Breaking News

Monthly Archives: July 2020

शिरगाव येथे विवाहितेचा छळ; सहा जणांवर गुन्हा दाखल

रेवदंडा ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील शिरगाव येथे संशयातून बदनामी करून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिरगाव येथील लॅब टेक्निशियन असलेली 22 वर्षीय विवाहित महिला प्रणाली पाटील यांच्याकडे 7 मे 2019 ते 14 एप्रिल 2020 …

Read More »

सह्याद्री प्रतिष्ठानकडून ऑक्सिजन सिलिंडर वाटप

पेण ः प्रतिनिधी देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात ऑक्सिजनअभावी काही कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूही ओढवला आहे. त्या पार्श्वभूमीवर सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्यांनी ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना ऑक्सिजन सिलिंडर किट द्यायचा निर्धार करून तो पूर्णही केला.  सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी 40 हजारांची रक्कम जमा करून सर्व किट घेण्यात आले. संकष्टी चतुर्थीच्या …

Read More »

रायगडात कोरोनाचा हाहाकार; ग्रामीण, शहरी भागाला विळखा

पाली ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजविला आहे. शहरी व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचा चढता आलेख पाहता कोरोनाची मगरमिठी दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. आजघडीला जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सहा हजार 107 झाल्याने जिल्ह्याची धडधड वाढली आहे. अशातच कोरोनाचे रुग्ण आढळलेली क्षेत्र कोरोनाबाधित घोषित केल्याने नागरिकांची मोठी कोंडी …

Read More »

माणगावात 14 नवे कोरोनाग्रस्त बाधितांची संख्या 66

माणगाव ः प्रतिनिधी      रायगड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून माणगाव तालुक्यात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्याने जनतेबरोबरच प्रशासनही हतबल झाले आहे. माणगाव तालुक्यात माणगाव नगरपंचायत हद्दीत चार, मोर्बा गावात चार, इंदापूर गावात तीन, तर मुठवली, साई आणि कशेणे गावात प्रत्येकी एक असे एकूण 14 कोरोनाबाधित आढळले असून त्यांचा कोरोना अहवाल …

Read More »

खवले मांजराला जीवदान

पाली ः प्रतिनिधी विळे गावाच्या हद्दीत काही तरुणांना रस्त्याच्या कडेला सापडलेल्या खवले मांजराला  वनविभाग, शिक्षक व तरुणांच्या साहाय्याने तपासणी करून जंगलात सुखरूप सोडून जीवदान देण्यात आले. विळे गावाजवळील पेट्रोलपंपाच्या रस्त्याशेजारी एक खवले मांजर काही तरुणांना दिसले. वाहनांच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला असता, कोणी त्याला पकडून तस्करीदेखील केली असती किंवा मारून …

Read More »

रस्त्यावरील वीजवाहक खांब ठरतोय मृत्यूला आमंत्रण

कर्जत ः बातमीदार कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर डिकसळ-नेरळ भागातील रस्त्यावर वडवली गावाजवळ असलेला टाटाची वीज वाहून नेणारा भलामोठा खांब वाहनांसाठी धोकादायक ठरत आहे. हा वीजवाहक खांब अगदी रस्त्यावर असून कोणत्याही क्षणी तेथे मोठा अपघात होऊ शकतो अशा प्रकारे त्या खांबाची रचना आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेली 10 वर्षे त्या खांबाबाबत …

Read More »

रायगडातील 90 गावे विजेच्या प्रतीक्षेत

अलिबाग : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळ होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालवधी होऊन गेला. वीजपुरवठा सुरळीत होण्याची 7 जुलै ही डेडलाइन होती, मात्र आजही श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यातील 90 गावे अंधारातच आहे. इतर काही ठिकाणीही समस्या आहेत. पाऊस आणि मजुरांची कमतरता यामुळे कामाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस तरी या गावांना …

Read More »

पंतप्रधान मोदींचा निर्णय योग्यच!

शरद पवार यांच्याकडून पुन्हा समर्थन पुणे : प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लेह येथील लष्करी तळावर जाऊन सैनिकांशी संवाद साधण्याचा निर्णय योग्यच होता, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. जेव्हा तणावपूर्ण प्रसंग उद्भवतो तेव्हा देशाच्या नेतृत्वाने सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचललीच …

Read More »

भाजपचे राजेंद्र बनकर यांचे निधन

कळंबोली : प्रतिनिधी, बातमीदारभाजपचे कळंबोली सरचिटणीस आणि माथाडी कामगारांचे नेते राजेंद्र दादू बनकर यांचे बुधवारी (दि. 8) पहाटे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले. ते 53 वर्षांचे होते. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या राजूशेठ यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. राजेंद्र बनकर यांना शुक्रवारी अस्वस्थ वाटायला लागल्याने खांदा कॉलनीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात …

Read More »

कर्जतमधील वृद्धाश्रमात आणखी 12 जण पॉझिटिव्ह

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील डीग्निटी लाइफस्टाइल वृद्धाश्रमात बुधवारी (दि. 8) आणखी 12 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे तेथील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 14वर पोहोचली आहे. नव्याने आढळलेले रुग्ण हे कर्मचारी असल्याने तेथील ज्येेष्ठ नागरिकांसह परिसरात कोविड रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. कर्जत-नेरळ रस्त्यावर माणगाव तर्फे वरेडी गावाच्या हद्दीत …

Read More »