Breaking News

Monthly Archives: November 2020

दिवाळी झाली गोड

विहिंपतर्फे आदिवासींना फराळ मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील टक्याचीवाडी येथील सुमारे 50 आदिवासी कुटुंबियांना विश्व हिंदू परिषदेतर्फे शनिवारी (दि. 14) दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. विहिंपतर्फे हा उपक्रम यंदा सलग चौथ्या वर्षीही राबविण्यात आला. मुरुडपासून सुमारे दोन कि.मी. अंतरावरील डोंगरावर वसलेल्या टक्याचीवाडी येथे दिवाळीच्या दिवशी जावून  विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तेथील …

Read More »

सीकेटीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश

पनवेल : रामप्रहर वृत्त – उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत सन 2020 मध्येही चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाने शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागात शिकणाया इयत्ता पाचवीच्या पाच विद्यार्थ्यांना पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (झणझड) तसेच इयत्ता आठवीच्या नऊ  विद्यार्थ्यांना पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (झडड) शिष्यवृत्ती संपादित …

Read More »

दिवाळी ते दिवाळी-तळातून उभारीने दिली संधी!

दिवाळी ते दिवाळी या एका वर्षात निफ्टीनं 10 टक्के वाढ नोंदवलीय (11627-12680) तर सेन्सेक्सनं 10.68 टक्के. ही वाढ भव्यदिव्य वाटत नसली तरी मार्च महिन्यामध्ये तळात गेलेल्या बाजारानं मिळवलेली उभारी लक्षणीय ठरली आहे. दरवर्षी उत्साहानं साजरा केला जाणारा दिव्यांचा सण म्हणजे दीपावली. कोरोना संकटात दिवाळी कशी जाणार, अशी शंका व्यक्त केली …

Read More »

निवडणूक निकालांमागे आर्थिक बदलांचा मोठा वाटा का आहे?

निवडणूक निकालांचे विश्लेषण आजही पारंपारिक आणि जुनाट जातीधर्माच्या गणितावर केले जाते. वास्तविक बहुजनांमध्ये भौतिक सुखाच्या ज्या आकांक्षा तयार झाल्या आहेत, त्याला आधार देणारे आर्थिक बदल जनमतांत मोठी भूमिका बजावू लागले आहे. त्याची प्रचिती 2019च्या सार्वत्रिक निवडणुकांत आली होती आणि ताज्या विधानसभा निवडणुकांतही त्याची पुनरावृत्ती झाली आहे. बिहारमधील विधानसभा आणि इतर …

Read More »

दुरितांचे तिमिर जावो

वेळीच लॉकडाऊन केल्यामुळे कोरोनामुळे होऊ पाहणारी महाप्रचंड जीवितहानी टाळण्यात यश मिळाले हे खरे असले तरी या जालिम उपायाचे परिणाम काही काळ भोगावे लागणार आहेत. तरीही पंतप्रधान मोदी यांनी देशाचे अर्थचक्र पूर्णत: ठप्प होऊ दिले नाही. याच काळात त्यांनी आत्मनिर्भर भारताची मुहूर्तमेढ रोवली. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत कित्येक गरजूंना उद्योग व्यवसायासाठी कर्जवाटप …

Read More »

चिंचवली येथील गणेश विसर्जन घाटाचे भूमिपूजन

कर्जत : बातमीदार भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजन मंडळाने मंजूर केलेल्या निधीमधून कर्जत तालुक्यातील चिंचवली गावात गणेश विसर्जन घाट उभारण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे आणि कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांच्या हस्ते करण्यात आले. …

Read More »

आदिवासी पाड्यात कपडे, फराळ वाटप

खारघर : प्रतिनिधी खारघरमधील घोळवाडी या आदिवासी पाड्यात आदर्श सेवा भावी सामाजिक संस्थेच्या वतीने साडीचोळी, मिठाई, फराळ आणि कौटुंबिक वस्तू वाटप करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार विश्वरथ नायर, श्री बालाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष दत्त्ता दळवी, संत सावता माळी सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश बनकर, संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मांजरेकर, अजय …

Read More »

दिव्यांग बांधवांची, गरीबांची दिवाळी अंधारात

संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान रखडले पाली : प्रतिनिधी संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मिळणारे अनुदान  तब्बल चार महिन्यांपासून रखडले असल्याने दिव्यांग बांधवांची यंदाची दिवाळी अंधारात जाणार आहे. जागृती अपंग कल्याणकारी संस्थेने पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना या बाबत निवेदन दिले आहे. दिव्यांग व्यक्तींना संजय गांधी निराधार अनुदानाचा मोठा आधार असतो. …

Read More »

पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक अडचणीत

 आमदार रविशेठ पाटील यांच्यासमोर मांडल्या व्यथा पेण : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक गेले सात-आठ महिने आर्थिक संकटात सापडले आहेत. आधी कोविड-19 नंतर आलेले निसर्ग चक्रीवादळ यामध्ये जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या उत्पन्नाचे साधन नसल्याने पोल्ट्री व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आपली व्यथा सरकार दरबारी …

Read More »

स्मशानभूमीत काम करणार्या कर्मचार्यांना दिवाळी भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये कोरोना महामारीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी अजूनही कोरोनाचा प्रभाव पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही. कोरोना काळातही पनवेलमधील अमरधाम आणि पोदी येथील स्मशानभूमीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी आपले कार्य सुरूच ठेवले आहे. त्यांनी केलेल्या या सेवाकार्याबद्दल तसेच दिवाळी …

Read More »