्यान नागरिकांनी घरात राहून कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रायगडच्या …

Read More »

गरिबांपर्यंत मोफत धान्य पोहचवण्यासाठी राज्याने अटी मागे घ्याव्यात -देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रतिनिधीकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या देशभरात जो लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे, त्या काळात प्रत्येक गरजू आणि गरिबाला तीन महिन्यांचे धान्य एकत्रित आणि मोफत मिळावे, यासंदर्भात स्पष्ट आदेश केंद्र सरकारने दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आपल्या आदेशातील त्रुटी त्वरित दूर करून प्रत्येक गरजूला धान्य मिळेल हे सुनिश्चित करावे, अशी …

Read More »