Breaking News

Monthly Archives: April 2020

पोलिसांच्या माणुसकीचे दर्शन

नवी मुंबई : सिवूडस डी मार्ट येथील चौकात नवी मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. लोकडाऊनमुळे हातावर पोट असणार्‍यांची वाताहत झाली आहे. डी मार्टमध्ये येणार्‍या नागरिकांकडे भीक मागण्यासाठी झोपडपट्टीतील लोक येऊ लागले आहेत. इतरवेळी दंडुक्याचा धाक दाखवणार्‍या पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवत या झोपडपट्टीतील लोकांना जेवणाच्या डब्यांचे वाटप करून खाकितील माणुसकीचे दर्शन …

Read More »

कोरोनाच्या लढाईत बौद्धजन पंचायतीचा मदतीचा हात

पाली ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटात मानवतेच्या दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जपत सुधागड तालुका बौद्धजन पंचायत संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 हजारांचा धनादेश देण्यात आला. सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांच्याकडे नुकताच संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी धनादेश सुपूर्द केला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष दीपक पवार यांच्यासह नरेश शिंदे, प्रभाकर गायकवाड, रवींद्र ओव्हाळ, मोरेश्वर कांबळे, …

Read More »

अमृतांजन पुलाला लॉकडाऊनचा मुहूर्त; द्रुतगती मार्गावरील कोंडी फुटणार

खोपोली ः बातमीदार लॉकडाऊनचा मुहूर्त साधत देशातील पहिला सहापदरी द्रुतगती मार्ग असलेला मुंबई- पुणे मार्गावरील अमृतांजन पूल शनिवारपासून (दि. 4) पाडण्यास सुरुवात होणार असून त्यामुळे घाटातील प्रवास सुसह्य होणार आहे. पुलाच्या संपलेल्या वयोमर्यादेमुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडून पूल पाडणार आहे. बोरघाटाचा अवघड वळणाचा रस्ता …

Read More »

खारघर येथील विलगीकरण कक्षाकरिता पनवेल महावितरणचा तत्काळ वीजपुरवठा

नवी मुंबई, पनवेल : बातमीदार वीज ही  अत्यावश्यक सेवा असून  लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरणमधील अधिकारी व कर्मचारी हे वीजपुरवठा सुरळीत व अखंडितपणे सुरु ठेवण्यासाठी दिवसरात्र काम करीत आहेत. खारघर येथील डीजी पोळ फाऊंडेशनतर्फे निमिषा रुग्णालयात, सेक्टर 4 येथे विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे. यासाठी महावितरणच्या भांडूप परिमंडलातील पनवेल शहर विभागाचे …

Read More »

अत्यावश्यक सेवेत मोडणार्‍या कंपन्यांनी कामगारांना विमाकवच द्यावे; भाजपची मागणी

रसायनी : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रसायनी पाताळगंगा औद्यागिक क्षेत्रात मोडणार्‍या ज्या काही  अत्यावश्यक सेवा पुरवणार्‍या कंपन्या सुरु आहेत, त्या कंपन्यानी आपल्या कामगारांना 50 लाख विमाकवच द्यावे अशा मागणीचे आमदार महेश बालदी यांचे पत्र भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संबंधित कंपन्यांना दिले. निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, कोरोनाचे संकट हे संपूर्ण देशभर अतिशय गंभीर …

Read More »

विनाकारण फिरणार्‍या वाहनांवर जप्तीची कारवाई

अलिबाग ः प्रतिनिधी लॉकडाऊनच्या काळात प्रेमाने सांगून, फटके देऊनही लोक ऐकत नाहीत. विनाकारण रस्त्यावर वाहने फिरवणार्‍यांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे अखेर रायगड पोलिसांनी आता वाहनजप्तीच्या कारवाईला सुरुवात केली आहे. यात शेकडो वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. रायगडात ठिकठिकाणी सुरू असलेल्या नाकाबंदीत गुरुवारी (दि. 2)  वाहनांची कसून तपासणी केली जात …

Read More »

मुंबईहून येणार्‍यांचा धोका वाढला; चाकरमानी पायी चालत पोहचले गावी

महाड ः प्रतिनिधी संपूर्ण देशात संचारबंदी असल्याने प्रवासी वाहने बंद आहेत. त्यातच मुंबई-पुणेसारख्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कोकणातील चाकरमानी भयभीत होऊन आपल्या गावी परतू लागले आहेत. जिल्ह्यात अनेक गावांत हे चाकरमानी पायी चालत येत असून यामुळे धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संचारबंदी असताना जिल्हा हद्दीतच या नागरिकांना ताब्यात घेतले …

Read More »

पोलिसांसाठी सॅनिटायझरचे वाटप

पनवेल : क्रांतिज्योत महिला विकास फाऊंडेशनच्या वतीने पनवेल येथील खांदेश्वर पोलीस स्टेशन, कामोठे पोलीस स्टेशन, कळंबोली पोलीस स्टेशन तसेच आसूडगाव वाहतूक शाखा चौकी, कळंबोली वाहतूक शाखा चौकी व मॅकडोनाल्डजवळील बंदोबस्त करीत असलेले अधिकारी व कर्मचार्‍यांना सॅनिटायझरचे फाऊंडेशनच्या अध्यक्षा रुपाली शिंदे, निकेशा केमिकल्स प्रा. लि.चे प्रोप्राईटर मृगेश दोषी यांनी वाटप केले. …

Read More »

‘रोटरी’तर्फे पनवेलच्या क्राईम ब्रँच युनिटला मास्क, सॅनिटायझर

पनवेल : वार्ताहर आजच्या काळामध्ये पोलिसांची भूमिका महत्त्वाची असून ते 24 तास कर्तव्य बजाविण्यासाठी रस्त्यावर असतात. या वेळी त्यांना अनेकांशी संपर्क येतो. यातून कोरोनासारख्या विषाणूंचा प्रादूर्भाव त्यांना होऊ नये म्हणून रोटरी क्लब ऑफ कळंबोलीच्या वतीने क्राईम ब्रँच युनिट-2 पनवेलच्या पथकाला मास्कसह सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. क्राईम ब्रँच युनिट-2, पनवेलचे वरिष्ठ …

Read More »

पनवेलच्या रेशन दुकानांत धान्याचा पुरेसा पुरवठा

पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार लॉकडाऊनदरम्यान पनवेल तालुक्यातील रेशन दुकानात  गहू आणि तांदूळ यांचा पुरेसा पुरवठा करण्यात आलेला आहे. आठवड्याभरात सर्व दुकानांमध्ये रेशनचे धान्य पोहचवली जाईल, आता साखर देखील उपलब्ध होईल, अशी माहिती पुरवठा अधिकार्‍यांनी दिली आहे. पनवेल तहसील हद्दीत येणार्‍या एकूण 193 रेशन दुकानांपैकी 60 दुकानांमध्ये गहू आणि तांदूळ यांचा …

Read More »