Breaking News

Monthly Archives: October 2020

एसटी कर्मचारी आर्थिक संकटात

महाड आगारातील कर्मचार्‍यांचा तीन महिन्याचा पगार रखडला महाड : प्रतिनिधी कोरोना संसर्गामुळे एप्रिल महिन्यापासून बंद असणारी ग्रामिण भागातील जीवनवाहिनी एसटी गेल्या महिनाभरापासून हळू हळू धावू लागली आहे. मात्र प्रवाशांकडून मिळणार्‍या अल्प प्रतिसादामुळे पुरेसे उत्पन्न नसल्याने आधीच तोट्यात असणार्‍या राज्य परिवहन महामंडळाचा तोटा वाढत आहे अशा परिस्थितीत कर्मचार्‍यांच्या पगारासाठी लागणारा निधी …

Read More »

श्रीवर्धनमध्ये महावितरणचा सावळागोंधळ

श्रीवर्धन ः प्रतिनिधी  संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यात महावितरणचा वीजपुरवठ्याबाबत सावळागोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील 15 दिवसांपासून दर दोन-तीन दिवसांनी वीजपुरवठा दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवण्यात येतो. लॉकडाऊन तसेच निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चक्रीवादळानंतर श्रीवर्धन शहरातील वीजपुरवठा तब्बल 28 दिवसांनंतर, तर ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरू …

Read More »

तणावापासून मिळवा मुक्ती

आरोग्य प्रहर तणाव दीर्घकाळ राहिल्यास चिंतेचे रूप धारण करतो. मानसिक एकाग्रता ढळते. डोकेदुखी सुरू होते. अभ्यासात अडचणी येतात. मन व शरीरावर तणावाचे अनिष्ट परिणाम होतात. अनेकदा मानसिक संतुलनही बिघडते. चिडचिडेपणा, संताप वाढतो. झोप न येणे, डोकेदुखी, मायग्रेन, नैराश्य, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, अ‍ॅसिडिटी, अल्सर, केस झडणे आदी व्याधी मागे लागतात. तणाव …

Read More »

निसर्ग चक्रीवादळातील नुकसानभरपाईस विलंब

चौल व नागाव ग्रामपंचायतीचे तहसिलदारांना निवेदन रेवदंडा : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाचे केंद्र ठरलेल्या चौल व नागाव ग्रामपंचायत हद्दीतील नुकसानग्रस्तांना त्वरीत नुकसान भरपाई मिळावी, यासाठी या ग्रामपंचायतींच्या वतीने अलिबाग तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. नागाव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच निखिल मयेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नागाव ग्रामपंचायत हद्दीत निसर्ग चक्रीवादळात मोठे …

Read More »

राज्य सरकारने काढलेल्या स्थगन अध्यादेशाची होळी

कर्जत भाजपचे आंदोलन कर्जत : प्रतिनिधी केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या हिताचे मंजूर केलेले कृषी विधेयक बिल राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात लागू न केल्याने शेतकर्‍यांचे आतोनात नुकसान होत आहे. कर्जत तालुका भाजपच्या वतीने तहसील कार्यालयासमोर राज्य सरकारचा जाहीर निषेध करुन  राज्य सरकारने काढलेल्या स्थगन अध्यादेशाची होळी करण्यात आली. अध्यादेश रद्द करावा, …

Read More »

तरुणाने बनवले मासळी विक्रीचे अ‍ॅप

आगरी-कोळी बांधवांसाठी ठरणार उपयुक्त कळंबोली : बातमीदारउच्चशिक्षित झाल्यानंतर परदेशात गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीच्या सुवर्णसंधी पायाशी लोटांगण घालत असताना निव्वळ आई-वडिलांनी दिलेला मातृभूमीच्या सेवेचा मूलमंत्र जपण्यासाठी कळंबोलीतील अमोल ज्ञानेश्वर म्हात्रे हा युवक अमेरिकेमधील हाय प्रोफाइल नोकरीवर पाणी सोडून भारतात परतला आहे. आगरी व कोळी बांधवांना त्यांनी उत्पादित केलेल्या मच्छीची विक्री सहज, सोप्या …

Read More »

जेएनपीटी वसाहतीतील भाडेवाढीला स्थगिती

रहिवाशांनी मानले चेअरमन, आमदारांचे आभार उरण : वार्ताहरजेएनपीटी बंदराच्या वसाहतीमधील भाडेवाढीला व्यवस्थापनाने 31 मार्च 2021पर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याने रहिवाशांच्या शिष्टमंडळाने जेएनपीटीचे चेअरमन संजय सेठी, व्हाइस चेअरमन उन्मेश वाघ तसेच उरणचे आमदार महेश बालदी यांचे आभार व्यक्त केले आहेत. जेएनपीटी बंदर प्रशासनाने आपल्या वसाहतीमध्ये भाडेवाढ करण्याचा निर्णय जुलै महिन्यात घेतला …

Read More »

माथेरानमध्ये ई-रिक्षांना परवानगी द्या

भाजपचे राज्यपालांना साकडे कर्जत ः बातमीदारप्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरान येथे ब्रिटिशांनी घालून दिलेल्या नियमानुसार वाहनांना बंदी आहे. त्यामुळे येथील रस्त्यांवर पर्यावरणस्नेही ई-रिक्षांना परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मुंबईतील राजभवन येथे भेट घेऊन केली आहे.या शिष्टमंडळात माथेरान येथील भाजप अध्यक्ष विलास पाटील, किसान मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य …

Read More »

क्लीन चिटसाठी उतावीळ!

सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी आत्महत्याच केली, असा निर्वाळा दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) इस्पितळातील गुन्हेवैद्यक मंडळाने नुकताच दिला आहे. गुन्हेवैद्यक मंडळाचा हा निष्कर्ष म्हणजे महाराष्ट्र सरकारला मिळालेली क्लीन चिट आहे असा काही लोकांचा गैरसमज झालेला दिसतो. महत्त्वाचे म्हणजे सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास करणार्‍या सीबीआयने अजून आपला …

Read More »

वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघे जखमी

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पोलीस चौकीसमोरून पायी जात असलेले निवृत्त तहसीलदार बाळकृष्ण खेडेकर (75) यांना पांढर्‍या रंगाच्या गाडीने धडक दिल्याने ते जबर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर गाडीचालक गाडी घेऊन पसार झाला. दुसर्‍या …

Read More »