Breaking News

Monthly Archives: October 2020

शिरढोण येथील चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून कर्नाळा पक्षी अभयारण्य व ग्रामपरिस्थितिकीय विकास समिती शिरढोण यांच्या संयुक्त विद्यमाने वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली खुली चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कर्नाळा किल्ला परिसर व तेथील पशु व पक्षी, वन्यजीव आणि मानव संघर्ष, पशुपक्षी वाचवा, निसर्ग सजवा, मी पाहिलेला …

Read More »

राज्य सरकारच्या निर्णयाचा खारघर-तळोजा मंडलकडून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त देशातील कृषिवल सुखी व्हावा, होणार्‍या आत्महत्या कमी व्हाव्यात व एक देश एक बाजारपेठ ही संकल्पना प्रत्यक्षात यावी म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी सुधारणा कायदे देशात लागू केले. शेतकर्‍यांच्या समस्येचे निराकरण करण्याच्या उद्देशाने हा कायदा पारित करण्यात आला. चांगल्या विधेयकाला विरोध करून राज्य सरकारने …

Read More »

अशोक दुधे रायगडचे नवे पोलीस अधीक्षक

पनवेल : वार्ताहररायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी अशोक दुधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या गृह विभागाकडून बुधवारी (दि. 7) भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक व उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदलीने पदस्थापना करण्याचे आदेश काढण्यात आले. या आदेशानुसार रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर …

Read More »

आयपीएल सट्टा लावणारे रॅकेट कर्जतमध्ये उद्ध्वस्त

अलिबाग : सध्या संयुक्त अरब अमिराती (यूएई)मध्ये खेळल्या जात असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या सामन्यांसाठी सट्टा लावणारे एक मोठे रॅकेट स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) रायगडने उद्धवस्त केले आहे. यात वेगवेगळे बुकी व त्यांचे मध्यस्थ अशा एकूण 11 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 16 मोबाइल फोन जप्त करण्यात …

Read More »

गुटखा विक्री करणार्‍यांवर कामोठ्यात कारवाई

पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस फैलावत चालला असून रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. पनवेल महानगरपालिका व संबंधित पोलीस ठाणे यांच्यामार्फत नियम मोडणार्‍या दुकानांवर व व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करीत आहेत. नुकतेच कामोठे येथे कामोठे पोलीस ठाण्याच्या समोरील बाजूच्या रस्त्यावर मेघना वाईन्ससमोर ह्युंदाई इऑन या चारचाकीमध्ये संपूर्ण गाडी …

Read More »

नवी मुंबईत बसस्थानकांवर लागताहेत नागरिकांच्या लांबच लांब रांगा; लोकल सुरू करण्याची प्रवाशांची मागणी

पनवेल : बातमीदार टाळेबंदी शिथिलीकरणानंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील सर्व व्यवहार आता पूर्ववत सुरू झाले आहेत. नागरिकांनाही आता कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत आहे. मात्र या शहरांची जीवनवाहिनी असलेली लोकल मात्र अद्याप सुरू करण्यात न आल्याने नवी मुंबईतून मुंबई, ठाण्यात प्रवास करताना नोकरदारांचे नाकेनऊ येत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सर्व ताण …

Read More »

सुरक्षाकवच नसल्याने सफाई कर्मचारी एकवटले; सिडकोविरोधात ठिय्या

पनवेल : वार्ताहर सिडकोकडे काम करणार्‍या 700 पेक्षा जास्त सफाई कामगारांना कोरोना काळात सेवा बजावत असताना कोणतेही सुरक्षाकवच नाही. परिणामी संबंधितांना आपला जीव धोक्यात घालून काम करत असताना सुरक्षितता नाही. त्यामुळे संबंधितांना सुरक्षा विमा देण्याबरोबर इतर सुविधांसाठी आझाद कामगार संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. 5) एल्गार पुकारण्यात आला होता. कामगारांनी सिडको …

Read More »

उरण भाजपतर्फे राज्य सरकारच्या आदेशाची होळी

उरण : वार्ताहरशेतकर्‍यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कृषी कायद्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी करणार नसल्याचे महाविकास आघाडी सरकारने म्हटले आहे. त्यामुळे या संदर्भातील राज्य सरकारच्या आदेशाची उरण भाजपच्या वतीने बुधवारी (दि. 7) होळी करून जाहीर निषेध करण्यात आला.या वेळी उरण भाजप कार्यालयासमोर आमदार महेश बालदी, तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, …

Read More »

राज्यातील बळीराजाच्या विकासाला स्थगिती देणार्‍या महाविकास आघाडी सरकारचा निषेध

कृषी कायद्याची अंमलबजावणी करा; पनवेल भाजपची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तकेंद्र सरकारने संसदेत संमत केलेल्या कृषी विधेयकांचे राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर झालेले आहे. या महत्त्वपूर्ण अशा कायद्यामुळे बळीराजाच्या विकास व प्रगतीचा मार्ग मोकळा झाला असताना केवळ दलालांच्या फायद्यासाठी कृषी कायदा महाराष्ट्रात लागू करण्यास महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली आहे. राज्य …

Read More »

शाश्वत उत्पन्नवाढीसाठी एकात्मिक शेती महत्त्वाची

डॉ. रवींद्र मर्दाने यांचे प्रतिपादन कर्जत ः बातमीदार कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता भाताऐवजी भात-भाजीपाला, भात-कडधान्य ही पीकपद्धती स्वीकारून त्यास यांत्रिकीकरण व कृषिपूरक उद्योगधंद्यांची जोड द्यावी. शेतीतून शाश्वत उत्पन्नवाढीसाठी एकात्मिक शेती पद्धती अवलंबविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले. दापोलीतील डॉ. …

Read More »