मोहोपाडा : प्रतिनिधी – चौक वावर्ले येथील कानसा-वारणा फाऊंडेशनतर्फे राज्यातील विविध जिल्ह्यात विविध जातीच्या 4000 वृक्षाची लागवड करण्यात आली तर 2000 शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करुन गरजूंना किराणा सामानाचे किटही वाटप करण्यात आले. संस्थापक दीपक पाटील, अध्यक्ष कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कानसा-वारणा फाऊंडेशनचे पदाधिकारी सहकारी यांच्या सहकार्याने योगेश …
Read More »Monthly Archives: August 2020
विद्यार्थ्यांनी बांधल्या वृक्षांना राख्या
नवी मुंबई : प्रतिनिधी – वृक्ष ही सजीवांच्या जीवनासाठी अनमोल आहेत. परंतु सिमेंटची जंगले उभी राहत असताना वृक्ष संवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे. भावी पिढीकडून वृक्षाकडे दुर्लक्ष होऊ नये. न्यू बॉम्बे सिटी स्कूल, घणसोलीमधील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी वृक्षांना राख्या बांधल्या व वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली. घणसोली सेक्टर 9 मधील न्यू बॉम्बे …
Read More »अस्थिव्यंग असलेल्या टीनाने मिळवले 84 टक्के गुण
पनवेल : बातमीदार – अस्थिव्यंग असून देखील बेलवली येथील टीना दत्तात्रेय ढवळे या विद्यार्थिनीने दहावीच्या परिक्षेत उज्ज्वल यश मिळवत 84.60 टक्के गुण मिळवले आहेत. दहावी नंतर पुढे सायन्समध्ये प्रवेश घेणार असल्याचे टिनाने सांगितले. टीना ढवळे ही शेतकरी कुटुंबातील मुलगी असून तिचे वडील दत्तात्रेय ढवळे हे एका कोल्ड स्टोरेजमध्ये काम करतात. …
Read More »लॉकडाऊन काळात पनवेलमध्ये चार हजार 924 बाळांचा जन्म
कळंबोली : रामप्रहर वृत्त – लॉकडाऊन आणि कोरोना साथीच्या काळात पनवेल शासकीय उपजिल्हा रुग्णालय हे कोविड सेंटर म्हणून उपलब्ध केल्यानंतर, येथील बाह्य रुग्णांसाठी महापालिकेने प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली. त्यानुसार, येथे नागरिकांवर उपचार केले जात आहेत, तर गरोदर मातांवरील उपचार, प्रसूती एमजीएम रुग्णालय कामोठे येथील रुग्णालयात केले जात आहे. त्यानुसार, …
Read More »पनवेलमध्ये नॉन कोविड प्रसुती केंद्र सुरू
नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या मागणीला यश पनवेल : बातमीदार – पनवेल महानगरपालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढीस लागलेली आहे. प्रशासनाकडून या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दररोज शंभरपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळे पनवेल कोळीवाडा येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड …
Read More »सर्व रुग्णांची माहिती देणे दवाखान्यांना बंधनकारक
मृत्यूदर कमी करण्यासाठी नवी मुंबई पालिकेची उपाययोजना नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत आजमितीस 431 मृत्यू झाले आहेत. तर एकूण 16 हजारांच्यावर रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. असे असले तरी नवी मुंबईचा मृत्युदर 2.67 असून तो कमी होताना दिसत नाही. पालिकेकडून आयसीयू, व्हेंटिलेटर्स व ऑक्सिजन बेड वाढवण्याचे काम वेगात सुरू …
Read More »पावसाची आस
एकीकडे कोरोनाचे संकट कायम असताना दुसरीकडे वरुणराजा रुसल्याने ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचे संकट राज्यात उभे ठाकले आहे. अपुर्या जलसाठ्यामुळे काही ठिकाणी पाणीकपातीचाही निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्राला ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागले होते. यंदा परिस्थिती आतापर्यंत तरी नेमकी उलट दिसत आहे. भारतीय उपखंडात उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे तीन प्रमुख …
Read More »स्पीहा व एमजीआरएसएकडून वृक्षारोपण
पनवेल : रामप्रहर वृत्त सत्संग असोसिएशनच्या मुंबई आणि आकुर्ली पनवेल केंद्राच्या वतीने स्पीहा या पर्यावरणवादी संस्थेच्या सहकार्याने शनिवारी (दि. 1) जागतिक वृक्षारोपण दिन साजरा करण्यात आला. सदस्यांनी घराच्या जवळ, मैदानात वृक्षांची लागवड केली. तर काही ठिकाणी रोप तयार करण्यासाठी बीजारोपण करण्यात आले. स्पीहा ही स्वयंसेवी संस्था स्वस्थ पर्यावरण, पर्यावरणशास्त्र व …
Read More »कशेडी घाटातून सरसकट रत्नागिरी जिल्हा प्रवेश
पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात शनिवारी रात्रीपासून सुरु झालेल्या वाहतुकीच्या खोळंब्यानंतर रविवारी सरसकट रत्नागिरी जिल्हा प्रवेश देण्याचा निर्णय रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने घेतला. मात्र कशेडी घाटातील तपासणी नाक्यावर प्रवाशांचे नोंदविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कशेडी घाटातील कशेडी बंगला येथे रायगड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये कोरोना …
Read More »निसर्ग चक्रीवादळात श्रीवर्धनच्या प्रभू विश्वकर्मा मंदिराचे नुकसान
श्रीवर्धन : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते येथील प्रभू विश्वकर्मा मंदिराचे फार मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रत सुप्रसिद्ध असलेल्या विश्वकर्मिय कारागिरांचे व सर्व स्तरातील कारागीर वर्गाचे श्रद्धास्थान असलेले विश्वकर्मिय लोहार सुतार समाज ता. श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड या रायगड विभागीय संघटनेचे प्रभु विश्वकर्मा मंदिर भोस्ते, ता. श्रीवर्धन, जि. रायगड …
Read More »