पनवेल : प्रतिनिधी मुंबईमध्ये धारावी झोपडपट्टीचा परिसर कोरोना रुग्ण सापडल्याने पोलिसांनी बंद केल्यावर घाबरलेलले नागरिक आपल्या गावाची वाट धरू लागले आहेत. राज्यात सार्वजनिक वाहातूकीच्या सर्व सुविधा बंद असतांनाही लहान मुले कडेवर घेतलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक चालत पनवेलला येत आहेत. या ठिकाणी त्यांना काही तरूण खारपाडा तपासणी नाक्याच्या पुढून टेम्पो सुरू …
Read More »Monthly Archives: April 2020
कोरोनाचा धोका वाढला!
कळंबोलीत आणखी चार जवानांना लागण; पनवेल तालुक्यातील एकूण संख्या आठवर पनवेल : रामप्रहर वृत्तकळंबोली येथे वास्तव्यास असलेल्या सीआयएसएफच्या एकूण पाच जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर झाले आहे. त्यामुळे कळंबोली हादरली आहे. आता पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आठवर पोहोचली आहे. कोरोनाची लागण झालेले पाचही जवान मुंबई विमानतळावर सुरक्षेचे …
Read More »दिल्लीतील ‘त्या’ कार्यक्रमात रायगडातील 14 जणांचा सहभाग
अलिबाग : दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिकी-ए-जमातीच्या धार्मिक कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील 14 जणांनी सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. या संमेलनात भाग घेतलेल्यांपैकी देशभरातील 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे रायगडकरांची डोकेदुखी वाढली आहे. या 14पैकी एक जण जिल्ह्यात परतलेला नाही आणि एकाचा शोध घेण्यात येत आहे, तर उरलेल्या 12 …
Read More »अलिबागमध्ये ऑनलाईन योगवर्ग
अलिबाग : प्रतिनिधीलॉकडाऊन आणि संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर अलिबाग येथील सुंदर वेलनेस सेंटरतर्फे त्यांच्या साधकांसाठी ऑनलाईन वर्ग घेण्यात येत आहे. या प्रयोगाचे योगप्रेमींकडून उत्स्फूर्त स्वागत होत आहे.गतवर्षीच्या मार्च महिन्यात योगप्रशिक्षिका सायली वेंगुर्लेकर यांनी अलिबागमध्ये वेलनेस योग सेंटरची स्थापना केली. या योग सेंटरमध्ये अलिबाग परिसरातील जवळजवळ 80 साधक नित्यनेमाने दिवसभरातील वेगवेगळ्या वेळेत योगसाधना …
Read More »अझिम प्रेमजींकडून 1125 कोटींचा निधी
मुंबई : प्रतिनिधीकोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशातीले उद्योगपती पुढे येत आहेत. टाटा, अंबानी यांच्यानंतर आता विप्रो कंपनीचे अझिम प्रेमजी यांच्याकडून कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी 1125 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. विप्रो लिमिटेडने 100 कोटी, विप्रो इंटरप्रायझेसने 25 कोटी, तर अझिम प्रेमजी फाऊंडेशनने 1000 कोटी रुपयांची मदत जाहीर केली …
Read More »अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त पेट्रोल देण्यास मनाई
अलिबाग : जिमाकाकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अत्यावश्यक सेवा पुरविणार्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तींच्या दुचाकी वाहनांना नागरी भागात पेट्रोल देण्यास मनाई करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी निधी चौधरी यांनी पारित केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित पेट्रोल पंपधारकाविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 14 …
Read More »कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गरीब, गरजूंना पनवेल भाजपतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पनवेल : प्रतिनिधीमाजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिका हद्दीत पक्षातर्फे गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू केले आहे. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असलेले गरजवंत, गोरगरीबांना यातून दिलासा मिळाला …
Read More »अजूनही गर्दी?
दिल्लीमध्ये जमावबंदी असताना निजामुद्दीनमधील मरकजमध्ये अनेक जण एकत्र राहिले, झोपले. देशात तोवर कोरोनाबाधितांच्या केसेस उघड झाल्या होत्या. अमेरिका, इटलीसारख्या देशांमधून परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे स्पष्ट दिसत होते. देशोदेशीच्या सरकारी यंत्रणा हे पाहून हबकल्या होत्या. तरीही मरकजमधील लोकांपर्यंत परिस्थितीचे गांभीर्य पोहोचलेच नाही. हे कसे? तरी निव्वळ त्यांनाच दोष द्यायचा? भाजीखरेदीसाठी गर्दी करणार्यांना, …
Read More »मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा
दरे कुटूंबियांचा समाजापुढे आदर्श पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्याती नितळस गावात रविवारी (दि. 29) एक विवाह सोहळा झाला. दारात मंडप नाही, वर्हाडी ही नाही, वाजंत्री नाही की नाजुक साजुक करवल्या नाहीत. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन असल्याने घरातील फक्त काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा करून पाटील आणि दरे कुटूंबियांनी समाजापुढे एक …
Read More »लायन्स क्लबतर्फे जीवनावश्यक वस्तू वाटप
उरण : वार्ताहर कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये सर्वत्र लॉकडाऊन केल्याने उरण परिसरात रोजंदारीवर काम करणार्यांना काम मिळणे बंद झाले आहे, त्यांची उपासमार होत आहे. अशा गरिबांना मदत करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. उरण लायन्स क्लब ऑफ उरणच्या वतीने बुधवारी (दि.1) एप्रिल रोजी 140 किराणा समान देण्यात आले त्यात कांदे, …
Read More »