Breaking News

Monthly Archives: September 2020

माणगावमधील जुगार अड्ड्यावर छापा

20 जणांना अटक; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त माणगाव ः प्रतिनिधी माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील विंचवली परिसरातील एका बंद घरात अनधिकृतपणे सुरू असलेला जुगार अड्डा रायगड पोलिसांनी उधळला आहे. 2 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजता छापा टाकून केलेल्या धडक कारवाईत 20 जणांना जुगार खेळताना अटक करण्यात आली असून जुगाराचे साहित्य, रोख …

Read More »

रायगडात 17 रुग्णांचा मृत्यू; 615 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 3) दिवसभरात 17 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 615 नव्या रुग्णांची नोंद झाली. दुसरीकडे 410 जण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 308, पेण 90, अलिबाग 56, माणगाव 32, खालापूर 31, कर्जत 24, रोहा 21, उरण 14, महाड 13, सुधागड नऊ, श्रीवर्धन …

Read More »

महाड इमारत दुर्घटनेच्या मुख्य बिल्डरची न्यायालयात शरणागती

महाड ः प्रतिनिधीमहाड शहरातील तारिक गार्डन दुर्घटनेतील दोन आरोपींना यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले असून गुरुवारी (दि. 3) इमारतीचा मुख्य बिल्डर फारूक काझी याने न्यायालयात शरणागती पत्करली. त्यानंतर महाड शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. महाड शहरातील तारिक गार्डन इमारत कोसळून 16 जणांना प्राण गमवावे लागले होते. या दुर्घटनेला जबाबदार धरून …

Read More »

साडेचार हजार एसटी वाहक-चालकांना दिलासा

सेवेस देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती उठविली मुंबई ः प्रतिनिधीराज्य परिवहन महामंडळात 2019मध्ये सरळसेवा भरती अंतर्गत सेवेत दाखल झालेल्या चालक-वाहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कर्मचार्‍यांच्या सेवेस देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती उठवण्यात आली आहे. त्यामुळे साडेचार हजार कर्मचार्‍यांच्या नोकर्‍यांवरील संकट तूर्तास दूर झाले आहे.कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने राज्य परिवहन महामंडळाची …

Read More »

धीरापोटी फळे गोमटी

आपण सगळेच सध्या अनलॉक 4च्या आनंदात आहोत. अवतीभवती बरेच काही खुले होत असल्याचा हा आनंद स्वाभाविक आहे. परंतु या आनंदाला बेफिकीरीची जोड मिळाल्यास मात्र गंभीर परिणाम भोगावे लागतील. बुधवारी महाराष्ट्रात आजवरच्या सर्वाधिक 17 हजार 433 केसेस नोंदल्या गेल्या, तर गुरूवारी देशपातळीवर आजवरच्या सर्वाधिक 83 हजार 883 नव्या केसेसची नोंद झाली. …

Read More »

राज ठाकरेही मंदिर प्रवेशावरून आक्रमक

मुंबई ः प्रतिनिधी  भाजप, वंचित बहुजन आघाडी व एमआयएमपाठोपाठ आता राज ठाकरे यांच्या मनसेनेही मंदिर प्रवेशावरून राज्यातील आघाडी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. सरकारला मंदिरे उघडण्याबाबत इतका आकस का आहे, असा सवाल करतानाच सर्वांत शेवटी मंदिरे उघडून उगाच नको ते पुरोगामित्व दाखवू नका. मंदिरे उघडण्याचा निर्णय लवकरात लवकर घेतला नाही, तर …

Read More »

आगामी नवरात्रोत्सवासाठी मूर्तिकारांना दिलासा द्यावा

भाजपची मागणी मुंबई ः प्रतिनिधीगणेशोत्सव काळात उत्सवाची नियमावली, चाकरमान्यांच्या प्रवासाची सोय व अन्य मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला धारेवर धरणार्‍या भाजपने आता सरकारला नवरात्रोत्सवाची आठवण करून दिली आहे. या वेळी मूर्तिकारांना दिलासा देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. भाजपचे आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर पत्र …

Read More »

नवी मुुंबई पालिका अधिकार्यांच्या चौकशीची मागणी

आमदार गणेश नाईकांचा पालकमंत्र्यांना इशारा नवी मुंबई : बातमीदार – आरोग्य विभागात ठाणेकरांच्या आशीर्वादाने कोणताही अनुभव नसताना व उपवैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केलेल्या अधिकार्‍यांची व त्यांनी केलेल्या कामांची व दिलेल्या कंत्राटांची चौकशी करावी, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी आयुक्तांकडे केली आहे. तसेच हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार असल्याचा इशारा …

Read More »

सात नव्या मार्गांवर धावणार बुलेट ट्रेन; प्रस्ताव सादर

नवी दिल्ली : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरनंतर आता मोदी सरकारने आणखी सात नव्या कॉरिडॉरसाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला प्रस्ताव दिला आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग 508 किमी लांबीचा आहे, तर नव्या सात कॉरिडॉरच्या माध्यमातून पाच हजार किलोमीटरवर बुलेट ट्रेन धावेल. प्रस्तावित सात नव्या मार्गांचा आढावा घेण्याचे काम रेल्वे …

Read More »

अरुण घाग यांची निवड

उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज, जासई या विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण घाग यांची 2021 ते 2023 या कालावधीसाठी संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनी कार्यकारी मंडळ सदस्य आणि रयत सेवक कुटुंब कल्याण योजनेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्य पदी नियुक्ती …

Read More »