Breaking News

Monthly Archives: November 2020

नितीश कुमारच होणार बिहारचे सातवे मुख्यमंत्री

बिहार ः वृत्तसंस्था जेडीयूचे नेते नितीश कुमार यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बिहार विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. यासोबतच नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ते सातव्यांदा आणि सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळतील. शपथग्रहण सोहळा सोमवारी (दि. 16) होऊ शकतो. बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यासंबंधी भाजप, …

Read More »

तरुणीवर अ‍ॅसिड हल्ल्यानंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळले; बीडमधील धक्कादायक घटना; आरोपी फरार

बीड ः प्रतिनिधी दिवाळीसाठी पुण्याहून गावी परतणार्‍या तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला करून नंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना बीडमधील येळंबघाट येथे घडली. गंभीररित्या भाजलेल्या तरुणीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी (दि. 15) पहाटे तिचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणातील आरोपी व मयत तरुणी दोघे पुण्यात एकत्र (लिव्ह इन रिलेशनशिप) राहत …

Read More »

‘पंतप्रधान मोदींना पर्याय नाही’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था योगगुरू बाबा रामदेव यांनी पुढची 10 ते 20 वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही, असे म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी राहुल गांधी यांनी त्रियोग करावा, तर दिग्विजय सिंह यांनी मौन योग करावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. …

Read More »

आजपासून राज्यातील धार्मिक स्थळे होणार खुली; नियम पाळून मिळणार प्रवेश

मुंबई : प्रतिनिधी भाजप तसेच विविध संघटनांच्या मागणीनंतर राज्यातील धार्मिक स्थळे सोमवार (दि. 16)पासून अखेर खुली होणार आहेत. त्यामुळे भाविक-भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, मंदिरात प्रवेश करताना कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे लागणारे आहे. अनेक मंदिर देवस्थान ट्रस्टनेही नियमावली तयार केली आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरातील मंदिरे खुली केली जाणार आहेत. …

Read More »

वनवासी विद्यार्थ्यांसोबत शैक्षणिक दिवाळी

नवी मुंबई : बातमीदार नवसंकल्प सामाजिक संस्था नेहमीच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असते. या वर्षभरात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावा मुळे देशातील सर्वच घटक प्रचंड मोठ्या आर्थिक, मानसिक संकटात अडकले आहेत. टाळेबंदीमुळे नागरिकांचे नोकरी, उद्योगधंदे सुद्धा बंद झाले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी, शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी सुद्धा कित्येक पालकांना आर्थिक चणचण भासत …

Read More »

भारत विकास परिषदेकडून कोविड योद्ध्यांना फराळ वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखेच्या वतीने पनवेल परिसरातील कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. पनवेल शहरातील तिन्ही पोलीस ठाणी, उप-जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कर्मचारी तसेच सुरक्षा रक्षक यांना दिवाळी फराळ देऊन यथायोग्य सन्मान करण्यात आला. याबरोबरच कोरोना विरुद्धच्या युद्धात आपल्या प्राणाची बाजी लावून लढणार्‍या ह्या …

Read More »

‘होपमिरर’कडून बालदिनानिमित्त गरीब मुलांसाठी विविध उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त होपमिरर फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने बालदिनानिमित्त संपूर्ण नवी मुंबईत गरीब मुलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. संस्थेच्या या उपक्रमांना मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. होपमिरर फाऊंडेशन ही रमजान शेख यांनी स्थापन केलेली एक स्वयंसेवी संस्था आहे जी अत्यंत लहान वयातच गरजूंना मदत करण्याची मानसिकता होती. नवी मुंबई …

Read More »

‘साहित्याची परंपरा जपणारा पनवेल टाइम्सचा दिवाळी अंक’

पनवेल : रामप्रहर वृत्त साहित्याची आवड दिवाळी अंकांतून होते, याच साहित्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा पनवेल टाइम्स दिवाळी अंकाने जपली असल्याचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल टाइम्सच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशन प्रसंगी मत व्यक्त केले.   या प्रकाशन समारंभ कार्यक्रमाला पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी, ज्येष्ठ पत्रकार घनश्याम मानकामे, पत्रकार …

Read More »

शिष्यवृत्ती परीक्षेत गव्हाण विद्यालयाचे विद्यार्थी चमकले

गव्हाण : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून रयत शिक्षण संस्थेच्या येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश प्राप्त केले. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून दीक्षा …

Read More »

कोरोनामुळे व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांना भाजपकडून आधार

नगरसेवकांकडून प्रभागामध्ये देण्यात आला दिवाळी फराळ पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या देशामध्ये शासनाचे अनेक प्रयत्न सुरु आहेत. लाखो नागरिकांना आपले प्राण गमावावे लागले. पनवेल तालुक्यातही कोरोनाचा कहर वाढलेला असताना अनेक नागरिकांचे मृत्यू झाले. कोरोनामुळे मयत झालेल्या कुटुंबामध्ये दु:खाचे सावट पसरलेले आहे. त्यांच्या घरात पनवेल भाजप शहर मंडल …

Read More »